सीधे मुख्य सामग्री पर जाएं

संदेश

Political लेबल वाली पोस्ट दिखाई जा रही हैं

केंद्रीय मंत्री मा. श्री. नितीन गडकरी यांचा जनसंपर्क कार्यक्रम ८ ऑक्टोबरला

 केंद्रीय मंत्री मा. श्री. नितीन गडकरी यांचा जनसंपर्क कार्यक्रम ८ ऑक्टोबरला नागपूर : केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री मा. श्री. नितीनजी गडकरी यांचा जनसंपर्क कार्यक्रम रविवार, ८ ऑक्टोबर २०२३ रोजी आयोजित करण्यात आला आहे. खामला चौकाजवळील ज्युपिटर शाळेच्या बाजूला मा. मंत्री महोदय यांच्या जनसंपर्क कार्यालयात सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत हा कार्यक्रम होईल. मा. मंत्री महोदय नागरिकांना व्यक्तिशः भेटतील आणि त्यांच्याशी संवाद साधतील. नागरिकांनी आपल्या समस्या, अडचणी, मागण्या लेखी स्वरुपात (आवश्यक कागदपत्रे जोडून) आणाव्यात. तसेच आपली लेखी निवेदने मा. मंत्री महोदयांना द्यावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

आर्वी पंचायत समितीत वाजत गाजत निघाली अमृत कलश यात्रा 73 ग्रामपंचायतींचा सहभाग आ.दादाराव केचेंचा सहभाग

 आर्वी पंचायत समितीत वाजत गाजत निघाली अमृत कलश यात्रा 73 ग्रामपंचायतींचा सहभाग आ.दादाराव केचेंचा सहभाग 🖊️प्रविण जगताप 🖊️ वर्धा जिल्हा प्रतिनिधी मो . 9284981757 वर्धा, दि. 29 : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राबविण्यात येत असलेल्या मेरी माटी मेरा देश अभियानांतर्गत पंचायत समिती, आर्वी अंतर्गत सर्व 73 ग्रामपंचायतींचा अमृत कलश यात्रेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी पंचायत समितीच्या प्रांगणात वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. सकाळी 9 वाजता ग्रामपंचायत मिर्झापूर (नेरी) येथून कलश यात्रा काढण्यात आली. या कलश यात्रेत 73 ग्राम पंचायतीचे सरपंच व ग्रामसेवक सहभागी झाले होते. यात्रा स्मार्ट ग्राम मिर्झापूर ते पंचायत समिती आर्वी येथे आल्यानंतर आमदार दादाराव केचे व गटविकास अधिकारी डॉ. गणेश माने यांनी कलश यात्रेचे स्वागत केले. ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी माती कलश आमदार दादाराव केचे व गटविकास अधिकारी डॉ. गणेश माने यांच्याकडे सुपूर्द केले. आमदार श्री. केचे यांनी आपल्या सोबत आणलेले तांदुळ पंचायत समिती आर्वीच्या कलशामध्ये जमा करून सहभाग नोंदवला व त्यानंतर आपले मनोगत व्यक्त केले....

04 आक्टोम्बर 2023 ला उपविभागीय अधिकारी कार्यालय, हिंगणघाट समोर धरणे आंदोलन

*सोयाबीन पिकाचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून पीकविमा व 50 हजार रुपयाची मदत देण्यात यावी याकरिता राष्ट्रवादी पार्टी समुद्रपूर पार्टी समुद्रपूर यांच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.एकनाथजी शिंदे साहेब यांना तहसीलदार, साहेब समुद्रपूर यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले*  04 आक्टोम्बर 2023 ला उपविभागीय अधिकारी कार्यालय, हिंगणघाट समोर धरणे आंदोलन.  🖊️प्रविण जगताप 🖊️ वर्धा जिल्हा प्रतिनिधी मो . 9284981757 महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संघटक सचिव तथा माजी आमदार प्रा.राजूभाऊ तिमांडे व हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुधीर कोठारी यांच्या नेतृत्वात हजारो शेतकऱ्यांनी दिले निवेदन     परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावल्याने सोयाबीनच्या पिकाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे सोयाबीनचे पीक पाण्याखाली गेले आहे. यापूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाची वाढ झाली नव्हती. त्यातच काही जणांचे कसेबसे आलेले सोयाबीनची काढणी सुरू ह्यायचा अगोदरच पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र सततच्या पावसानं त्यांच्या श...

