*अहिल्या किड्स प्री प्रायमरी स्कूलमध्ये जन्माष्टमीचे आयोजन*
यशवंतराव होळकर बहुउद्देशीय शिक्षण संस्था द्वारा संचालित अहिल्या किड्स प्री प्रायमरी स्कूल मध्ये गोकुळाष्टमीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाला यशवंतराव होळकर बहुउद्देशीय शिक्षण संस्था च्या सचिव सौ. चंद्रकला दिलीप उरकुडे, हिंगणा नगरपंचायत वॉर्ड नंबर 9 च्या नगरसेविका सो बेबी गजभिये, अहिल्या किड्स च्या मुख्याध्यापिका सौ. अश्विनी शरद उरकुडे, संचालिका सौ सुनीता कंठीराम चतुर उपस्थित होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात श्रीकृष्णाच्या मूर्ती च्या पूजनाने झाली त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करून कार्यक्रम सुरू करण्यात आला त्यानंतर विद्यार्थ्यांनी सामायिक नृत्य सादर केले तसेच दहीहंडीच्या कार्यक्रमाचे आयोजन सुद्धा करण्यात आले होते. त्या प्रसंगी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना विद्यार्थी हे बालगोपालांच्या अवतारा सारखेच वाटत आहे, गोपाळकृष्णप्रमाणे त्यांचे रूप दिसत आहे, त्यांच्या खोडकर वृत्तीप्रमाणे यांचे नृत्य सुद्धा तसेच होते. आपल्या आचरण सुद्धा गोपाळ कृष्णा प्रमाणेच इतरांना मदत करणारे असावे, कुणाला जर अडचण आली तर त्यांच्या अडचणीच्या वेळेस सहकार्य करण्याची असावी असे संबोधित केले. त्यानंतर गोपालकाला वाटून कार्यक्रमचे समारोप करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ वंदना मॅडम यांनी केले. कार्यक्रमाला उपस्थित श्री. शरद उरकुडे, सौ करुणा मॅडम, सौ दिपाली मॅडम, संकेत उरकुडे पालक वर्ग विद्यार्थी रुंद उपस्थित होते.