सीधे मुख्य सामग्री पर जाएं

संदेश

Nitin Gadkari लेबल वाली पोस्ट दिखाई जा रही हैं

जागर शारदेचा, रंग मेहंदीचा’ आजपासून खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सव समितीचा उपक्रम : ७ नोव्हेंबरपर्यंत ३०० ठिकाणी आयोजन

  जागर शारदेचा, रंग मेहंदीचा’ आजपासून  खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सव समितीचा उपक्रम : ७ नोव्हेंबरपर्यंत ३०० ठिकाणी आयोजन नागपूर शहरात आदिशक्तीच्या जागराचा, गौरवाचा उत्सव म्हणून साजरा होत असलेल्या शारदीय नवरात्रोत्सवाला उद्यापासून (शनिवार, दि. 28 ऑक्टोबर ) प्रारंभ होत आहे. या निमित्ताने खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीने यंदाही मेहंदीचे रंग भरले जाणार आहेत. शहरातील ३०० ठिकाणांवर ७ नोव्हेंबरपर्यंत ‘जागर शारदेचा, रंग मेहंदीचा’ हा उपक्रम राबविला जाणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून कला, साहित्य, संस्कृती व परंपरांचा प्रचार-प्रसार होण्यासाठी सण व उत्सवांना ‘सांस्कृतिक रुप’ देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. नागपूर शहराच्या विविध भागांमध्ये तीनशे स्थळांवर शारदोत्सव मंडळांमध्ये मेहंदी कलाकार महिलांच्या हातावर मेहंदी रेखाटणार आहेत. या उपक्रमाच्या संयोजिका मनिषा काशीकर असून गिनेस बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झालेल्या प्रसिद्ध मेहंदी आर्टिस्ट सुनीता धोटे यांच्या टीमद्वारे मेहंदी रंगविण्यात येणार आहे. ज्योती देवघरे, रेखा निमजे...

संशोधनाला व्यावहारिकतेची जोड आवश्यक -केंद्रीय मंत्री ना. श्री. नितीन गडकरी : आयुर्वेद महाविद्यालयातील चर्चासत्राचे उद्घाटन

  संशोधनाला व्यावहारिकतेची जोड आवश्यक -केंद्रीय मंत्री ना. श्री. नितीन गडकरी : आयुर्वेद महाविद्यालयातील चर्चासत्राचे उद्घाटन नागपूर – अशक्य वाटणारी गोष्टही संशोधनातून शक्य आहे. पण या संशोधनाला व्यावहारिकतेची आणि वास्तविकतेची जोड दिली तर त्याची लोकप्रियता वाढविणे अधिक सहज होते, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी (आज) केले. हनुमान नगर येथील श्री आयुर्वेद महाविद्यालयात आयोजित चर्चासत्राचे त्यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. बदलत्या जीवनशैलीत श्रीधान्याची (भरडधान्य) भूमिका या विषयावर पं. राम नारायण शर्मा स्मृती राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाला बैद्यनाथचे प्रमुख सुरेश शर्मा, गोविंदप्रसाद उपाध्याय, बनवारीलाल गौड, प्राचार्य डॉ. ब्रिजेश मिश्रा, डॉ. वेदप्रकाश शर्मा, संजय जोशी, पुखराज बंग, रामेश्वर पांडे, रामकृष्ण छांगानी, संतोष शर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती. ना. श्री. गडकरी म्हणाले, ‘भरडधान्यांचे आरोग्यासाठी खूप महत्त्व आहे. त्यादृष्टीने अनेक संशोधने झाली. काही संशोधनांमध्ये यश आले, काहींमध्ये अपयश आले...

