सीधे मुख्य सामग्री पर जाएं

संदेश

Narendra Modi लेबल वाली पोस्ट दिखाई जा रही हैं

भारत आणि अमेरिका यांचे संयुक्त निवेदन

भारत आणि अमेरिका यांचे संयुक्त निवेदन दिल्ली:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जोसेफ आर. बायडेन (ज्युनियर) यांचे भारतात स्वागत केले आणि भारत व अमेरिका यांच्यातील घनिष्ठ आणि चिरस्थायी भागीदारीचा पुनरुच्चार केला. दोन्ही नेत्यांनी पंतप्रधान मोदी यांच्या जून 2023 मधील ऐतिहासिक अमेरिका भेटीत सहमती साध्य झालेल्या बाबींची अंमलबजावणी करण्यासाठी सुरू असलेल्या भरीव प्रगतीबद्दल कौतुक केले. विश्वास आणि परस्पर सामंजस्यावर आधारित आपल्या बहुआयामी जागतिक कार्यसूचीच्या सर्व आयामांमध्ये भारत-अमेरिका धोरणात्मक भागीदारीत परिवर्तन घडवण्याचे काम सुरू ठेवण्याचे आवाहन दोन्ही नेत्यांनी केले. स्वातंत्र्य, लोकशाही, मानवी हक्क, समावेशन, बहुलता आणि सर्व नागरिकांसाठी समान संधी ही सामायिक मूल्ये आपल्या देशांच्या सफलतेसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत आणि हीच मूल्ये आपले संबंध दृढ़ करत असल्यावर दोन्ही यावर नेत्यांनी पुन्हा भर दिला.   एक मंच म्हणून जी 20 महत्त्वाचे परिणाम कसे साध्य करू शकतो, हे दर्शविण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी भारताच्या जी 20 अध्यक्षतेचे कौतुक केले...