सीधे मुख्य सामग्री पर जाएं

संदेश

bawankule लेबल वाली पोस्ट दिखाई जा रही हैं

भाजपा कार्यकत्यांचा संयम सुटू शकतो!* - चंद्रशेखर बावनकुळे यांचा इशारा

*भाजपा कार्यकत्यांचा संयम सुटू शकतो!* - चंद्रशेखर बावनकुळे यांचा इशारा • उद्धव ठाकरेची भाषा कायदा सुव्यवस्था बिघडविणारी नागपूर, दि. 11.09.2024 उद्धव ठाकरे हे भाजपा नेत्यांवर करत असलेल्या टिकेमुळे भाजपा कार्यकर्ते त्यांचा संयम कधी सोडतील सांगता येत नाही, असा इशारा प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला. ते म्हणाले, उद्धव ठाकरे यांचे मानसिक संतुलन ढासळू लागले असून ते आता राजकारणाच्या मर्यादा देखील पाळू शकत नाहीत. त्यांची भाषा राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडविणारी आहे. यापूर्वीही त्यांना याबाबत सूचित केले आहे. मात्र वारंवार त्यांची भाषा वाईट होत चालली. " नागपूर येथे ते माध्यमांशी संवाद साधत होते, राज्यात शांतता रहावी ही आमची इच्छा आहे. मात्र उद्धव ठाकरे यांनी राज्यातील कायदा सुव्यवस्था बाधित करण्याचे ठरविले आहे, असे सांगून श्री बावनकळे म्हणाले, कुणबी-मराठा हे भावासारखे राहतात. त्यामुळे दोन भावांत वाद निर्माण करणे चुकीचे आहे. याबाबतीत सरकार योग्य तो निर्णय घेईल.  उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांना विकासाची चर्चा करायचीच नाही, केवळ आरोप करायचे आहेत. काँग्रेसचे जनतेत संभ्रम निर...

आरक्षणावरून अकलेचे तारे तोडू नका!- चंद्रशेखर बावनकुळे यांचा इशारा

  आरक्षणावरून अकलेचे तारे तोडू नका!- चंद्रशेखर बावनकुळे यांचा इशारा नागपूर, दि. 09.09.2024 : मराठा आरक्षण देण्याची भाजपाची भूमिका असून महाराष्ट्रातील महायुती सरकार मराठा समाजाला योग्य प्रकारे आरक्षण देण्यासाठी पुढाकार घेईल असा विश्वास व्यक्त करतानाच ‘मराठा व ओबीसी आरक्षणावरून दोन समाजात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका व अकलेचे तारे तोडू नका’ असा इशारा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला. ते नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधत होते. श्री बावनकुळे म्हणाले, एका घटकाचे आरक्षण दुसऱ्या घटकाला देणे योग्य नाही. ओबीसीचे आरक्षण कायम राखून मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी भाजपाची भूमिका आहे. मराठा आरक्षण दिल्यावर कोर्टात चकरा माराव्या लागणार नाही. फसवणूक झाल्याची भावना निर्माण होणार नाही, अशी भूमिका सरकारला घ्यावी लागेल. मराठा आरक्षणासाठी आर्थिक-सामजिक सर्वेक्षणाच्या आधारावर सरकार योग्य निर्णय घेईल, असेही ते म्हणाले.  पंकजा मुंडे यांच्या आरक्षणावरून कोणताही किंतु-परंतु करण्याची गरज नाही. त्यांनी यात्रेचा उद्देश व भूमिका आधीच जाहीर केली आहे. राज्यात ती...