सीधे मुख्य सामग्री पर जाएं

एक जिल्हा एक उत्पादन पुरस्कारासाठी केंद्राच्या समितीची उद्योगांना भेटी

 


एक जिल्हा एक उत्पादन पुरस्कारासाठी केंद्राच्या समितीची उद्योगांना भेटी

 पुरस्कार पडताळणीसाठी वर्धा राज्यातील एकमेव जिल्हा

देशभरातील 1 हजार अर्जांपैकी केवळ 64 अर्ज पात्र

वर्धा, दि.26 : केंद्र शासनाच्या वतीने यावर्षापासून एक जिल्हा एक उत्पादन पुरस्कार दिले जाणार आहे. त्यासाठी संपुर्ण देशभरातून अर्ज मागविण्यात आले होते. यासाठी शासनाने ठरविलेल्या निकषात राज्यातील केवळ वर्धा हा एकमेव जिल्हा पुरस्काराच्या पडताळणीसाठी पात्र ठरला आहे. त्यानुसार केंद्र शासनाच्या पुरस्कार निवड समितीने जिल्ह्याला भेट देऊन विविध उद्योगांची पाहणी केली.

केंद्र शासनाच्या वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्यावतीने दिल्या जाणाऱ्या पुरस्कारासाठी एक जिल्हा एक उत्पादन अंतर्गत राज्यातील 36 जिल्ह्यांनी अर्ज सादर केले होते. अर्जासोबत विविध 52 मुद्यांची प्रश्नावली सादर करावयाची होती. या अर्जातून प्रश्नावलीच्या आधारे केवळ वर्धा जिल्ह्याची राष्ट्रीय स्तरावरील पुरस्काराच्या पडताळणीसाठी निवड झाली आहे. देशभरातून 1 हजार अर्जांपैकी केवळ 64 अर्ज पुरस्काराच्या पडताळणीसाठी निवडल्या गेले आहे.

देशभर एक जिल्हा एक उत्पादन ही योजना राबविली जात आहे. जिल्ह्याची खरी क्षमता ओळखणे, आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी रोजगार निर्मिती आणि ग्रामीण उद्योजकता, आत्मनिर्भरता या ध्येयाकडे नेण्यासाठी एक परिवर्तनाचे पाऊल म्हणून देशातील प्रत्येक जिल्ह्यातून एक उत्पादन निवडणे, त्याचे ब्रँडिंग व मार्केटिंग करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा उद्योग केंद्रामार्फत या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. 

या योजनेंतर्गत यावर्षापासून केंद्र स्तरावर पुरस्कार दिले जाणार आहे. त्यासाठी देशातील सर्वच जिल्ह्यांकडून अर्ज मागविण्यात आले होते. राज्यातील प्राप्त अर्जातून निकषात केवळ वर्धा जिल्हा परिपुर्ण ठरल्याने राष्ट्रीय पुरस्कारासाठी केंद्र शासनाच्या निवड समितीने जिल्ह्याला भेट देऊन पुरस्कारासाठी अर्ज केलेल्या जिल्ह्यातील विविध उद्योगांची पाहणी केली. केंद्र शासनाच्या या पुरस्कार पडताळणी समितीतील नाव्या छाब्रा व स्मिती सक्सेना यांनी मे पी.व्ही. टेक्सटाईल्स प्रा.लि., मे श्यामबाबा ट्रेडर्स प्रा.लि., मे गिमाटेक्स इंडस्ट्रीज प्रा.लि., अंकुर सिड्स, मगन संग्रहालय येथे खादी उत्पादन युनिट, तसेच कापसाच्या शेतीला भेट देऊन विविध उद्योजक, शेतकरी व कामगारांच्या भेटी घेतल्या.

यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक कमलेश जैन, कृषि उपसंचालक परमेश्वर घायतिडक, आदर्श मोहता, प्रशांत मोहता, भुपेश शहाणे, आयुष सिंघानिया, रितेश सुराणा, संतोष देशमुख, मुकेश लुताडे, श्री.जोसेफ, श्री.फुटाणे आदि उपस्थित होते. भेटी दरम्यान पडताळणी झालेल्या उद्योगांची निवड झाल्यास डिसेंबर महिन्यामध्ये पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे.

समिती सदस्यांसोबत जिल्हाधिकाऱ्यांचा संवाद

समितीच्या सदस्यांसोबत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात संवाद साधला. एक जिल्हा एक उत्पादन योजनेंतर्गत जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी समितीच्या सदस्यांना अवगत करून दिली.

