मनपाच्या पंचशील वाचनायातील विद्यार्थ्यांशी संवाद
भाजपच्या काळात महागाई, बेरोजगारीने प्रचंड हाल - डॉ. नितीन राऊत
नागपूर, दिनांक-०८ सप्टेंबर २०२३ :- पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारच्या कार्यकाळात महागाई प्रचंड वाढली आणि जनतेसमोर जीवनमरणाचा प्रश्न उभा ठाकला आहे. बेरोजगारी गत 45 वर्षांतील सर्वात जास्त आहे, रुपयाची ऐतिहासिक घसरण झाली पण खासगीकरणातून मोदींचे उद्योगपती मित्र मात्र मालामाल झाले, असा आरोप काँग्रेसचे जेष्ठ नेते व माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केला आहे. ते आज निघालेल्या लोकसंवाद यात्रे दरम्यान नागपुरात बोलत होते.
सकाळी 07.00 वाजता मिलिंद नगर येथील बुद्ध विहार पासून लोकसंवाद पदयात्रा सुरु झाली. वैशाली नगर हाउसिंग बोर्ड कॉलनी, वैशाली नगर तथागत बुद्ध विहार, हनुमान सोसायटी परिसर, मेंहदीबाग चौक, सुजाता नगर बुद्ध विहार, पंचशील नगर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाला माल्यार्पण करुन खोब्रागडे नगर, आदर्श नगर, गुरुद्वारा आदर्श नगर, पंचशील नगर रोड, ताज नगर येथून पदक्रमण करुन चार खंबा चौक येथे समाप्त झाली.
तसेच पदयात्राचा दुसरा टप्पा
सायंकाळी चार खंबा चौक येथून सुरु झाला असून टेका बारसे घाट, सिद्धार्थ नगर, टेका दरबार, नई बस्ती टेका, चिराग अली चौक, हबीब नगर, फारुख नगर, बाबा बुद्धाजी नगर, महेंद्र नगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय, यादव नगर, सुदाम नगर येथून पदक्रमण करुन ही यात्रा बंदे नवाज नगर येथे थांबली. यावेळी डॉ. राऊत यांनी नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
इटारसी पुलियाच्या संपणाऱ्या उतार भागाचे बांधकाम चुकीचे झाले असल्याने याठिकाणी वाहतुकीची कोंडी निर्माण झाली आहे. ह्या मुळे रुग्णवाहीका आणि कब्रिस्तान मध्ये येणार्या शववाहिकेला नेहमी अडचण निर्माण झाली आहे. तसेच इंदोरा स्थित मॉडेल टाऊन येथील सारीपुत्त बौद्ध विहाराच्या विकासाचे कामाकरिता डॉ. राऊत यांनी निधी उपलब्ध करून दिली, कामाचे वर्क ऑर्डर झाले पण नागपूर सुधार प्रन्यासच्या हलगर्जीपणामुळे मुळे काम सुरू होऊन बंद पडले आहे. या तक्रारी यावेळी नागरिकांनी केल्या. तसेच उत्तर नागपूर येथील झोपडपट्टी धारकांना त्यांच्या हक्काचे पट्टे वाटप अद्याप ही झाले नसल्याने नागरिकांनी यावेळी डॉ. राऊत यांच्या कडे तक्रार करीत नागपूर सुधार प्रन्यास आणि महानगर पालिका विरोधात संताप व्यक्त केला. यावेळी पदयात्रेत महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस समितीचे महासचिव संजय दुबे, शहर कांग्रेस उपाध्यक्ष बंडोपंत टेंभुर्णे, हरिभाऊ किरपाने,अतीक मलिक प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी नागरिकांनी केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यसरकार विरोधात घोषणाही दिल्या.
प्रसंगी खुशाल हेडाऊ, दीपक खोब्रागड़े, डॉ. नियाजुद्दीन सिध्दीकी, असद खान, सतीश पाली, निलेश खोब्रागडे, अनिरुद्ध पांडे, पुंडलिक मेश्राम, गिता श्रीवास, मुन्ना पटेल, कल्पना द्रोणकर, गौतम अंबादे, दीपा गावंडे, विजया हजारे, अस्मिता पाटिल, शारदा रामटेके, इरशाद शेख, सचिन डोहाने, उत्तरेश वासनिक, इंद्रपाल वाघमारे, प्यारेलाल कोसरे, सचिन वासनिक, सचिन माथाडे, पूजा कौर बाबरा, स्वर्णा चालखुरे, ज्योति खोब्रागडे, विजया शेंडे, सुशांत गणवीर, उमेश डाखोरे, अभिनव गोस्वामी, निषाद इंदुरकर, दिनेश साधनकर, रजनीगंधा वाघमारे, विद्या देशभ्रतार, कुंदा खोब्रागडे, रंजना मेश्राम, प्रमिला जनबंधु, आशा वासनिक, संतोष खडसे, शिलज पांडे, राकेश ईखार, सिमा धारगावे, मृणाली धारगावे, बालकन्या गोंडाणे, बेबी जांभुळकर, दीपाली मेश्राम, लता शेंडे, इंदु दुपारे, करुणा दुपारे, नंदा नायडू, नीमा गोंडाणे, केवल सिंह, रौनक नांदगावे, हसन अंसारी, हर्ष बर्डे, आमीर खान सह नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
डॉ. नितीन राऊत यांनी साधला पंचशील वाचनालयातील विद्यार्थ्यांशी संवाद*
आज लोकसंवाद यात्रे दरम्यान डॉ. राऊत यांनी उत्तर नागपूरातील पंचशील वाचनालय येथे भेट दिली आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी मनपातील ग्रंथालय विभागानी केलेल्या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांना पिण्याचे पाणीही उपलब्ध नसल्याचे वास्तव पुढे आले. विद्यार्थी वणवण करीत बाहेरून पाणी आणून पित आहेत. थोडा पाऊस पडला तरी वाचनालयाच्या छतातून पाणी गळते, विद्यार्थ्यांच्या पुस्तका ओल्या होतात. इलेक्ट्रिक वायरिंग नादुरुस्त असल्याने कोणतीही दुर्घटना याठिकाणी होऊ शकते, तरीही प्रशासनाचे दूर्लक्ष असल्याचे विद्यार्थ्यांनी यावेळी डॉ. राऊत यांच्याकडे मनपाच्या ग्रंथालय विभागाच्या अधिकाऱ्यांची तक्रार करीत मनपा विरोधात संताप व्यक्त केला.
विद्यार्थ्यांनी महापुरुषांचा आदर्श ठेऊन निश्चित ध्येयाच्या दिशेने वाटचाल करावी. प्रचंड मेहनत करून जगातील कुठलीही गोष्ट आपण सहज मिळवू शकतो, त्यासाठी अथक परिश्रम करणे आवश्यक आहे. असा संदेश यावेळी डॉ. राऊत यांनी विद्यार्थ्यांना दिला.