सीताबर्डी प्रभाग 15 येथील पूरग्रस्त सदृश्य परिस्थितीत आपादग्रस्तांना नागरिकांना व व्यापाऱ्यांना नुकसान भरपाई मिळणे बाबत

 सीताबर्डी प्रभाग 15 येथील पूरग्रस्त सदृश्य परिस्थितीत आपादग्रस्तांना नागरिकांना व व्यापाऱ्यांना नुकसान भरपाई मिळणे बाबत नागपुरात शुक्रवार दिनांक 22/ 9/2023 रोजी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे सीताबर्डी प्रभाग 15 येथील भागात पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असता बेसमेंट व उतार भागात ज्या व्यापाऱ्यांचे दुकान होती पावसाचे पाणी घुसून त्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तरी मा . उपमुख्यमंत्री यांच्या आदेशान्वये नुकसान भरपाईचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले असून या सर्व नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांना व नागरिकांनामदत करून यांच्या दुकानाचे पंचनामे लवकर करून भरपाई शासनाद्वारे देण्यात यावी अशी मागणी भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडी सीताबर्डी अध्यक्ष दिनेश गावंडे उपाध्यक्ष वरून महाडिया यांनी सहाय्यक आयुक्त धरमपेठ झोन 2 श्री प्रकाश वराडे महानगरपालिका उपायुक्त श्रीमती आंचल गोयल व उपमुख्यमंत्री पालकमंत्री नागपूर शहर यांच्या कार्यालयात निवेदन देण्यात आले.

हिंगणघाटच्या अंकीता पिसुड्डे परिवाराला उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते 5 लाखाची मदत

 हिंगणघाटच्या अंकीता पिसुड्डे परिवाराला उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते 5 लाखाची मदत 🖊️प्रविण जगताप 🖊️वर्धा जिल्हा प्रतिनिधी वर्धा, दि. 26 : हिंगणघाट तालुक्यातील दरोडा येथील शिक्षिका असलेल्या अंकिता पिसुड्डे या युवतीच्या आई-वडिलांना शासकीय मदतीचा पाच लक्ष रुपयाचा धनादेश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते देण्यात आला. नागपूर येथे आ. समीर कुणावर तसेच चित्रा वाघ यांच्या उपस्थितीत दरोडा येथील अरुण नागोराव पिसुड्डे व सौ.पिसुड्डे यांना शासकीय मदत देण्यात आली. अंगावर पेट्रोल टाकून अंकिताला जाळण्याचा प्रयत्न झाला होता. त्यानंतर या घटनेत तिचा मृत्यू झाला. अंत्यसंस्काराच्या वेळी शासनाने 5 लाखाची मदत जाहीर केली होती. मात्र ती अद्याप मिळाली नव्हती. याबाबत हिंगणघाटचे आमदार समीर कुणावार यांनी पाठपुरावा केला तसेच हा खटला जलद गती न्यायालयात चालावा ही मागणी मान्य करण्यात आली होती . उपमुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतक अंकिताच्या पालकांना 5 लाखाचा धनादेश आज दिला. घटनेवेळी गावकऱ्यांनी आर्थिक मदत, तिच्या भावाला शासकीय नोकरी आणि खटला जलदगती न...

