सीधे मुख्य सामग्री पर जाएं

कापूस पीक उत्पादन वाढीसाठी शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड महत्त्वाची - माजी कुलगुरू डॉ. सी.डी. मायी

 कापूस पीक उत्पादन वाढीसाठी शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड महत्त्वाची - माजी कुलगुरू डॉ. सी.डी. मायी

बाभुळगावात शेतकरी मेळावा संपन्न


यवतमाळ, दि. ७ (जिमाका): कापूस पीक उत्पादन वाढीसाठी शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन माजी कुलगुरू तथा ॲग्रोव्हिजन फाउंडेशनचे सचिव डॉ. सी.डी. मायी यांनी केले.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला, कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ, ॲग्रोव्हिजन फाउंडेशन, नागपूर, साऊथ एशिया बायोटेक्नोलॉजी सेंटर, जोधपुर आणि कृषी विभागाच्या संयुक्त सहकार्याने कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळी व्यवस्थापन बंधन प्रकल्पांतर्गत बाभुळगाव तालुक्यातील श्री सिध्देश्वर शिव मंदिर, सरूड येथे शेतकरी मेळावा नुकताच पार पडला. तसेच महमदपूर गावात ६० एकरवर पी.बी. नॉट बंधन बांधण्याचा कार्यक्रम राबविण्यात आला.

या मेळावाच्या अध्यक्षस्थानी मार्गदर्शक सुभाषचंद्र आचलीया, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सुरेश उ. नेमाडे, बाभुळगावचे तालुका कृषी अधिकारी सुरेश गावंडे, महमदपूरच्या सरपंच ज्योतीताई काळे, साउथ ऐशिया बायोटेक्नोलॉजी सेंटरचे डॉ. दीपक जाखर,, वसंतराव नाईक जैव तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या सहा. प्रा. डॉ. आर. डी. सातभाई आदी उपस्थित होते.

मार्गदर्शन करतांना डॉ. सी. डी. मायी यांनी कापूस पिकातील यांत्रिकीकरणाचे महत्व सांगून पी.बी. नॉट टेक्नोलॉजी व उपयोग आणि आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारण्यासाठी गाव पातळीवर शेतकरी गटाच्या माध्यमातून एकत्रित यावे. तसेच गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनाबाबत महमदपूर गावामध्ये राबविण्यात आलेल्या ‘प्रोजेक्ट बंधन’ मधील आधुनिक तंत्रज्ञानाचा (पी.बी. नॉट टेक्नोलॉजी) कपाशी पिकासाठी सामूहिकरित्या अवलंब करण्याचे आवाहन केले.

वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सुरेश उ. नेमाडे यांनी बंधन प्रकल्पाचे उद्देश व महत्त्व तसेच कापूस पिकाच्या वाढीसाठी संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापनाविषयी मार्गदर्शन केले. तालुका कृषी अधिकारी सुरेश गावंडे यांनी कृषी विभागाच्या शासकीय योजना व शेतकऱ्यांनी उत्पन्न वाढविण्यासाठी विद्यापीठाच्या शिफारशीत तंत्रज्ञानाचा वापर करण्याविषयी माहिती दिली.

या दरम्यान कीटकशास्त्रचे शास्त्रज्ञ डॉ. प्रमोद मगर यांनी सुरक्षित फवारणीसाठी घ्यावयाची काळजी व कापूस पिकावरिल कीड व रोग व्यवस्थापनाविषयी मार्गदर्शन केले.

महमदपूरच्या सरपंच ज्योती काळे म्हणाल्या की, शेतकऱ्यांनी कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञाशी संपर्कात राहून विद्यापीठाच्या शिफारशीत तंत्रज्ञानाचा अवलंब करावा असे मत व्यक्त केले.

याप्रसंगी सुरक्षित फवारणी जनजागृती साठी सिजेन्टा कंपनीच्या वतीने निवडक शेतकऱ्यांना सुरक्षित फवारणी कीटचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमासाठी बाभूळगाव तालुका परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शास्त्रज्ञ मयूर ढोले तर आभार शास्त्रज्ञ डॉ. प्रमोद मगर यांनी व्यक्त केले.

