प्रगतीशील महाराष्ट्र , गतीशील महाराष्ट्राच्या निर्धारासाठी एकजूट करुया – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कष्टकरी , शेतकऱ्यांसह सर्वांना घेणार सोबत ; नववर्षाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी दिल्या नागरिकांना शुभेच्छा मुंबई , दि. 31 :- नवा महाराष्ट्र घडवायचा आहे. प्रगतीशील महाराष्ट्राला आणखी गतीशील बनवायचे आहे. त्यासाठी आपण सर्वांनी ..महाराष्ट्र आता थांबणार नाही…अशी प्रतिज्ञा करूया , एकजूट करुया असा निर्धार व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील नागरिकांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हा निर्धार पूर्ण करण्यासाठी राज्यातील कष्टकरी , शेतकरी , कामगारासह सर्वांचीच साथ लाभेल , असा विश्वास देखील मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी नववर्षाच्या पूर्वसंध्येला दिलेल्या शुभेच्छा संदेशात नमूद केला आहे. मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणतात , ‘ येणारे वर्ष सुख , समाधान आणि समृद्धी घेऊन येवो. महाराष्ट्राच्या प्रगतीची पताका अखंडीत फडकत ठेवण्याची ऊर्जा आणि उर्मी मिळत राहो , हीच मनोकामना. छत्रपती शिवाजी महाराज आणि अनेक थोर संतांच्या आशीर्वादाच्या छत्रछायेखालील महाराष्ट्राला आधुन...