सीधे मुख्य सामग्री पर जाएं

संदेश

Congress लेबल वाली पोस्ट दिखाई जा रही हैं

गुणवंत सोनटक्के यांची काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या जनरल सेक्रेटरीपदी नियुक्ती

 गुणवंत सोनटक्के यांची काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या जनरल सेक्रेटरीपदी नियुक्ती नागपूर, प्रतिनिधी :शेखर गजबिये :महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाच्या जनरल सेक्रेटरी पदी नागपूर येथील सामाजिक कार्यकर्ते गुणवंत विठ्ठलराव सोनटक्के यांची नियुक्ती करण्यात आली.  सदर नियुक्ती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे प्रदेश अध्यक्ष डॉक्टर सिद्धार्थ हत्ती अंबीरे यांनी केली.  गुणवंत सोनटक्के हे सामाजिक कार्यामध्ये सक्रिय असून त्यांनी यापूर्वी युवा बुद्ध भीम मैत्रेय एकता संघाचे अध्यक्षपद, गगन मलिक फाउंडेशन कोर कमिटी सदस्य तसेच विविध सामाजिक व धार्मिक संघटनांमध्ये ते पदाधिकारी आहेत. त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

आमची सरकार आल्यास शहीदांच्या कुटुंबांना च्या मदती साठी स्पेशल जीआर काढू: प्रांतध्यक्ष नानाभाऊ पटोले

 आमची सरकार आल्यास शहीदांच्या कुटुंबांना च्या मदती साठी स्पेशल जीआर काढू: प्रांतध्यक्ष नानाभाऊ पटोले लेह लद्दाख मध्ये शहीद झालेल्या गोंदिया तालुक्या तील तुमखेडा गांवाच्या वीर जवान सुरेश नागपूरे यांच्या घरी जाऊन प्रांतध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी त्यांच्या पत्नी अभिलाषा आई-वडील हुकलाल नागपुरे व भाऊ संतोष नागपुरे सगळ्यांशी चर्चा करून सात्वानाा दिला व कोणतीही मदद लागल्यास मला सांगा मी तुमच्या पाठीशी आहे असं आश्वासन दिलं व कुटुंबीयांना सांगितलं की इंजि राजीव ठकरेले तुमच्या समाजा चा उत्तम कार्यकर्ता आहे हा माझ्या संपर्कात आहे काही लागलं तर याला तुम्ही सांगा तुमची पूर्ण मदत होईल. येणाऱ्या 2024 च्या निवडणुकीत आमची सरकार आली की देशासाठी शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबा च्या मदतीसाठी स्पेशल जीआर काढून. अशी गवाही जवानाच्या पत्नी अभिलाषा सुरेश नागपुरे ला दीली व शिक्षणाच्या योग्यते नुसार शासकीय नौकरी देऊ असं आश्वासन सुद्धा नानाभाऊ यांनी दिलं. जवानाची ६ महिण्या ची मुलगी सुरभि ला ही आपल्या कुशीत घेतला. याप्रसंगी प्रांत उपाध्यक्ष नाना गावंडे, सेवादलचे प्रांत सहसचिव इंजि राजीव ठकरेले, किसान आघाडी...

भाजपच्या काळात महागाई, बेरोजगारीने प्रचंड हाल - डॉ. नितीन राऊत

मनपाच्या पंचशील वाचनायातील विद्यार्थ्यांशी संवाद भाजपच्या काळात महागाई, बेरोजगारीने प्रचंड हाल - डॉ. नितीन राऊत नागपूर, दिनांक-०८ सप्टेंबर २०२३ :- पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारच्या कार्यकाळात महागाई प्रचंड वाढली आणि जनतेसमोर जीवनमरणाचा प्रश्न उभा ठाकला आहे. बेरोजगारी गत 45 वर्षांतील सर्वात जास्त आहे, रुपयाची ऐतिहासिक घसरण झाली पण खासगीकरणातून मोदींचे उद्योगपती मित्र मात्र मालामाल झाले, असा आरोप काँग्रेसचे जेष्ठ नेते व माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केला आहे. ते आज निघालेल्या लोकसंवाद यात्रे दरम्यान नागपुरात बोलत होते. सकाळी 07.00 वाजता मिलिंद नगर येथील बुद्ध विहार पासून लोकसंवाद पदयात्रा सुरु झाली. वैशाली नगर हाउसिंग बोर्ड कॉलनी, वैशाली नगर तथागत बुद्ध विहार, हनुमान सोसायटी परिसर, मेंहदीबाग चौक, सुजाता नगर बुद्ध विहार, पंचशील नगर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाला माल्यार्पण करुन खोब्रागडे नगर, आदर्श नगर, गुरुद्वारा आदर्श नगर, पंचशील नगर रोड, ताज नगर येथून पदक्रमण करुन चार खंबा चौक येथे समाप्त झाली. तसेच पदयात्राचा दुसरा टप्पा सायंकाळी चार खंबा चौक येथून सुरु झा...