पूरग्रस्तांना न्याय देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा

 पूरग्रस्तांना न्याय देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा  नाल्यावर अतिक्रमण करण्यासाठी मदत करणाऱ्या मनपा अधिकाऱ्यांना निलंबित करा - प्रशांत पवार नागपूर शहरात झालेल्या अतिवृष्टी सदृश्य पावसाने अनेक घरे, वाहने, उपकरणे, दुकाने, घरातील गाद्या पासून सर्वच साहित्य ओले चिंब झाले. प्रशासनाने फक्त श्रीमंत भागात पाहणी दौरा केला असल्याने झोपडपट्टी भागात प्रशासनाच्या एकही अधिकाऱ्यांनी दौरा केला नाही.  *विशेष म्हणजे चमडिया हायस्कूलच्या मागील काचीपूरा भागात सुमारे 350 घरे आणि 1400 नागरिकांचे संसार उघड्यावर आले. नवीन वसाहत गड्डी गोदाम, गोवा कॉलोनी, मंगळवारी बाजार, धोबीघाट, स्वीपर मोहल्ला, परदेशी मोहल्ला, गौतम नगर या परिसरात 300 घरांचे नुकसान झाले. या वस्तीत 3 दिवसा पासून खायला अन्न नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मंगळवार दिनांक 26.9.2023 रोजी दुपारी 12.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय वर हजारोच्या संख्येने धडक मोर्चा काढण्यात आला.* *जिल्हाधिकारी श्री.विपीन इटनकर यांना निवेदन देऊन या वस्ती मध्ये आतापर्यंत एकही अधिकारी का आला नाही याचे ज...

वाहन भंगारात काढण्याचे धोरण सर्वांसाठीच लाभदायक असून सर्व संबंधितांनी पुढे येऊन या धोरणाला पाठिंबा द्यावा : गडकरी यांचे आवाहन

वाहन भंगारात काढण्याचे धोरण सर्वांसाठीच लाभदायक असून सर्व संबंधितांनी पुढे येऊन या धोरणाला पाठिंबा द्यावा : गडकरी यांचे आवाहन नवी दिल्ली : वाहन भंगारात काढण्याचे धोरण सर्वांसाठीच लाभदायक असून सर्व संबंधितांनी पुढे येऊन या धोरणाला पाठिंबा द्यावा असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे . आज नवी दिल्लीत संबंधितांच्या सल्लामसलत सत्राला ते संबोधित करत होते. वाहनांसाठी लवचिक मागणी निर्माण करण्यासाठी मंत्रालयाने महामार्गांचे जागतिक दर्जाचे जाळे तयार करणे, बसेसचे विद्युतीकरण आणि वाहनांची अनिवार्य स्वयंचलित फिटनेस चाचणी यांसारखे अनेक उपक्रम हाती घेतले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. वाहन निर्माण उद्योगातील मूळ उपकरण उत्पादकांनी (OEMs) त्यांची उत्पादन क्षमता वाढवण्याच्या दिशेने काम केले पाहिजे आणि देशाला जगातील सर्वात मोठा वाहन उद्योग होण्यासाठी मदत केली पाहिजे, असेही ते म्हणाले. या धोरणामुळे वाहन निर्मिती क्षेत्राला सर्वात जास्त फायदा मिळणार असल्यामुळे या क्षेत्राने पुढाकार घेऊन, स्वयंचलित चाचणी केंद्रे (ATS) आणि नोंदणीकृत व्हेईकल स्क्रॅपिंग फॅसिलिटीज (R...

स्व. अरविंद शहापूरकर यांचे भाजपच्या संघटनात्मक उभारणीत मोठे योगदान- केंद्रीय मंत्री ना. श्री. नितीन गडकरी