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वर्धा जिल्हा पदाधिकारी बैठक

 🖊️प्रविण जगताप 🖊️वर्धा जिल्हा प्रतिनिधी मो . 9284981757 वर्धा *आज दिनांक ०२ /१० /२०२३ रोजी वर्धा येथे महात्मा लॉन येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे जिल्हाध्यक्ष मा श्री सुनीलभाऊ राऊत साहेब यांच्या निर्देशाखाली ही' सभा घेण्यात आली वर्धा जिल्हा पदाधिकारी बैठक घेण्यासाठी संसदरत्न, कार्यकारी अध्यक्ष, खासदार सौ सुप्रियाताई सुळे , माजी गृहमंत्री मा श्री अनिलभाऊ देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश महिला प्रदेशाध्यक्ष सौ रोहिनिताई खडसे , राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मा श्री महेबूबभाई शेख या सर्व दिग्गज नेत्यां च्या नेतृत्वात खाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वर्धा जिल्हा पदाधिकारी बैठक घेण्यात आली वर्धा जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते बैठकीनंतर काही युवक व तरुण मुलांचे पक्ष प्रवेश घेण्यात आले हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती मा श्री सुधीर बाबूजी कोठारी, माजी आमदार मा श्री राजूभाऊ तिमांडे , प्रदेश सरचिटणीस मा श्री अतुल भाऊ वांदिले , वर्धा जिल्हा अध्यक्ष मा श्री सुनीलभाऊ राऊत, मा श्री समीर भाऊ देशमुख, वर्धा जिल्हा राष्ट्रवादी यु...

बुद्ध विहार येथे बौद्ध भिक्खूंसाठी पोषण जागृती मालिकेचे चौथे सत्र संपन्न

  *बुद्ध विहार येथे बौद्ध भिक्खूंसाठी पोषण जागृती मालिकेचे चौथे सत्र संपन्न*  *निकिता पाटील, प्रख्यात आहारतज्ञ * बौद्ध भिक्खूंसाठी आहार शिक्षण सत्रांची मालिका सुरू ठेवत, मिठास केअरच्या सहकार्याने न्यूट्रा पॉवरने 8 ऑक्टोबर रोजी बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर बौद्ध सेमिनरी, उंटखाना बुद्ध विहार, नागपूर येथे आपले चौथे सत्र आयोजित केले होते. मिठास केअरचे संस्थापक विवेक नगरारे यांनी भिक्षु संघ आहार शिक्षण सत्र अभियानाच्या दूरदृष्टीची माहिती देऊन सत्राची सुरुवात केली. या अभियाना चे पहले सत्र 22 एप्रिल रोजी मैत्री बुद्ध विहार, नारी रोड, नागपूर येथून झाली आणि ह्याचे उद्दिष्ट 1000 हून अधिक बौद्ध भिक्खूंना आरोग्य व पोषण जागृती चे सशक्ति प्रदान करणे आहे ज्यासाठी कदाचित शहरभरातील 100 बुद्ध विहारांमध्ये प्रवास करण्याची आवश्यकता असू शकते. डॉ.आंबेडकर सेमिनरीचे मुख्य धम्म प्रशिक्षक भदंत धम्मसारथी यांनी संपूर्ण समुह ला त्यांच्या मिशनचा सक्रिय भाग बनवण्याची आणि समाजात पोषण शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी नागपूरच्या विविध बुद्ध विहारांमध्ये जास्तीत जास्त भिक्षूंपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांची बांधिलकी द...

10 हजार से ज्यादा भक्तों ने लिया महाप्रसाद का लाभ -विदर्भ के 11 जिलों से आये भक्तों द्वारा रोग निदान,नेत्र जांच ,रक्तदान शिबिर में लिया लाभ

 10 हजार से ज्यादा भक्तों ने लिया महाप्रसाद का लाभ -विदर्भ के 11 जिलों से आये भक्तों द्वारा रोग निदान,नेत्र जांच ,रक्तदान शिबिर में लिया लाभ नागपुर. ((आनन्दमनोहर जोशी) श्राद्ध पक्ष के दौरान सोमवार की चतुर्थी को संकष्टी चतुर्थी से चतुर्दशी तक उत्सव मनाया जा रहा है.वहीँ महल स्थित सीनियर भोसला पैलेस महल में महाराजा ऑफ नागपुर ट्रस्ट के तत्वावधान मे 236 वें वार्षिकोत्सव पर मस्करया श्रीगणेश की विधिवत पूजा रोजाना शाम को राजपुरोहित राजेंद्र पुराणिक के हस्ते मंत्रोच्चारण किया जा रहा है.सरकारी मेडिकल कॉलेज डॉक्टर की टीम ने सफलतापूर्वक प्रयास किया. यहाँ इस दौरान विदर्भ के 11 जिलों से आये भक्तगणों ने स्वास्थ्य शिबिर का लाभ लिया. महाप्रसाद के दौरान अन्न का थालियाँ में उचित मात्रा में प्रसाद के रूप में लेकर जूठा नहीं छोड़ने के लिए सारंग,गणेश गरुड़ और कार्यकर्ताओं द्वारा उद्धोषणा करके निवेदन किये गए.इस विशेष अवसर पर श्रीमंत डॉ. राजे मुधोजी महाराज भोंसले, श्रीमंत रानी यशोधराराजे, श्रीमंत राजे रघुजी भोंसले, श्रीमंत राजे युवराज जयसिंहराव भोंसले,क़ानूनी सलाहकार अधिवक्ता प्रदीप देशमुख, हप्पेनिंग टुडे क...