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित जन संवाद सभा व जन संवाद पद यात्रा

  नागपुर :आज दि.०७/०९/२०२३ ला मा.आमदार विकास ठाकरे साहेब अध्यक्ष नागपूर शहर (जिल्हा) महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित जन संवाद सभा व जन संवाद पद यात्रा देवडिया काँगेस भवन,महाल,नागपूर येथून काँग्रेस च्या हजारो कार्यकर्त्यांसोबत सुरू झाली. त्यातप्र मुख उपसथिती मा.आमदार नानाभाऊ पटोले, मा.विलासरावजी मुत्तेमवार माजी केंद्ीयमंत्री,भारत सरकार. काँगेस कमिटीचे सर्व प्रदेश प्रतिनिधी व पदाधिकारी उपस्थित होते तसेच प्रचंड प्रमाणात विविध भागातून काँगेस चे कार्यकर्ते उपस्थित होते  धिरज ठाकुर (सामाजिक कार्यकर्ता) यांनी माहिती दिली.

मोदी सरकारने उज्ज्वला योजनेतून महिलांकडून करोडोंची रक्कम लुटली - आ. रवींद्र धंगेकर

 मोदी सरकारने उज्ज्वला योजनेतून महिलांकडून करोडोंची रक्कम लुटली - आ. रवींद्र धंगेकर येणाऱ्या काळामध्ये केंद्र आणि राज्यामध्ये सत्ता परिवर्तन - डॉ. कैलास कदम. पिंपरी, : रक्षाबंधनच्या आदल्या दिवशी केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत २०० रुपयाची कपात केली आहे. ही कपात २०२४ ची लोकसभा निवडणूक तसेच राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगना व मिझोराम या ५ राज्यातील विधानसभा निवडणुका डोळ्यापुढे ठेवून केली आहे. केवळ सत्तेसाठी जनतेला प्रलोभन दाखवण्याचा हा केविलवाना प्रयत्न या मोदी सरकारने केलेला आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रलोभने आणि खोटी आश्वासने देऊन नागरिकांना आता मोदी सरकार फसवू शकत नाही. काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार राहुल गांधी यांनी एक वर्षापूर्वी काढलेल्या भारत जोडो यात्रा मध्ये काँग्रेस पक्षाने नागरिकांशी संवाद साधून भ्रष्ट आणि पोकळ आश्वासने देणाऱ्या केंद्र सरकारचे पितळ उघडे पाडले आहे. त्यामुळे आगामी सर्व निवडणुकांमध्ये मतदार राजा भाजपला घरी बसवल्या शिवाय राहणार नाही असे आमदार रवींद्र धंगेकर यांनी सांगितले. पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसच्या वतीने जनसंवाद यात्रा दि....

उत्तर नागपूरात काँग्रेसची लोकसंवाद यात्रा

 उत्तर नागपूरात काँग्रेसची लोकसंवाद यात्रा माजी मंत्री डॉ. नितीन राऊतांच्या नेतृत्वात दोन टप्प्यांमध्ये यात्रा; जनतेच्या उत्सुर्फ प्रतिसाद नागपूर, दि.५ सप्टेंबर २०२३ भारतीय जनता पक्षाच्या घृणास्पद आणि लोकशाहीविरोधी राजकारणाचा जनतेला अक्षरशः उबग आला आहे. असे प्रकार राज्यातील सुसंस्कृत जनतेला मान्य नाही. त्यामुळे येत्या निवडणुकीत केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता जाणे अटळ आहे, असा विश्वास काँग्रेसचे जेष्ठ नेते डॉ. नितीन राऊत यांनी व्यक्त केला. आज मोतीबाग येथून सुरु झालेल्या पदयात्रेचे उत्तर नागपुरात अनेक ठिकाणी नागरिकांनी जल्लोषात स्वागत केले. सकाळी ८ वाजता उत्तर नागपूरतील मोतीबाग येथील कला मंदिर सभागृह परिसरातून सुरु झालेली पदयात्रा बेली शाप कॉटर, कामठी रोड, दहा नंबर पुलिया, आवडे बाबू चौक, लष्करीबाग, समता बुद्ध विहार या मार्गाने मार्गक्रमण केले. तसेच यात्रेच्या दुसऱ्या टप्पाची सुरुवात सायंकाळी चार वाजता नवा नकाशा येथून झाली. या पदयात्रेने कीदवाई ग्राउंड बडी मज्जिद, जयस्वाल रेस्टॉरंट, आंबेडकर मार्ग, बुद्ध नगर, आसी नगर, चार खंबा चौक, अशोक नगर, गुरुनानक पुरा, गणोबावाडी, बाळाभाऊ पेठ, हा...