विदर्भातील दूध उत्पादन वाढविणे काळाची गरज केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी : अग्रोव्हिजन’च्या बैठकीत शेतकऱ्यांना आवाहन

  विदर्भातील दूध उत्पादन वाढविणे काळाची गरज केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी : अग्रोव्हिजन’च्या बैठकीत शेतकऱ्यांना आवाहन नागपूर - ‘शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर निघायचे असेल तर त्यांनी दूध उत्पादनावर भर दिला पाहिजे. येत्या काळात दुधाची मागणी वाढणार असल्याने यादृष्टीने शेतकऱ्यांचे प्रबोधन आणि प्रशिक्षणही तेवढेच आवश्यक आहे,’ असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी आज (शनिवार) केले. रामदासपेठ येथील हॉटेल सेंटर पॉईंट येथे ‘अॅग्रोव्हिजन’च्यावतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खासदार रामदास तडस, खासदार अशोक नेते, खासदार कृपाल तुमाने, माजी खासदार डॉ. विकास महात्मे, आमदार कृष्णा खोपडे, आमदार आशिष जयस्वाल, आमदार टेकचंद सावरकर, माजी आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे, माफसूचे कुलगुरू डॉ. नितीन पाटील, डॉ. सी.डी. मायी, रमेश मानकर, रवी बोरटकर आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती. दाभा येथील पीडीकेव्ही ग्राऊंडवर २४ ते २७ नोव्हेंबर या कालावधीत अॅग्रोव्हिजन प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित करण...

केंद्रीय मंत्री मा. श्री. नितीन गडकरी यांचा जनसंपर्क कार्यक्रम ८ ऑक्टोबरला

 केंद्रीय मंत्री मा. श्री. नितीन गडकरी यांचा जनसंपर्क कार्यक्रम ८ ऑक्टोबरला नागपूर : केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री मा. श्री. नितीनजी गडकरी यांचा जनसंपर्क कार्यक्रम रविवार, ८ ऑक्टोबर २०२३ रोजी आयोजित करण्यात आला आहे. खामला चौकाजवळील ज्युपिटर शाळेच्या बाजूला मा. मंत्री महोदय यांच्या जनसंपर्क कार्यालयात सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत हा कार्यक्रम होईल. मा. मंत्री महोदय नागरिकांना व्यक्तिशः भेटतील आणि त्यांच्याशी संवाद साधतील. नागरिकांनी आपल्या समस्या, अडचणी, मागण्या लेखी स्वरुपात (आवश्यक कागदपत्रे जोडून) आणाव्यात. तसेच आपली लेखी निवेदने मा. मंत्री महोदयांना द्यावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

वाहन भंगारात काढण्याचे धोरण सर्वांसाठीच लाभदायक असून सर्व संबंधितांनी पुढे येऊन या धोरणाला पाठिंबा द्यावा : गडकरी यांचे आवाहन

वाहन भंगारात काढण्याचे धोरण सर्वांसाठीच लाभदायक असून सर्व संबंधितांनी पुढे येऊन या धोरणाला पाठिंबा द्यावा : गडकरी यांचे आवाहन नवी दिल्ली : वाहन भंगारात काढण्याचे धोरण सर्वांसाठीच लाभदायक असून सर्व संबंधितांनी पुढे येऊन या धोरणाला पाठिंबा द्यावा असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे . आज नवी दिल्लीत संबंधितांच्या सल्लामसलत सत्राला ते संबोधित करत होते. वाहनांसाठी लवचिक मागणी निर्माण करण्यासाठी मंत्रालयाने महामार्गांचे जागतिक दर्जाचे जाळे तयार करणे, बसेसचे विद्युतीकरण आणि वाहनांची अनिवार्य स्वयंचलित फिटनेस चाचणी यांसारखे अनेक उपक्रम हाती घेतले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. वाहन निर्माण उद्योगातील मूळ उपकरण उत्पादकांनी (OEMs) त्यांची उत्पादन क्षमता वाढवण्याच्या दिशेने काम केले पाहिजे आणि देशाला जगातील सर्वात मोठा वाहन उद्योग होण्यासाठी मदत केली पाहिजे, असेही ते म्हणाले. या धोरणामुळे वाहन निर्मिती क्षेत्राला सर्वात जास्त फायदा मिळणार असल्यामुळे या क्षेत्राने पुढाकार घेऊन, स्वयंचलित चाचणी केंद्रे (ATS) आणि नोंदणीकृत व्हेईकल स्क्रॅपिंग फॅसिलिटीज (R...

