पोलीस स्टेस्शन कळमेश्वर अंतर्गत पळवून नेणाऱ्या आरोपी युवका विरूध्द गुन्हा दाखल
पो.स्टे. कळमेश्वर :- दिनांक १९/१०/२०२३ चे संध्याकाळी ७.३० वा. दरम्यान पो.स्टे. कळमेश्वर हधीत फिर्यादीची मुलगी वय १४ वर्ष ही तिचे आजीला मंदिरात जाते, असे सांगुन घरुन निघुन गेली. यानंतर फिर्यादी त्याच दिवशी हे रात्री ८.३० वा. दरम्यान घरी गेले असता मुलगी ही घरी दिसली नाही. जास्त वेळ होऊन सुध्दा घरी न आल्याने फिर्यादी व त्यांचे परीवाराने मुलीचा शोध घेतला परंतु ती मिळुन आली नाही. फिर्यादीची मुलगी ही यापुर्वीही घरुन निघुन गेली होती. त्यावेळी कळमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्याचे ०३ तासानंतर ती परत आली होती. यावेळी सुध्दा ती घरी परत येईल म्हणुन फिर्यादी नातेवाईकांकडे जाऊन शोध घेत होते. फिर्यादीने मुलीच्या मैत्रीणीला विचारले असता, फिर्यादीची मुलगी ही हुडको कॉलोनी कळमेश्वर येथे राहणाऱ्या रोहण कमलेश सींग याचेसह नेहमी बोलचाल करित असते त्यानेच फिर्यादीच्या मुलीला पळवुन नेले असावे असे तीने सांगितले. करिता फिर्यादीच्या मुलीचा अल्पवयाचा फायदा घेऊन आरोपी रोहण कमलेश सींग याने फुस लावुन पळवुन नेले असावे असा फिर्यादीला संशय आहे.
सदर प्रकरणी फिर्यादी यांच्या रिपोर्टवरुन पो.स्टे. कळमेश्वर येथे आरोपीविरुध्द कलम ३६३ भादंवि कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास सहायक फौजदार मनोज गाढवे हे करीत आहे.