सीधे मुख्य सामग्री पर जाएं

*उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उच्च न्यायालयातील बार असोसिएशनच्या नवीन सभाकक्षाचे भूमिपूजन*

 *उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उच्च न्यायालयातील बार असोसिएशनच्या नवीन सभाकक्षाचे भूमिपूजन*

 


*सभाकक्षात गुणात्मक व सुसज्ज सुविधा*

        *नागपूर दि. 11* : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील हायकोर्ट बार आसोसिएशच्या सुमारे आठ हजार चौरस फुट जागेत बांधण्यात येणाऱ्या बार सभाकक्षाचे आज भूमिपूजन झाले.

            नागपूर उच्च न्यायालयाच्या परिसरात आयोजित या कार्यक्रमास न्यायमुर्ती (प्रशासकीय) अतुल एस. चांदुरकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी न्यायमुर्ती नितीन सांबरे, अविनाश घरोटे, अनिल किलोर, मुकुलीका जवळकर, उर्मिला जोशी फाळके वाल्मिकी मोजेस ए.एल. पानसरे,वृषाली जोशी, हायकोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष अतुल पांडे आदी उपस्थित होते.

 नागपूर खंडपीठातील विस्तारीत साऊथ विंग येथे बार असोसिएशनच्या सुमारे 8 हजार 227 चौरस फुट टेरेसच्या जागेवर सभाकक्ष बांधण्यात येणार आहे.या बांधकामासाठी 317 लक्ष रुपये मंजूर झाले आहेत. या कक्षामध्ये 55 कर्मचारी बसण्याची व्यवस्था, माहिती कक्ष, प्रशस्त स्वतंत्र दालने त्यासोबत बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसाठी सार्वत्रिक आसन व्यवस्था राहणार आहे. बार काँसीलच्या सदस्यांना दैनंदिन कामासाठी आवश्यक असलेल्या सुविधा या सभाकक्षात पुरविण्यात येणार आहेत.


 उमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी हायकोर्ट बार असोसिएशनसाठी बांधण्यात येणाऱ्या सभाकक्षाची माहिती जाणून घेतली. बार काँसीलच्या सभासदांना येथे गुणात्मक व सुसज्ज सुविधा उपलब्ध होतील या दृष्टीने बार काँसीलच्या पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करावे. या कामासाठी संपूर्ण सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

            ॲड. अतुल पांडे यांनी श्री. फडणवीस, न्या. अतुल एस. चांदुरकर यांचे शाल व रोपटे देऊन स्वागत केले. भूमिपूजनासाठी बसविण्यात आलेल्या कोनशीलेचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. यावेळी सिनीयर काँसीलर कुमकुम शिरपूरकर,, सुरेंद्र मिश्रा, सी एस कप्तान ravindra खापरे मुकेश समर्थ , हायकोर्ट बार असोसिएशनचे सचिव अमोल जलतारे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.कुचेवार उपस्थित होते.

*शासकीय अभियोक्ता कार्यालयास भेट*

        उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील शासकीय अभियोक्ता कार्यालयास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली. यावेळी शासकीय अभियोक्ता ए. एम. देशपांडे यांनी उपमंख्यमंत्र्यांचे स्वागत केले. शासकीय अभियोक्ता कार्यालयाच्यावतीने सुरु असलेल्या विविध उपक्रमांची माहिती यावेळी देण्यात आली.

अतिरिक्त शासकीय अभियोक्ता आनंद फुलझेले, देशाचे उपमहाधिवक्ता नंदेश देशपांडे, बार काँसीलचे पारिजात पांडे, तसेच सहायक शासकीय अभियोक्ता यावेळी उपस्थित होते.

                                         


                   

                 

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वर्धा जिल्हा पदाधिकारी बैठक

 🖊️प्रविण जगताप 🖊️वर्धा जिल्हा प्रतिनिधी मो . 9284981757 वर्धा *आज दिनांक ०२ /१० /२०२३ रोजी वर्धा येथे महात्मा लॉन येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे जिल्हाध्यक्ष मा श्री सुनीलभाऊ राऊत साहेब यांच्या निर्देशाखाली ही' सभा घेण्यात आली वर्धा जिल्हा पदाधिकारी बैठक घेण्यासाठी संसदरत्न, कार्यकारी अध्यक्ष, खासदार सौ सुप्रियाताई सुळे , माजी गृहमंत्री मा श्री अनिलभाऊ देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश महिला प्रदेशाध्यक्ष सौ रोहिनिताई खडसे , राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मा श्री महेबूबभाई शेख या सर्व दिग्गज नेत्यां च्या नेतृत्वात खाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वर्धा जिल्हा पदाधिकारी बैठक घेण्यात आली वर्धा जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते बैठकीनंतर काही युवक व तरुण मुलांचे पक्ष प्रवेश घेण्यात आले हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती मा श्री सुधीर बाबूजी कोठारी, माजी आमदार मा श्री राजूभाऊ तिमांडे , प्रदेश सरचिटणीस मा श्री अतुल भाऊ वांदिले , वर्धा जिल्हा अध्यक्ष मा श्री सुनीलभाऊ राऊत, मा श्री समीर भाऊ देशमुख, वर्धा जिल्हा राष्ट्रवादी यु...