स्व. अरविंद शहापूरकर यांचे भाजपच्या संघटनात्मक उभारणीत मोठे योगदान- केंद्रीय मंत्री ना. श्री. नितीन गडकरी

 स्व. अरविंद शहापूरकर यांचे भाजपच्या संघटनात्मक उभारणीत मोठे योगदान- केंद्रीय मंत्री ना. श्री. नितीन गडकरी केंद्रीय मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी दिला आठवणींना उजाळा नागपूर – भारतीय जनता पक्षाने अत्यंत कठीण काळ बघितला आहे. हजारो कार्यकर्त्यांच्या योगदानामुळे पक्षाला आज चांगले दिवस आले आहेत. स्व. अरविंद शहापूरकर यांनी देखील संघर्षाच्या काळात भाजपच्या संघटनात्मक उभारणीत मोठे योगदान दिले, असे सांगतानाच केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी स्व. शहापूरकर यांच्या आठवणींना उजाळा दिला. भारतीय जनता पार्टी नागपूरच्या वतीने बीआरए मुंडले सभागृहात ज्येष्ठ भाजप नेते स्व. अरविंद शहापूरकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सभा आयोजित करण्यात आली. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री ना.श्री. देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महानगर सहसंघचालक श्री. श्रीधर घाडगे, ज्येष्ठ प्रचारक श्री. रवीजी भुसारी, माजी आमदार श्री. चैनसुख संचेती, श्रीमती मिरा शहापूरकर, आमदार श्री. रणधीर सावरकर, श्री. जगदीश गुप्ता, भाजप संघटन मंत्री श्री. उपेंद्र कोठेकर, भाजप शहराध्यक्ष श्री. ब...

उत्तम शिक्षणातून मिळेल प्रगतीची दिशा -केद्रीय मंत्री ना. श्री. नितीन गडकरी

 उत्तम शिक्षणातून मिळेल प्रगतीची दिशा -केद्रीय मंत्री ना. श्री. नितीन गडकरी : चर्मकार सेवा संघातर्फे गुणवंतांचा सत्कार नागपूर - उत्तम शिक्षण हा विकासाचा पाया आहे. चर्मकार समाजाला विकासाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी मुलांना चांगले शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने प्रयत्न करायचे आहेत. गुणवंतांच्या सत्कारातून त्याची प्रेरणा नक्कीच मिळेल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी केले.  चर्मकार सेवा संघाच्या वतीने गांधीसागर येथील शिक्षक सहकारी बँकेच्या सभागृहात गुणवंतांचा सत्कार सोहळा व समाज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी आमदार प्रवीण दटके, संस्थेचे प्रमुख भैय्यासाहेब बिघाणे आदींची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. ना. श्री. गडकरी यांनी सुरुवातीला श्री संत रविदास यांना अभिवादन केले. ते म्हणाले, ‘ गरिबांच्या आयुष्यातील अंधःकार दूर करून त्यांना उजेडाचा मार्ग सापडावा, यासाठी मी श्री संत रविदास यांच्या चरणी प्रार्थना करतो. भैय्यासाहेब बिघाणे यांच्यासारखी मंडळी गेली अनेक वर्षे समाजाच्या परिवर्तनासाठी काम करीत आहेत, याचा मला आनंद आहे. समाजाचा वि...

केन्द्रीय मंत्री नितिन गडकरी जी ने आज श्री जय गणेश उत्सव मंडल में भेंट दी व श्री के पूजन व दर्शन लिए

 नागपुर शहर के खासदार व केन्द्रीय मंत्री सम्माननीय नितिन गडकरी जी ने आज श्री जय गणेश उत्सव मंडल, पेंशन लाईन, राजभवन गार्डन परिसर में भेंट दी व श्री के पूजन व दर्शन लिए।          प्रमुख उपस्थिति पूर्व नगरसेवक सुनिल अग्रवाल, पूर्व नगरसेविका प्रगति पाटील, पूर्व नगरसेवक निशांत गांधी व नगर सचिव लक्ष्मीकांत दादुरिया, प्रदेश युवा मोर्चा सचिव शिवानी दानी, पूर्व नगरसेवक संदीप जाधव, जयप्रकाश गुप्ता व मंडल अध्यक्ष कुणाल दुर्गेकर, श्रीकांत दुर्गेकर, श्याम गहरे आदि अनेक गणमान्य उपस्थित थे। 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 Most Watched Videos 👉 केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांनी आढावा बैठक घेतली

केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांच्या नागपूर येथील निवासस्थानी श्री गणरायाची विधिवत स्थापना

 केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांच्या नागपूर येथील निवासस्थानी श्री गणरायाची विधिवत स्थापना झाली. यावेळी ना. श्री. गडकरी यांच्यासह पत्नी सौ. कांचनताई गडकरी, स्नुषा सौ. ऋतुजा आणि सौ. मधुरा, नातवंड नंदिनी, सान्वी, कावेरी, निनाद, अर्जून यांची उपस्थिती होती. 

कृतज्ञता, आभार अन् ओथंबलेल्या भावना! ना. श्री. नितीन गडकरी यांना भेटून व्यक्त झाली गर्दी

 कृतज्ञता, आभार अन् ओथंबलेल्या भावना ना श्री. नितीन गडकरी यांना भेटून व्यक्त झाली गर्दी नागपूर – कुणी म्हणाले, ‘साहेब, पेंशनचे काम झाले’, कुणी म्हणाले नोकरी लागली... तर कुणी अनेक वर्षांपासून खोळंबलेले प्रशासकीय काम झाल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. हे चित्र होते केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यक्रमातील. कृतज्ञता, आभार अन् ओथंबलेल्या भावनांनी भारवलेले क्षण यंदाच्या जनसंपर्क कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरले. खामला येथील जनसंपर्क कार्यालयात सकाळपासूनच गर्दी होती. गर्दीतील प्रत्येकाला व्यक्त व्हायचे होते. काहींच्या हाती मागण्यांची निवेदने होती तर काही लोक केवळ कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आले होते. ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि महिलांच्या संदर्भातील मागण्यांची निवेदने ना. श्री. गडकरी यांनी स्वीकारली आणि त्याचवेळी ‘आपण पुढाकार घेतल्यामुळे काम झाले’ अशी कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या नागरिकांच्या शुभेच्छाही त्यांनी स्वीकारल्या. स्व. भानुताई गडकरी ग्रामीण विकास संस्थेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या नेत्र व कर्ण दोष तपासणी शिबिराचा लाभ मिळत असल्याबद...

नव्या पिढीमध्ये शास्त्रीय संगीताची गोडी निर्माण करावी लागेल-केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

 नव्या पिढीमध्ये शास्त्रीय संगीताची गोडी निर्माण करावी लागेल-केंद्रीय मंत्री नितीन गडकरी  महामहोपाध्याय स्व. पं. प्रभाकरराव खर्डेनवीस जन्मशताब्दी महोत्सव नागपूर – स्व. पं. प्रभाकरराव खर्डेनवीस यांनी ज्या कलेला आयुष्य समर्पित केले, त्या शास्त्रीय संगीताबद्दल नवीन पिढीमध्ये गोडी निर्माण करणे हे मोठे आव्हान आहे. ते आपण साध्य करू शकलो तर तीच प्रभाकरराव खर्डेनवीस यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी आज (रविवार) केले. आयटी पार्क येथील पर्सिस्टंट सभागृहात आयोजित महामहोपाध्याय स्व. पं. प्रभाकरराव खर्डेनवीस जन्मशताब्दी महोत्सवात ना. श्री. गडकरी बोलत होते. यावेळी श्रीमती उषा खर्डेनवीस, जन्मशताब्दी महोत्सव समितीचे अध्यक्ष प्रा. श्यामसुंदर खर्डेनवीस, संयोजक रविंद्र जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. ते म्हणाले, ‘लोकांचे मनोरंजन आवश्यक आहे, पण त्याच वेळी त्यांचे प्रबोधन करणेही आवश्यक आहे. भारतीय शास्त्रीय संगीत नवीन पिढीपर्यंत पोहोचविणे हेही महत्त्वाचे काम आहे. पं. प्रभाकरराव यांच्यासारखे तज्ज्ञ आज आपल्यात नाहीत. पण शास...

