माजी सैनिक, सैनिकांनी घेतला आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ 🖊️प्रविण जगताप 🖊️वर्धा जिल्हा प्रतिनिधी मो . 9284981757 वर्धा, दि. 27 : इसिएचएस पॉलिक्लिनिक आणि आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे यांच्या संयुक्त विद्यमाने माजी सैनिक, सेवारत सैनिक व त्यांच्या परिवारासाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात 150 माजी सैनिक, सेवारत सैनिक व त्यांच्या परिवारातील सदस्यांनी लाभ घेतला. जुनी जिल्हा परिषद ईमारत येथील इसीएचएस पॉलिक्लिनिक येथे आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिरामध्ये माजी सैनिक, सेवारत सैनिक व त्यांच्या परिवारांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून आरोग्य तपासण्या करुन घेतल्या. त्यासोबतच आवश्यक असलेल्या आजाराबाबत एक्स-रे व रक्त तपासणी करुन घेतली. शिबिरास पुलगाव सीएडी कॅम्पचे कर्नल गोपी आनंद एन, प्रशासकिय अधिकारी तथा कर्नल एम. राउतेला, इसीएचएसचे अधिकारी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. शिबिराच्या यशस्वीतेसाठी इसीएचएस पॉलिक्लिनीकचे डॉ.एस.एस. रावलानी, डॉ.एस.के.थत्ते, सुभेदार मेजर निशिकांत होरे व कर्मचा-यांचे योगदान लाभले.