गणेशपेठ पोलीसांची कामगिरी घरफोडी करणाऱ्या आरोपींना अटक, एकुण ४,२५,२३०/- रू चा मुद्देमाल जप्त.
नागपुर : दिनांक ०३ ऑक्टोबर.२३ चे रात्री १.३० वा. ते दिनांक २० ऑक्टोबर २३ चे ११ ३० वा. चे दरम्यान फिर्यादी सुनिल शामरावजी नवगरे वय ४९ वर्ष, रा. के.पी. अपार्टमेंट, फ्लॅट नं. १०२, गाडगे महाराज मंदीर मागे, विठ्ठठल नगर, हुडकेश्वर, नागपुर हे पोलीस ठाणे गणेशपेठ हद्दीतील महानगर पालीका, विदयुत विभाग कार्यालय, फुले मार्केट, नागपुर, येथे कनिष्ठ अभियंता पदावर कार्यरत आहे. त्यांनी कॉटन मार्केट येथील विदयुत विभागाचे गोडाउन रूम नं. १०१ नागपुर, मध्ये स्ट्रीट लाईट, फिटींगचे व ईलेक्ट्रीक चे ईतर साहीत्य ठेवलेले होते, कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्या विदयुत विभागाचे गोडाउनचे दाराची कड़ी तोडुन, गोडावूनमध्ये प्रवेश करून, त्यामधील स्ट्रीट लाईट, तसेच फिटींगचे व ईलेक्ट्रीक वे इतर साहीत्य असा एकूण ७,६५,१८०/- रू या मुद्देमाल चोरून नेला. फिर्यादी यांनी दि. २१.१०.२०२३ रोजी दिलेल्या तक्रारीवरून पो. ठाणे गणेशपेठ येथे अज्ञात आरोपी विरुध्द कलम ४५४, ४५७, ३८० भादवि अन्यये गुन्हा नोंदविण्यात आलेला होता.
सदर गुन्हयाचे तपासा दरम्यान गणेशपेठ पोलीसांनी तांत्रीक तपास करून तसेच मिळालेले खात्रीशीर माहिती वरून सापळा रचुन आरोपी १) अनिल बैजु गौर वय ३६ वर्ष रा. कबाडी गल्ली, फुले मार्केट, गणेशपेठ, नागपुर २) राजु मानसिंग जाटव वय ३४ रा. आमगाव वडा, नरसिंगपूर, म.प्र, ह.मु आरोपी क १ चे घरी यांना ताब्यात घेवुन विचारपूस केली असता आरोपींनी वर नमुद चोरी केल्याची कबुली दिली. आरोपी क. १ चे घरझडती मध्ये मुद्देमाल मिळुन आला. तसेच आरोपीनी काही मुद्देमाल एम्प्रेस मॉल समोर विकी करीता अॅक्टीव्हा क. एम. एच ४९ ए.एन ४९४९ चा वापर केल्याने अॅक्टीव्हा जप्त करण्यात आली आहे. आरोपींचे ताब्यातुन एकुण ४,२५,२३०/- रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
वरील कामगिरी मा. पोलीस उप-आयुक्त, परि. क. ०३, मा. सहायक पोलीस आयुक्त, कोतवाली विभाग वपोनि ऋषिकेश घाडगे यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि सारंग मिराशी, पोउपनि दिनेश मानुसमारे, पोहवा अनिल दुबे, नापणेअ आशिष दुबे, राकेश कोलते पोअ अश्विन गुमगावकर व पवन मालखेडे यांनी केली.