सीधे मुख्य सामग्री पर जाएं

संदेश

Yavatmal लेबल वाली पोस्ट दिखाई जा रही हैं

कापूस पीक उत्पादन वाढीसाठी शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड महत्त्वाची - माजी कुलगुरू डॉ. सी.डी. मायी

 कापूस पीक उत्पादन वाढीसाठी शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड महत्त्वाची - माजी कुलगुरू डॉ. सी.डी. मायी बाभुळगावात शेतकरी मेळावा संपन्न यवतमाळ, दि. ७ (जिमाका): कापूस पीक उत्पादन वाढीसाठी शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन माजी कुलगुरू तथा ॲग्रोव्हिजन फाउंडेशनचे सचिव डॉ. सी.डी. मायी यांनी केले. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला, कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ, ॲग्रोव्हिजन फाउंडेशन, नागपूर, साऊथ एशिया बायोटेक्नोलॉजी सेंटर, जोधपुर आणि कृषी विभागाच्या संयुक्त सहकार्याने कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळी व्यवस्थापन बंधन प्रकल्पांतर्गत बाभुळगाव तालुक्यातील श्री सिध्देश्वर शिव मंदिर, सरूड येथे शेतकरी मेळावा नुकताच पार पडला. तसेच महमदपूर गावात ६० एकरवर पी.बी. नॉट बंधन बांधण्याचा कार्यक्रम राबविण्यात आला. या मेळावाच्या अध्यक्षस्थानी मार्गदर्शक सुभाषचंद्र आचलीया, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सुरेश उ. नेमाडे, बाभुळगावचे तालुका कृषी अधिकारी सुरेश गावंडे, महमदपूरच्या सरपंच ज्योतीताई काळे, साउथ ऐशिया बायोटेक्नोलॉजी सेंटरचे डॉ. दीपक जाखर,, वसंतराव नाईक जैव तंत्रज्ञान महाविद्याल...