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

बुद्ध विहार येथे बौद्ध भिक्खूंसाठी पोषण जागृती मालिकेचे चौथे सत्र संपन्न

  *बुद्ध विहार येथे बौद्ध भिक्खूंसाठी पोषण जागृती मालिकेचे चौथे सत्र संपन्न*  *निकिता पाटील, प्रख्यात आहारतज्ञ * बौद्ध भिक्खूंसाठी आहार शिक्षण सत्रांची मालिका सुरू ठेवत, मिठास केअरच्या सहकार्याने न्यूट्रा पॉवरने 8 ऑक्टोबर रोजी बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर बौद्ध सेमिनरी, उंटखाना बुद्ध विहार, नागपूर येथे आपले चौथे सत्र आयोजित केले होते. मिठास केअरचे संस्थापक विवेक नगरारे यांनी भिक्षु संघ आहार शिक्षण सत्र अभियानाच्या दूरदृष्टीची माहिती देऊन सत्राची सुरुवात केली. या अभियाना चे पहले सत्र 22 एप्रिल रोजी मैत्री बुद्ध विहार, नारी रोड, नागपूर येथून झाली आणि ह्याचे उद्दिष्ट 1000 हून अधिक बौद्ध भिक्खूंना आरोग्य व पोषण जागृती चे सशक्ति प्रदान करणे आहे ज्यासाठी कदाचित शहरभरातील 100 बुद्ध विहारांमध्ये प्रवास करण्याची आवश्यकता असू शकते. डॉ.आंबेडकर सेमिनरीचे मुख्य धम्म प्रशिक्षक भदंत धम्मसारथी यांनी संपूर्ण समुह ला त्यांच्या मिशनचा सक्रिय भाग बनवण्याची आणि समाजात पोषण शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी नागपूरच्या विविध बुद्ध विहारांमध्ये जास्तीत जास्त भिक्षूंपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांची बांधिलकी द...

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वर्धा जिल्हा पदाधिकारी बैठक

 🖊️प्रविण जगताप 🖊️वर्धा जिल्हा प्रतिनिधी मो . 9284981757 वर्धा *आज दिनांक ०२ /१० /२०२३ रोजी वर्धा येथे महात्मा लॉन येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे जिल्हाध्यक्ष मा श्री सुनीलभाऊ राऊत साहेब यांच्या निर्देशाखाली ही' सभा घेण्यात आली वर्धा जिल्हा पदाधिकारी बैठक घेण्यासाठी संसदरत्न, कार्यकारी अध्यक्ष, खासदार सौ सुप्रियाताई सुळे , माजी गृहमंत्री मा श्री अनिलभाऊ देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश महिला प्रदेशाध्यक्ष सौ रोहिनिताई खडसे , राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मा श्री महेबूबभाई शेख या सर्व दिग्गज नेत्यां च्या नेतृत्वात खाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वर्धा जिल्हा पदाधिकारी बैठक घेण्यात आली वर्धा जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते बैठकीनंतर काही युवक व तरुण मुलांचे पक्ष प्रवेश घेण्यात आले हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती मा श्री सुधीर बाबूजी कोठारी, माजी आमदार मा श्री राजूभाऊ तिमांडे , प्रदेश सरचिटणीस मा श्री अतुल भाऊ वांदिले , वर्धा जिल्हा अध्यक्ष मा श्री सुनीलभाऊ राऊत, मा श्री समीर भाऊ देशमुख, वर्धा जिल्हा राष्ट्रवादी यु...

10 हजार से ज्यादा भक्तों ने लिया महाप्रसाद का लाभ -विदर्भ के 11 जिलों से आये भक्तों द्वारा रोग निदान,नेत्र जांच ,रक्तदान शिबिर में लिया लाभ

 10 हजार से ज्यादा भक्तों ने लिया महाप्रसाद का लाभ -विदर्भ के 11 जिलों से आये भक्तों द्वारा रोग निदान,नेत्र जांच ,रक्तदान शिबिर में लिया लाभ नागपुर. ((आनन्दमनोहर जोशी) श्राद्ध पक्ष के दौरान सोमवार की चतुर्थी को संकष्टी चतुर्थी से चतुर्दशी तक उत्सव मनाया जा रहा है.वहीँ महल स्थित सीनियर भोसला पैलेस महल में महाराजा ऑफ नागपुर ट्रस्ट के तत्वावधान मे 236 वें वार्षिकोत्सव पर मस्करया श्रीगणेश की विधिवत पूजा रोजाना शाम को राजपुरोहित राजेंद्र पुराणिक के हस्ते मंत्रोच्चारण किया जा रहा है.सरकारी मेडिकल कॉलेज डॉक्टर की टीम ने सफलतापूर्वक प्रयास किया. यहाँ इस दौरान विदर्भ के 11 जिलों से आये भक्तगणों ने स्वास्थ्य शिबिर का लाभ लिया. महाप्रसाद के दौरान अन्न का थालियाँ में उचित मात्रा में प्रसाद के रूप में लेकर जूठा नहीं छोड़ने के लिए सारंग,गणेश गरुड़ और कार्यकर्ताओं द्वारा उद्धोषणा करके निवेदन किये गए.इस विशेष अवसर पर श्रीमंत डॉ. राजे मुधोजी महाराज भोंसले, श्रीमंत रानी यशोधराराजे, श्रीमंत राजे रघुजी भोंसले, श्रीमंत राजे युवराज जयसिंहराव भोंसले,क़ानूनी सलाहकार अधिवक्ता प्रदीप देशमुख, हप्पेनिंग टुडे क...