गणेशपेठ पोलीसांची कामगिरी घरफोडी करणाऱ्या आरोपींना अटक, एकुण ४,२५,२३०/- रू चा मुद्देमाल जप्त. नागपुर : दिनांक ०३ ऑक्टोबर.२३ चे रात्री १.३० वा. ते दिनांक २० ऑक्टोबर २३ चे ११ ३० वा. चे दरम्यान फिर्यादी सुनिल शामरावजी नवगरे वय ४९ वर्ष, रा. के.पी. अपार्टमेंट, फ्लॅट नं. १०२, गाडगे महाराज मंदीर मागे, विठ्ठठल नगर, हुडकेश्वर, नागपुर हे पोलीस ठाणे गणेशपेठ हद्दीतील महानगर पालीका, विदयुत विभाग कार्यालय, फुले मार्केट, नागपुर, येथे कनिष्ठ अभियंता पदावर कार्यरत आहे. त्यांनी कॉटन मार्केट येथील विदयुत विभागाचे गोडाउन रूम नं. १०१ नागपुर, मध्ये स्ट्रीट लाईट, फिटींगचे व ईलेक्ट्रीक चे ईतर साहीत्य ठेवलेले होते, कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्या विदयुत विभागाचे गोडाउनचे दाराची कड़ी तोडुन, गोडावूनमध्ये प्रवेश करून, त्यामधील स्ट्रीट लाईट, तसेच फिटींगचे व ईलेक्ट्रीक वे इतर साहीत्य असा एकूण ७,६५,१८०/- रू या मुद्देमाल चोरून नेला. फिर्यादी यांनी दि. २१.१०.२०२३ रोजी दिलेल्या तक्रारीवरून पो. ठाणे गणेशपेठ येथे अज्ञात आरोपी विरुध्द कलम ४५४, ४५७, ३८० भादवि अन्यये गुन्हा नोंदविण्यात आलेला होता. सदर गुन्हयाचे तप...