केंद्रीय मंत्री मा. श्री. नितीन गडकरी यांचा जनसंपर्क कार्यक्रम १० सप्टेंबरला

 केंद्रीय मंत्री मा. श्री. नितीन गडकरी यांचा जनसंपर्क कार्यक्रम १० सप्टेंबरला नागपूर : केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री मा. श्री. नितीनजी गडकरी यांचा जनसंपर्क कार्यक्रम रविवार, १० सप्टेंबर २०२३ रोजी आयोजित करण्यात आला आहे. खामला चौकाजवळील ज्युपिटर शाळेच्या बाजूला मा. मंत्री महोदय यांच्या जनसंपर्क कार्यालयात सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत हा कार्यक्रम होईल. मा. मंत्री महोदय नागरिकांना व्यक्तिशः भेटतील आणि त्यांच्याशी संवाद साधतील. नागरिकांनी आपल्या समस्या, अडचणी, मागण्या लेखी स्वरुपात (आवश्यक कागदपत्रे जोडून) आणाव्यात. तसेच आपली लेखी निवेदने मा. मंत्री महोदयांना द्यावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

केंद्रीयमंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते गायक अनुराधा पौडवाल व विशाल जोगदेव यांनी गायलेल्या श्री चक्रधर चालीसा" या गीताचे विमोचन

 केंद्रीयमंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते गायक अनुराधा पौडवाल व विशाल जोगदेव यांनी गायलेल्या श्री चक्रधर चालीसा" या गीताचे विमोचन - अनुराधा पौडवाल व विशाल जोगदेव यांनी गायलेल्या "श्री चक्रधर चालीसा" या गीताचे केंद्रीयमंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते विमोचन. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या अवतार दिना निमित्य स्वामींचे विचार व कार्य सर्वं तळागळातील लोकांना कळावे, या शुद्ध हेतुने विशाल जोगदेव प्रोडक्शन निर्मित "श्री चक्रधर चालीसा" या गीता चे विमोचन केंद्रीयमंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते काल नागपुर येथे करण्यात आले. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीं ची ही चालीसा पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल व महानुभव पंथाचे भजनसम्राट विशाल जोगदेव यांनी त्यांच्या सुमधुर आवाजात गायलेली आहे. शिवाय यात प्रज्वल भोयर व देवयानी जोशी यांनीं आपल्या अभिनयाचा रंग चढवलेला आहे. या गीताचे दिग्दर्शन व संकलन सम्राट गोटेकर यांनी केलेले असुन विशाल जोगदेव यांनी है गीत लिहिलेले तथा संगीतबद्ध केलेले असुन चारुदत्त जिचकार यांच्या स्टूडिओला हे गीत रिकॉर्ड करण्यात आलेले आहे. या गीता साठी प.पू.प.म.वैरागी बाबा ...

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पाठबळामुळे झाला इंजिनियर : खामगावच्या महादेव चरपेचा अनोखा संघर्ष

  तरुणाच्या जिद्दीपुढे स्वप्ने झुकतात तेव्हा... केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पाठबळामुळे झाला इंजिनियर : खामगावच्या महादेव चरपेचा अनोखा संघर्ष नागपूर : बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव परिसरातील जळका तेली नावाचे एक छोटेसे गाव. लोकसंख्या जेमतेम बारा-पंधराशे. या गावात वर्षानुवर्षे भाड्याच्या घरात राहणाऱ्या चरपे कुटुंबातील मुलगा इंजिनियर होण्याचे स्वप्न बघतो. आपलं स्वप्न फक्त नितीन गडकरीच पूर्ण करू शकतात, या विश्वासाने नागपूर गाठतो...सहा वर्षांत आपल्या जिद्दीपुढे स्वप्नांना झुकवतो आणि इंजिनियर होऊन एका मोठ्या कंपनीत नोकरीलाही लागतो. ही संघर्षगाथा आहे महादेव बाळकृष्ण चरपे नावाच्या एका ध्येयवेड्या तरुणाची. वडील एका बंद पडलेल्या कारखान्याचे केअरटेकर आणि आई पुष्पा गृहिणी. महादेवला दहाव्या वर्गात अवघे ४३ टक्के गुण मिळाले, तरीही त्याच्यात इंजिनीयर होण्याची जिद्द निर्माण झाली. त्यासाठी एक निमित्त ठरले. दरवर्षी खामगावमधून शेगाव येथे संत गजानन महाराजांची वारी निघते. एका वर्षी या वारीत महादेवची एका व्यक्तीशी ओळख झाली. ‘आपण काय करता?’ असे त्याने कुतुहलाने त्याला विचारले. ती व्यक्ती वैमानिक असल्...

