उत्तर नागपूरात काँग्रेसची लोकसंवाद यात्रा
माजी मंत्री डॉ. नितीन राऊतांच्या नेतृत्वात दोन टप्प्यांमध्ये यात्रा; जनतेच्या उत्सुर्फ प्रतिसाद
नागपूर, दि.५ सप्टेंबर २०२३
भारतीय जनता पक्षाच्या घृणास्पद आणि लोकशाहीविरोधी राजकारणाचा जनतेला अक्षरशः उबग आला आहे. असे प्रकार राज्यातील सुसंस्कृत जनतेला मान्य नाही. त्यामुळे येत्या निवडणुकीत केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता जाणे अटळ आहे, असा विश्वास काँग्रेसचे जेष्ठ नेते डॉ. नितीन राऊत यांनी व्यक्त केला. आज मोतीबाग येथून सुरु झालेल्या पदयात्रेचे उत्तर नागपुरात अनेक ठिकाणी नागरिकांनी जल्लोषात स्वागत केले.
सकाळी ८ वाजता उत्तर नागपूरतील मोतीबाग येथील कला मंदिर सभागृह परिसरातून सुरु झालेली पदयात्रा बेली शाप कॉटर, कामठी रोड, दहा नंबर पुलिया, आवडे बाबू चौक, लष्करीबाग, समता बुद्ध विहार या मार्गाने मार्गक्रमण केले. तसेच यात्रेच्या दुसऱ्या टप्पाची सुरुवात सायंकाळी चार वाजता नवा नकाशा येथून झाली. या पदयात्रेने कीदवाई ग्राउंड बडी मज्जिद, जयस्वाल रेस्टॉरंट, आंबेडकर मार्ग, बुद्ध नगर, आसी नगर, चार खंबा चौक, अशोक नगर, गुरुनानक पुरा, गणोबावाडी, बाळाभाऊ पेठ, हाउसिंग बोट कॉलनी या ठिकाणाहून यात्रा मार्गक्रमण केले. यावेळी डॉ. राऊत यांनी नागरिकांशी संपर्क साधून त्याच्या अडचणी जाणून घेतल्या.
पदयात्रेत माजी मंत्री डॉ. नितीन राऊत समवेत महाराष्ट्र प्रदेश,कांग्रेस कमेटी चे महासचिव संजय दुबे , राजेंद्र करवाडे, अजित सिंह, शहर कांग्रेस उपाध्यक्ष बंडोपंत टेंभुर्णे, हरिभाऊ किरपाने,अतीक मलिक, बेबी गौरीकर,दीपक खोब्रागडे, सचिन डोहाने, लुकमान अन्सारी कृष्णा गजभिये, राजेश लाडे, कल्पना द्रोणकर, निलेश खोब्रागडे अनिरुद्ध पांडे, महेंद्र भांगे आसिफ शेख, इरशाद शेख, सादिक अली, विजया हजारे, गीता श्रीवास रेखा लांजेवार, विना दरवाडे, मुन्ना पटेल तुषार नंदागवळी, विनोद राऊत, खतिजा सादिक अली, विजया देशभ्रतार, सलीम मस्ताना, सय्यद फर्मान अली, सय्यद दानिश अली, चेतन तरारे, अस्मिता पाटील इंद्रपाल वाघमारे, इमरान खान, प्रमिला जनबंधू, सिंधू चारबे , मन्नू सिंह, अजय वंजारी, सुशांत गणवीर, राकेश इखार, पूजा कौर बाबरा, दुर्गेश पांडे, रोनक नांदगावे, पलाश लिंगायत, आकाश इंदुरकर, निषाद इंदुरकर.
बाजीराव साखरे वाचनालयातील विद्यार्थ्यांशी संवाद
यात्रे दरम्यान माजी मंत्री व उत्तर नागपूर चे आमदार डॉ. नितीन राऊत यांनी लष्करीबाग येथील बाजीराव साखरे वाचनालयाला भेट दिली आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच वाचनालयात विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या सोई सुविधांचे निरीक्षण यावेळी केले आणि विद्यार्थ्यांसाठी हवी असणारी पुस्तके उपलब्ध करण्याची सूचना केले. यावेळी डॉ राऊत यांनी विद्यार्थ्यांनां उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा ही दिल्या.
*उद्याचा लोकसंवाद यात्रेचा मार्ग*
आज बुधवार रोजी पहिल्या टप्पातील लोकसंवाद पद यात्रेची सुरुवात सकाळी 8 वाजता हर्षवर्धन बुद्ध विहार नझूल ले-आऊट येथून होणार असून ही पदयात्रा दिलीप नगर, जरीपटका रोड, अंगुलिमाल बुद्ध विहार, लूंबिनी बुद्ध विहार, सिद्धार्थ समाजभवन, गौतम नगर, पंजाबी लाईन, कडबी चौक, बेझनबाग बुद्ध विहार येथे सपन्न होईल. तसेच यात्रेच्या दुसऱ्या टप्पाची सुरुवात सायंकाळी चार वाजता बेझनबाग येथील गुरुनानक शाळा ग्राउंड येथून होणार आहे. ही यात्रा रमाबाई चौक, सुदर्शन कॉलनी, भंडार मोहल्ला, मोठा बुद्ध विहार, शहीद स्मारक परिसर, आनंद रोड, रात्री निवारा, नागार्जुन गेट त्रिकोणी मैदान, सारी पुत्र बुद्ध विहार परिसर, लघुवेतन कॉलनी, इंदोरा चौक या ठिकाणाहून यात्रा मार्गक्रमण करणार आहे. लोकसंवाद पदयात्रेत नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचं आवाहन आयोजकांमार्फत करण्यात येत आहे.