अहिल्या किड्स प्री स्कूल मध्ये नेत्र तपासणी शिबिरचे आयोजन संपन्न. नागपुर : सरदार मल्हारराव होळकर बहुउद्देशीय शिक्षण संस्था, हिंगणा, नागपुर द्वारा संचालित अहिल्या किड्स प्री स्कूल, भोसलेवाडी, हिंगणा मध्ये स्व. दयारामजी चतुर, व स्व.नरेंद्र दयारामजी चतुर यांच्या तृतीय स्मृतिपित्यार्थ मोफत नेत्र तपासणी शिबिर 16 सप्टेंबर रोजी, आयोजित करण्यात आले. या शिबिराला 250 नागरिकांनी नेत्र तपासणी केली त्यामध्ये 30 जणांनी चष्मे घेतले तसेच त्यापैकी 25 जणांना मोतीया बिंदूचे ऑपरेशन करण्याकरता 21.09. 2023 ची तारीख देण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात सरदार मल्हारराव होळकर बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दिलीप उरकुडे यांनी आलेल्या महात्मे नेत्रालय टीमचे स्वागत केले. त्यानंतर नेत्र तपासणीला सुरुवात झाली. तपासणी सुरू असताना नगरसेवक ज्ञानेश्वरजी भोस्कर, नगरसेविका सौ. सुचिता चामाटे, जयंत निवल, संस्थेचे सदस्य दिवाकर कोठे, कंठीराम चतुर, विश्वेशर कोठे, शरद उरकुडे, भेट देऊन डोळ्याचे चेकप केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठीसौ.अश्विनी उरकुडे, सुनिता चतुर, अल्केश बुधे, राजेश मून, वंदना गोहले, दिपाली लोनगाडगे, करु...