हिंगणघाटच्या अंकीता पिसुड्डे परिवाराला उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते 5 लाखाची मदत 🖊️प्रविण जगताप 🖊️वर्धा जिल्हा प्रतिनिधी वर्धा, दि. 26 : हिंगणघाट तालुक्यातील दरोडा येथील शिक्षिका असलेल्या अंकिता पिसुड्डे या युवतीच्या आई-वडिलांना शासकीय मदतीचा पाच लक्ष रुपयाचा धनादेश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते देण्यात आला. नागपूर येथे आ. समीर कुणावर तसेच चित्रा वाघ यांच्या उपस्थितीत दरोडा येथील अरुण नागोराव पिसुड्डे व सौ.पिसुड्डे यांना शासकीय मदत देण्यात आली. अंगावर पेट्रोल टाकून अंकिताला जाळण्याचा प्रयत्न झाला होता. त्यानंतर या घटनेत तिचा मृत्यू झाला. अंत्यसंस्काराच्या वेळी शासनाने 5 लाखाची मदत जाहीर केली होती. मात्र ती अद्याप मिळाली नव्हती. याबाबत हिंगणघाटचे आमदार समीर कुणावार यांनी पाठपुरावा केला तसेच हा खटला जलद गती न्यायालयात चालावा ही मागणी मान्य करण्यात आली होती . उपमुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतक अंकिताच्या पालकांना 5 लाखाचा धनादेश आज दिला. घटनेवेळी गावकऱ्यांनी आर्थिक मदत, तिच्या भावाला शासकीय नोकरी आणि खटला जलदगती न...