 स्व. अरविंद शहापूरकर यांचे भाजपच्या संघटनात्मक उभारणीत मोठे योगदान- केंद्रीय मंत्री ना. श्री. नितीन गडकरी केंद्रीय मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी दिला आठवणींना उजाळा नागपूर – भारतीय जनता पक्षाने अत्यंत कठीण काळ बघितला आहे. हजारो कार्यकर्त्यांच्या योगदानामुळे पक्षाला आज चांगले दिवस आले आहेत. स्व. अरविंद शहापूरकर यांनी देखील संघर्षाच्या काळात भाजपच्या संघटनात्मक उभारणीत मोठे योगदान दिले, असे सांगतानाच केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी स्व. शहापूरकर यांच्या आठवणींना उजाळा दिला. भारतीय जनता पार्टी नागपूरच्या वतीने बीआरए मुंडले सभागृहात ज्येष्ठ भाजप नेते स्व. अरविंद शहापूरकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सभा आयोजित करण्यात आली. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री ना.श्री. देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महानगर सहसंघचालक श्री. श्रीधर घाडगे, ज्येष्ठ प्रचारक श्री. रवीजी भुसारी, माजी आमदार श्री. चैनसुख संचेती, श्रीमती मिरा शहापूरकर, आमदार श्री. रणधीर सावरकर, श्री. जगदीश गुप्ता, भाजप संघटन मंत्री श्री. उपेंद्र कोठेकर, भाजप शहराध्यक्ष श्री. ब...

उत्तम शिक्षणातून मिळेल प्रगतीची दिशा -केद्रीय मंत्री ना. श्री. नितीन गडकरी

 उत्तम शिक्षणातून मिळेल प्रगतीची दिशा -केद्रीय मंत्री ना. श्री. नितीन गडकरी : चर्मकार सेवा संघातर्फे गुणवंतांचा सत्कार नागपूर - उत्तम शिक्षण हा विकासाचा पाया आहे. चर्मकार समाजाला विकासाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी मुलांना चांगले शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने प्रयत्न करायचे आहेत. गुणवंतांच्या सत्कारातून त्याची प्रेरणा नक्कीच मिळेल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी केले.  चर्मकार सेवा संघाच्या वतीने गांधीसागर येथील शिक्षक सहकारी बँकेच्या सभागृहात गुणवंतांचा सत्कार सोहळा व समाज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी आमदार प्रवीण दटके, संस्थेचे प्रमुख भैय्यासाहेब बिघाणे आदींची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. ना. श्री. गडकरी यांनी सुरुवातीला श्री संत रविदास यांना अभिवादन केले. ते म्हणाले, ‘ गरिबांच्या आयुष्यातील अंधःकार दूर करून त्यांना उजेडाचा मार्ग सापडावा, यासाठी मी श्री संत रविदास यांच्या चरणी प्रार्थना करतो. भैय्यासाहेब बिघाणे यांच्यासारखी मंडळी गेली अनेक वर्षे समाजाच्या परिवर्तनासाठी काम करीत आहेत, याचा मला आनंद आहे. समाजाचा वि...

केन्द्रीय मंत्री नितिन गडकरी जी ने आज श्री जय गणेश उत्सव मंडल में भेंट दी व श्री के पूजन व दर्शन लिए

 नागपुर शहर के खासदार व केन्द्रीय मंत्री सम्माननीय नितिन गडकरी जी ने आज श्री जय गणेश उत्सव मंडल, पेंशन लाईन, राजभवन गार्डन परिसर में भेंट दी व श्री के पूजन व दर्शन लिए।          प्रमुख उपस्थिति पूर्व नगरसेवक सुनिल अग्रवाल, पूर्व नगरसेविका प्रगति पाटील, पूर्व नगरसेवक निशांत गांधी व नगर सचिव लक्ष्मीकांत दादुरिया, प्रदेश युवा मोर्चा सचिव शिवानी दानी, पूर्व नगरसेवक संदीप जाधव, जयप्रकाश गुप्ता व मंडल अध्यक्ष कुणाल दुर्गेकर, श्रीकांत दुर्गेकर, श्याम गहरे आदि अनेक गणमान्य उपस्थित थे। 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 Most Watched Videos 👉 केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांनी आढावा बैठक घेतली

