जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते महारेशीम अभियानाचा चित्ररथाद्वारे जनजागृती शुभारंभ 🖊️प्रविण जगताप 🖊️वर्धा जिल्हा प्रतिनिधी मोबाईल :- 9284981757 वर्धा, दि.24 : रेशीम उद्योगास प्रोत्साहन मिळण्यासाठी तसेच राज्य शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती चित्ररथाद्वारे गावपातळीवर पोहोचविण्यासाठी महा-रेशीम अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा शुभारंभ जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्याहस्ते चित्ररथाला हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आयोजित शुभारंभ कार्यक्रमाला जिल्हा नियोजन अधिकारी अनिरुध्द राजुरवार, जिल्हा रेशीम कार्यालयाच्या वरिष्ठ तांत्रिक सहायक रजनी बन्सोड, क्षेत्र सहायक ज्ञानेश्वर भैरम, शुभम ताकोते, पॅनल तांत्रिक अधिकारी योगेश रोडे, मंगेश हांडे, रविंद्र नागपूरकर जिल्ह्यातील प्रगतशील शेतकरी अविनाश वाट, सचिन वाघमारे, प्रांजल वाघमारे, अविनाश शंभरकर इत्यादी उपस्थित होते. रेशीम उद्योग हा खरोखरच आर्थिक लाभ मिळवून देणारा उद्योग असून पारंपारीक पिकाला एक उत्कृष्ठ जोडधंदा ठरत आहे. शास्त्रोक्त पध्दतीने रेशीम शेती केली तर मोठ...