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली वस्त्रोद्योग व्यापाऱ्यांसोबत चर्चा

  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली वस्त्रोद्योग व्यापाऱ्यांसोबत चर्चा   प्रस्तावित व्यापारी संकुलाचे प्रेझेंटेशन : सूचना पाठविण्याचे आवाहन  नागपूर : गणेशपेठ येथील प्रस्तावित वस्त्रोद्योग संकुलाच्या (टेक्स्टाईल कॉम्प्लेक्स) संदर्भात केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी आज (शुक्रवार) नागपुरातील व्यापाऱ्यांसोबत चर्चा केली. या संकुलाच्या संदर्भात व्यापाऱ्यांना सूचना मागविण्यात आल्या आहेत. म्हाडाच्या वतीने रामदासपेठ येथील हॉटेल सेंटर पॉईंटमध्ये संकुलाच्या संकल्पचित्राचे प्रेझेंटेशन देण्यात आले. यावेळी ना. श्री. नितीन गडकरी, जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, महानगरपालिका आयुक्त अभिजित चौधरी, म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल, म्हाडा नागपूरचे सीईओ श्री. मेघमारे, बांधकाम व्यवसायिक बी.जी. शिर्के आदींची प्रमुख उपस्थिती होती. गिता मंदिरच्या पुढे एम्प्रेस मीलच्या जागेवर वस्त्रोद्योग संकुल (टेक्स्टाईल कॉम्प्लेक्स) प्रस्तावित आहे. १४ लाख चौरस फुटाच्या जागेवर एक असे व्यापारी संकुल असेल ज्याठिकाणी केवळ कपड्यांची बाजारपेठ असेल. याठिकाणी मोठ्या व किरकोळ व्या...

वैद्यकीय क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर वाढावा : केद्रीय मंत्री ना. श्री. गडकरी

  वैद्यकीय क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर वाढावा - केद्रीय मंत्री ना. श्री. गडकरी  नॅशनल पेडियाट्रिक युरोलॉजी कॉन्फरन्सचे उद्घाटन नागपूर - भारत सरकारने शिक्षण आणि वैद्यकीय क्षेत्राला विशेष प्राधान्य दिले आहे. या क्षेत्रात विकास होणे सर्वसामान्य जनतेच्या सोयीचे आहे. विशेषतः वैद्यकीय क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होत आहे. पण हा वापर अधिक प्रमाणात वाढणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी आज (शुक्रवार) केले. इंडियन असोसिएशन अॉफ पेडियाट्रिक सर्जनच्या वतीने आयोजित ११व्या नॅशनल पेडियाट्रिक युरोलॉजी कॉन्फरन्सचे उद्घाटन ना. श्री. गडकरी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. किम्स-किंग्सवे हॉस्पिटलमध्ये या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला किम्स ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. भास्कर राव, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राज गजभीये, दिल्लीतील एम्सचे अधिष्ठाता प्रो. एम. बाजपेयी यांची प्रमुख उपस्थिती होती. ना. श्री. गडकरी यांनी ‘मेडिकल इंजिनियरिंग’ या संकल्पनेकडे सर्वांच...