पावसामुळे प्रभावीत वस्त्यांतील रहिवाश्यांना सानुग्रह अनुदान द्या*

 *पावसामुळे प्रभावीत वस्त्यांतील रहिवाश्यांना सानुग्रह अनुदान द्या*  *ॲड. धर्मपाल मेश्राम यांचे उपमुख्यमंत्र्यांना निवेदन*  नागपूर. नागपूर शहरातील नाग नदी काठावरील, भांडेवाडी कचरा डम्पिंग परिसर व रिंग रोड च्या खोलगट भागातील रहिवाशी शुक्रवारी २२ सप्टेंबर रोजी रात्री आलेल्या मुसळधार पावसामुळे प्रभावित झाले आहेत. या ठिकाणच्या रहिवाशी नागरिकांचे जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले असून उपरोक्त भागातील रहिवाशी नागरिकांना सानुग्रह मदत देण्यात यावी, अशी मागणी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष व माजी नगरसेवक ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांना केली.  ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी सदर मागणीच्या निवेदनाची प्रत भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार श्री. चंद्रशेखर बावनकुळे, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर आणि मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांना देखील पाठविलेली आहे. नागपूर शहरातील प्रभाग क्रमांक २६ येथील नाग नदी काठावरील / रिंग रोड खालील / कचरा डम्पिंगमुळे प्रभावीत अशा सर्व वस्त्यांतील रहिवाशांना पावसाळ्यात मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागतात. मौजा वाठोडा परिसरातील पडोळे नगर, न्यू पँ...

दिव्यांगांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध योजनांची अंमलबजावणी - रामदास आठवले

 दिव्यांगांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध योजनांची अंमलबजावणी - रामदास आठवले Ø दिव्यांगांना साहित्य वाटपाचा जिल्हास्तरीय शुभारंभ Ø वर्धा तालुक्यातील 826 दिव्यांगांना साहित्याचे वाटप Ø प्रत्येक तालुक्यात होणार साहित्य वाटपाचा कार्यक्रम वर्धा, दि. 23 (जिमाका) : दिव्यांग व्यक्ती शरीराने अपंग असला तरी बुद्धीने मात्र तो हुशार असतो. या व्यक्तींना त्यांच्या दिव्यांगत्वावर मात करत मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाच्यावतीने विविध योजना राबविण्यात येत आहे. या योजनांची चांगली अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारीता राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले.  चरखा सभागृह येथे जिल्हा प्रशासन व समाज कल्याण विभागाच्यावतीने अलिम्को कंपनी मार्फत दिव्यांगांना साहित्य वितरणाच्या जिल्हास्तरीय शुभारंभाप्रसंगी श्री.आठवले बोलत होते. कार्यक्रमाला खा.रामदास तडस, आ.डॉ.पंकज भोयर, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, सेवाग्रामच्या सरपंच सुनिता ताकसांडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज गोहाड, जिल्हा नियोजन समिती सदस्य सुनील गफाट, जिल्हा परि...

गुणवंत सोनटक्के यांची काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या जनरल सेक्रेटरीपदी नियुक्ती

 गुणवंत सोनटक्के यांची काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या जनरल सेक्रेटरीपदी नियुक्ती नागपूर, प्रतिनिधी :शेखर गजबिये :महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाच्या जनरल सेक्रेटरी पदी नागपूर येथील सामाजिक कार्यकर्ते गुणवंत विठ्ठलराव सोनटक्के यांची नियुक्ती करण्यात आली.  सदर नियुक्ती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे प्रदेश अध्यक्ष डॉक्टर सिद्धार्थ हत्ती अंबीरे यांनी केली.  गुणवंत सोनटक्के हे सामाजिक कार्यामध्ये सक्रिय असून त्यांनी यापूर्वी युवा बुद्ध भीम मैत्रेय एकता संघाचे अध्यक्षपद, गगन मलिक फाउंडेशन कोर कमिटी सदस्य तसेच विविध सामाजिक व धार्मिक संघटनांमध्ये ते पदाधिकारी आहेत. त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

गुणवत्तापूर्ण व दर्जेदार विकास कामामुळेच जिल्ह्याचा नावलौकिक- पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