बुद्ध विहार येथे बौद्ध भिक्खूंसाठी पोषण जागृती मालिकेचे चौथे सत्र संपन्न

  *बुद्ध विहार येथे बौद्ध भिक्खूंसाठी पोषण जागृती मालिकेचे चौथे सत्र संपन्न*  *निकिता पाटील, प्रख्यात आहारतज्ञ * बौद्ध भिक्खूंसाठी आहार शिक्षण सत्रांची मालिका सुरू ठेवत, मिठास केअरच्या सहकार्याने न्यूट्रा पॉवरने 8 ऑक्टोबर रोजी बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर बौद्ध सेमिनरी, उंटखाना बुद्ध विहार, नागपूर येथे आपले चौथे सत्र आयोजित केले होते. मिठास केअरचे संस्थापक विवेक नगरारे यांनी भिक्षु संघ आहार शिक्षण सत्र अभियानाच्या दूरदृष्टीची माहिती देऊन सत्राची सुरुवात केली. या अभियाना चे पहले सत्र 22 एप्रिल रोजी मैत्री बुद्ध विहार, नारी रोड, नागपूर येथून झाली आणि ह्याचे उद्दिष्ट 1000 हून अधिक बौद्ध भिक्खूंना आरोग्य व पोषण जागृती चे सशक्ति प्रदान करणे आहे ज्यासाठी कदाचित शहरभरातील 100 बुद्ध विहारांमध्ये प्रवास करण्याची आवश्यकता असू शकते. डॉ.आंबेडकर सेमिनरीचे मुख्य धम्म प्रशिक्षक भदंत धम्मसारथी यांनी संपूर्ण समुह ला त्यांच्या मिशनचा सक्रिय भाग बनवण्याची आणि समाजात पोषण शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी नागपूरच्या विविध बुद्ध विहारांमध्ये जास्तीत जास्त भिक्षूंपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांची बांधिलकी द...

10 हजार से ज्यादा भक्तों ने लिया महाप्रसाद का लाभ -विदर्भ के 11 जिलों से आये भक्तों द्वारा रोग निदान,नेत्र जांच ,रक्तदान शिबिर में लिया लाभ

 10 हजार से ज्यादा भक्तों ने लिया महाप्रसाद का लाभ -विदर्भ के 11 जिलों से आये भक्तों द्वारा रोग निदान,नेत्र जांच ,रक्तदान शिबिर में लिया लाभ नागपुर. ((आनन्दमनोहर जोशी) श्राद्ध पक्ष के दौरान सोमवार की चतुर्थी को संकष्टी चतुर्थी से चतुर्दशी तक उत्सव मनाया जा रहा है.वहीँ महल स्थित सीनियर भोसला पैलेस महल में महाराजा ऑफ नागपुर ट्रस्ट के तत्वावधान मे 236 वें वार्षिकोत्सव पर मस्करया श्रीगणेश की विधिवत पूजा रोजाना शाम को राजपुरोहित राजेंद्र पुराणिक के हस्ते मंत्रोच्चारण किया जा रहा है.सरकारी मेडिकल कॉलेज डॉक्टर की टीम ने सफलतापूर्वक प्रयास किया. यहाँ इस दौरान विदर्भ के 11 जिलों से आये भक्तगणों ने स्वास्थ्य शिबिर का लाभ लिया. महाप्रसाद के दौरान अन्न का थालियाँ में उचित मात्रा में प्रसाद के रूप में लेकर जूठा नहीं छोड़ने के लिए सारंग,गणेश गरुड़ और कार्यकर्ताओं द्वारा उद्धोषणा करके निवेदन किये गए.इस विशेष अवसर पर श्रीमंत डॉ. राजे मुधोजी महाराज भोंसले, श्रीमंत रानी यशोधराराजे, श्रीमंत राजे रघुजी भोंसले, श्रीमंत राजे युवराज जयसिंहराव भोंसले,क़ानूनी सलाहकार अधिवक्ता प्रदीप देशमुख, हप्पेनिंग टुडे क...