Shri Nitin Gadkari launches world's first prototype of the BS 6 Stage II ‘Electrified Flex Fuel Vehicle’

  The emphasis of Modi Government on ethanol aligns with objectives of attaining energy self-sufficiency, doubling farmers' income, transitioning them to Urjadata while continuing to support them as Annadata and positively impacting the environment :Shri Gadkari Union Minister for Road Transport and Highways Shri Nitin Gadkari launched the world's first prototype of the BS 6 Stage II ‘Electrified Flex Fuel Vehicle’, developed by Toyota Kirloskar Motor in the presence of Union Minister Shri Hardeep Singh Puri , Union Minster Shri Mahendra Nath Pandey , MD & CEO of Toyota Shri Masakazu Yoshimura , MD & CEO of Kirloskar Systems Limited Geetanjali Kirloskar , Ambassador, Diplomats from Japan Embassy, higher officials and advisors in New Delhi today. Shri Gadkari said this innovative vehicle is based on the Innova Hycross and is engineered to adhere to India's stricter emission standards, marking it as the first-ever BS 6 (Stage II) Electrified Flex Fuel Vehicle prototy...

रोजगार मेळाव्यात सन्मान ! प्रक्रियेद्वारे नियुक्तीपत्रे वाटप

  श्री प्रशांत आर. जम्भोलकर, पुलिस उप महानिरीक्षक, ग्रुप केन्द्र, केन्द्रीय राखीव पोलीस बल, नागपुर यांनी दिनांक 28.08.2023 रोजी परम आदरनीय नितीन गडकरी, केंन्द्रीय मंत्री, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय, भारत सरकार, श्री रामदास आठवले, राज्यमंत्री, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय, भारत सरकार यांच्या यशस्वी नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली केंद्र सरकारच्या विभाग/कार्यालयांमध्ये रिक्त पदे आणि नव्याने निर्माण झालेल्या पदे भरण्याच्या प्रक्रियेद्वारे, निवडलेल्या उमेद्वारांना ग्रुप सेंटर नागपूर येथे आयोजित रोजगार मेळाव्यात सन्मान प्रक्रियेद्वारे नियुक्तीपत्रे देण्यात आली. आपल्या सर्वांना माहीत आहे की, देशाचे यशस्वी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली देश दिवसेंदिवस यशाच्या नवीन शिखरांना स्पर्श करत आहे. भारत सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजनांतर्गत बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या वचनबद्धतेची जाणीव करून देत आहे आणि निर्धारित लक्ष्याकडे वाटचाल करत आहे. आज दिनांक 28.08.2023 रोजी नवी दिल्ली येथून डिजिटल माध्यमातून पंत प्रधानांच्या हस्ते रोजगार मेळाव्याच्य...

आदिवासींचा ‘हॅपिनेस इंडेक्स’ वाढवायचा आहे - केंद्रीय मंत्री ना. श्री. नितीन गडकरी : एकल विद्यालयाच्या शिक्षक-पर्यवेक्षक प्रशिक्षण वर्गाचा समारोप

आदिवासींचा ‘हॅपिनेस इंडेक्स’ वाढवायचा आहे  -केंद्रीय मंत्री ना. श्री. नितीन गडकरी  एकल विद्यालयाच्या शिक्षक-पर्यवेक्षक प्रशिक्षण वर्गाचा समारोप नागपूर : देशातील सामाजिक विषमता दूर करण्याचा प्रयत्न करण्याची, विशेषत्वाने आदिवासी, मागास लोकांच्या जीवनात परिवर्तन होऊन ते चांगले जीवन कसे जगतील, यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे. कै. लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्था त्याच प्रयत्नांवर २७ वर्षे कार्य करीत आहे. शेवटच्या माणसाच्या जीवनात परिवर्तन घडविणे आणि त्यांच्या जीवनाचा ‘हॅपिनेस इंडेक्स’ (सुखांक) वाढविण्याचा निर्धार आम्ही केला आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी केले.     कै. लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्थेच्या वतीने रेशीमबाग येथील महर्षी व्यास सभागृहात आयोजित एकलव्य एकल विद्यालयाच्या शिक्षक-पर्यवेक्षक प्रशिक्षण वर्गाच्या समारोप सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी इंडिया टिव्हीचे एडिटर-इन-चीफ तसेच चेअरमन श्री. रजत शर्मा, अंजनगाव सुर्जी येथील देवनाथ पिठाचे पीठाधीश्वर श्री. जितेंद्रनाथ महाराज, कै. लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्थेचे अध्...