परीक्षा केंद्रावर 144 कलम लागू
🖊️प्रविण जगताप 🖊️वर्धा जिल्हा प्रतिनिधी मो . 9284981757
वर्धा, दि.24 : महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेवा संवर्गातील विविध पदे सरळसेवेने भरण्यासाठी महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा गट-क परिक्षा वेळापत्रकानुसार दि.25 ऑक्टोंबर ते 3 नोव्हेंबर या कालावधीत शहरातील विविध केंद्रावर ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येणार आहे. सदर परिक्षेचे संचालन सुयोग्य प्रकारे व्हावे, परिक्षा केंद्रावर गैरप्रकार होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी आदेश निर्गमित करुन संबंधित परिक्षा केंद्राच्य परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू केले आहे.
जिल्ह्यातील अभियांत्रिकी ऑफ इंजिनिअरींग ॲन्ड टेक्नॉलॉजी, दत्ता मेघे इन्स्टिटयूट ऑफ हायर एज्युकेशन ॲन्ड रिसर्च डियु सालोड हिरापूर, स्कुल ऑफ स्काँलर्स सावंगी मेघे, अग्निहोत्री ऑनलाईन एक्झामिनेशन सेंटर एसएसपीएसीई बापुजी वाडी रामनगर, तान्या कॉम्पुटर होंडा शोरुमच्या समोर या परिक्षा केंद्रावर सकाळी 8 ते सायंकाळी 7 या वेळेत परिक्षा घेण्यात येणार आहे.
परीक्षेच्या कालावधीत केंद्राच्या 100 मीटरच्या परिसरात 144 कलम लागू असून परीक्षा केंद्रावर किंवा केंद्रपरीसरात 2 किंवा त्यापेक्षा जास्त व्यवक्तीच्या जमावावर आणि परिक्षा केंद्राचे 100 मीटर परिसरात मोबाईल, पेजर, मायक्रोफोन, कॅमेरा, टॅब, लॅपटॉप, हेडफोन, स्मॉल कॅमेरा फिटेड ऑन वॉचेस, शर्ट बटन, पेन, रिंग्ज, स्पॉय कॅमेरा, स्मार्ट वाचेस, लेसेस, ब्लु टुथ आदी ईलेक्ट्रॉनिक स्वरुपाच्या प्रगत तंत्रज्ञानाच्या संयंत्राच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे.
सदर आदेश परिक्षेकरीता नियुक्त अधिकारी, कर्मचारी, पर्यवेक्षक, पोलिस अधिकारी, कर्मचारी व परीक्षेशी निगडीत अधिकारी, कर्मचारी आणि परिक्षार्थी यांना लागू असणार नाही, असे आदेशात नमुद आहे.