विदर्भातील दूध उत्पादन वाढविणे काळाची गरज केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी : अग्रोव्हिजन’च्या बैठकीत शेतकऱ्यांना आवाहन
विदर्भातील दूध उत्पादन वाढविणे काळाची गरज केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी : अग्रोव्हिजन’च्या बैठकीत शेतकऱ्यांना आवाहन नागपूर - ‘शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर निघायचे असेल तर त्यांनी दूध उत्पादनावर भर दिला पाहिजे. येत्या काळात दुधाची मागणी वाढणार असल्याने यादृष्टीने शेतकऱ्यांचे प्रबोधन आणि प्रशिक्षणही तेवढेच आवश्यक आहे,’ असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी आज (शनिवार) केले. रामदासपेठ येथील हॉटेल सेंटर पॉईंट येथे ‘अॅग्रोव्हिजन’च्यावतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खासदार रामदास तडस, खासदार अशोक नेते, खासदार कृपाल तुमाने, माजी खासदार डॉ. विकास महात्मे, आमदार कृष्णा खोपडे, आमदार आशिष जयस्वाल, आमदार टेकचंद सावरकर, माजी आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे, माफसूचे कुलगुरू डॉ. नितीन पाटील, डॉ. सी.डी. मायी, रमेश मानकर, रवी बोरटकर आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती. दाभा येथील पीडीकेव्ही ग्राऊंडवर २४ ते २७ नोव्हेंबर या कालावधीत अॅग्रोव्हिजन प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित करण...