 गुणवत्तापूर्ण व दर्जेदार विकास कामामुळेच जिल्ह्याचा नावलौकिक- पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार *लखमापूर येथे हनुमान मंदिर परिसर सौंदरीकरणाचे लोकार्पण व पाण्याच्या टाकीचे भूमिपूजन* *चंद्रपूर, दि. 22* : नागपूर - चंद्रपूर मार्गावरील लखमापूर हनुमान मंदिर परिसर हा अध्यात्मिक ऊर्जा देणारा परिसर आहे. या परिसराच्या सौंदर्यीकरणासाठी 60 लक्ष रुपये मंजूर करण्यात आले होते, या परिसरातील अतिशय चांगले कामे झालेली आहे. शेवटी गुणवत्तापूर्ण व दर्जेदार कामांमुळेच जिल्ह्याचा नावलौकिक वाढतो, असे प्रतिपादन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. लखमापूर येथे हनुमान मंदिर परिसर सौंदर्यीकरणाचे लोकार्पण व नवीन पाण्याच्या टाकीचे भूमिपूजन करताना ते बोलत होते. यावेळी मंचावर देवराव भोंगळे, रामपाल सिंग, हनुमान काकडे, सरपंच शारदा राजूरकर, उपसरपंच प्रभाकर ताजने, अनिल डोंगरे, विलास टेंभुने, नामदेव आसुटकर, हेमा रायपूरे, फारुख शेख, हनुमान मंदिर देवस्थानचे अध्यक्ष सुरेश शर्मा, शांताराम चौखे, मनोज मानकर आदी मान्यवर उपस्थित होते. मंदिर परिसराच्या सौंदर्यी...

केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांच्या नागपूर येथील निवासस्थानी श्री गणरायाची विधिवत स्थापना

 केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांच्या नागपूर येथील निवासस्थानी श्री गणरायाची विधिवत स्थापना झाली. यावेळी ना. श्री. गडकरी यांच्यासह पत्नी सौ. कांचनताई गडकरी, स्नुषा सौ. ऋतुजा आणि सौ. मधुरा, नातवंड नंदिनी, सान्वी, कावेरी, निनाद, अर्जून यांची उपस्थिती होती. 

प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के जन्म दिवस पर डागा हॉस्पिटल नागपुर मे फल वितरण कार्यक्रम किया गया .

 भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यक मोर्चा महाराष्ट्र (नागपुर) की ओर से विश्व नेता यशस्वी प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के जन्म दिवस पर डागा हॉस्पिटल नागपुर मे फल वितरण कार्यक्रम किया गया . इस कार्यक्रम मे प्रमुख उपस्थित प्रदेश महामंत्री जुनेद खान जी मध्य नागपुर के लोकप्रिय विधायक मा.विकास कुंभारे जी, भाजपा नागपुर शहर महामंत्री गुड्डू विलास त्रिवेदी जी , शहर महामंत्री राम भाऊ आंबुलकर जी, भाजपा मध्य नागपुर अध्यक्ष श्रीकांत आगलावे जी, मध्य नागपुर चुनाव प्रमुख बंडू सुधीरजी राऊत, मध्य नागपुर संपर्क प्रमुख विनायक डेहनकर जी, अनिल जी मानापुरे , प्रमोद जी दहिकर , लीडर सरफराज़, शहनाज अली जी, रशीद शेख जी ग्यासुद्दीन काज़ी जी, बाबु शाहजी ,बाबु खान, समीर खान अमजद खान जी, अमानी कुरैशी जी व सभी पदाधिकारी भारी संख्या मे उपस्थित थे .

मेरी माटी मेरा देश भारतीय जनता पार्टी पश्चिम नागपुर के तरफ से कार्यक्रम लक्ष्मी भवन चौक में संपन्न हुआ.

 प्रधानमंत्री मा श्री नरेंद्रजी मोदी ऊनके जन्मदिन के उपलक्ष में साक्षरी अभियान व मेरी माटी मेरा देश भारतीय जनता पार्टी पश्चिम नागपुर के तरफ से कार्यक्रम लक्ष्मी भवन चौक में संपन्न हुआ.