सीधे मुख्य सामग्री पर जाएं

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाच्या मंजूर प्रकरणांची संख्या वाढवा - उद्योगमंत्री उदय सामंत

 मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाच्या मंजूर प्रकरणांची संख्या वाढवा - उद्योगमंत्री उदय सामंत

एमआयडीसी व रोजगार निर्मिती कार्यक्रमाचा आढावा

जिल्ह्यातील उद्योजकांशी चर्चा, समस्या जाणून घेतल्या

वर्धा, देवळी एमआयडीसीला पायाभूत सुविधांसाठी निधी

जिल्ह्यात उद्योग भवन उभारण्यासाठी 11.76 कोटी मंजूर

वर्धा, दि.23 : होतकरू तरुणांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासोबतच त्यांना उद्योजक बनविण्यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती अत्यंत महत्वाचा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात मंजूर प्रकरणांची संख्या वाढवा. बॅंकांनी या योजनेतून प्रस्ताव मंजूर करतांना सामाजिक भावनेतून त्याकडे पहावे. जास्तीत जास्त प्रकरणे कसे मंजूर करता येईल असा दृष्टीकोण बाळगावा, असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात श्री.सामंत यांनी जिल्ह्यातील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वसाहती व मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमासह उद्योग विभागाचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला खा.रामदास तडस, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी विजय राठोड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी उपेंद्र तामोरे, प्रभारी अतिरिक्त जिल्हाधिकारी शिल्पा सोनाले, निवासी उपजिल्हाधिकारी गणेश खताळे, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी महेंद्र पटेल, उद्योग सहसंचालक गजेंद्र भारती, अधीक्षक अभियंता सुनील अकुलवार, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक कमलेशकुमार जैन यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

श्री.सामंत यांनी यावेळी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाचा मागील वर्ष व यावर्षाच्या प्रगतीचा आढावा घेतला. बॅंकांनी जास्तीत जास्त प्रकरणे मंजूर करावे, असे निर्देश त्यांनी बॅंकांना दिले. यावर्षी 500 प्रकरणांचे उद्दिष्ट पुर्ण करण्याच्या सुचना त्यांनी केल्या. सोबतच प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम व प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचे अधिकाधिक प्रस्ताव मंजूर करण्याच्या सुचना केल्या. केंद्र शासनाची प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना अतिशय चांगली असून योजनेच्या जनजागृतीसाठी जिल्ह्यातील सरपंच व सचिवांची स्वतंत्र कार्यशाळा घेण्यात यावी, असे ते म्हणाले.

एमआयडीसीचा आढावा घेतांना त्यांनी जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींची स्थिती, तेथील उद्योग, पायाभूत सुविधांची माहिती घेतली. ज्या भूखंडावर विहीत कालावधीत उद्योग उभारले गेले नसतील, असे भूखंड परत घेण्याचे निर्देश त्यांनी दिले. जिल्ह्यात एकून 6 औद्योगिक वसाहती आहे. यापैकी काही ठिकाणी भूखंड शिल्लक नाही. जेथे जास्त मागणी आहे, अशा ठिकाणी अतिरिक्त जमीनीच्या संपादनाची कार्यवाही करण्यात यावी. हिंगणघाट, कारंजा या विद्यमान औद्योगिक वसाहतीत अतिरिक्त भूखंडासह नवीन मंजूर आर्वी अशा तीन ठिकाणी 676 हेक्टर जमीन संपादीत केली जात आहे. या जमिनीचे लवकरच वाटप करण्याच्या सुचना त्यांनी केल्या.

वर्धा आणि देवळी येथील औद्योगिक वसाहतीत रस्ते, वीज, पाणी अशा पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. जिल्ह्यात नवीन उद्योग भवन बांधण्यात येत असून त्यासाठी 11 कोटी 76 लाख रुपये मंजूर करण्यात आले. या भवनाच्या बांधकामाचे भूमिपूजन तातडीने घेण्याची सुचना त्यांनी केली. जिल्ह्यातील उद्योजकांशी देखील श्री.सामंत यांनी चर्चा केली. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. औद्योगिक वसाहतीत चांगल्या पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातील, असे ते म्हणाले. यावेळी उद्योजकांनी केलेल्या मागण्यांवर सकारात्मक कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना दिले. बैठकीला विविध विभागाच्या अधिकाऱ्यांसह बॅंकांचे जिल्हास्तरीय समन्वयक उपस्थित होते.

विश्वकर्मा योजना उत्तमप्रकारे राबवा - खा.तडस

यावेळी खा.रामदास तडस यांनी औद्योगिक वसाहतीतील पायाभूत सुविधांचा उद्दा उपस्थित केला. देवळी येथील वसाहतीत अतिरिक्त जागेची आवश्यकता आहे. तसेच या वसाहतीतील खराब रस्त्यांची दुरुस्ती होणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. केंद्र शासनाची प्रधानमंत्री विश्वकर्मा ही अतिशय चांगली योजना असून जिल्ह्यात ही योजना शासकीय विभाग व बॅंकांनी उत्तप्रकारे राबविण्याच्या सुचना त्यांनी केल्या.

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वर्धा जिल्हा पदाधिकारी बैठक

 🖊️प्रविण जगताप 🖊️वर्धा जिल्हा प्रतिनिधी मो . 9284981757 वर्धा *आज दिनांक ०२ /१० /२०२३ रोजी वर्धा येथे महात्मा लॉन येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे जिल्हाध्यक्ष मा श्री सुनीलभाऊ राऊत साहेब यांच्या निर्देशाखाली ही' सभा घेण्यात आली वर्धा जिल्हा पदाधिकारी बैठक घेण्यासाठी संसदरत्न, कार्यकारी अध्यक्ष, खासदार सौ सुप्रियाताई सुळे , माजी गृहमंत्री मा श्री अनिलभाऊ देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश महिला प्रदेशाध्यक्ष सौ रोहिनिताई खडसे , राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मा श्री महेबूबभाई शेख या सर्व दिग्गज नेत्यां च्या नेतृत्वात खाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वर्धा जिल्हा पदाधिकारी बैठक घेण्यात आली वर्धा जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते बैठकीनंतर काही युवक व तरुण मुलांचे पक्ष प्रवेश घेण्यात आले हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती मा श्री सुधीर बाबूजी कोठारी, माजी आमदार मा श्री राजूभाऊ तिमांडे , प्रदेश सरचिटणीस मा श्री अतुल भाऊ वांदिले , वर्धा जिल्हा अध्यक्ष मा श्री सुनीलभाऊ राऊत, मा श्री समीर भाऊ देशमुख, वर्धा जिल्हा राष्ट्रवादी यु...

बुद्ध विहार येथे बौद्ध भिक्खूंसाठी पोषण जागृती मालिकेचे चौथे सत्र संपन्न

  *बुद्ध विहार येथे बौद्ध भिक्खूंसाठी पोषण जागृती मालिकेचे चौथे सत्र संपन्न*  *निकिता पाटील, प्रख्यात आहारतज्ञ * बौद्ध भिक्खूंसाठी आहार शिक्षण सत्रांची मालिका सुरू ठेवत, मिठास केअरच्या सहकार्याने न्यूट्रा पॉवरने 8 ऑक्टोबर रोजी बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर बौद्ध सेमिनरी, उंटखाना बुद्ध विहार, नागपूर येथे आपले चौथे सत्र आयोजित केले होते. मिठास केअरचे संस्थापक विवेक नगरारे यांनी भिक्षु संघ आहार शिक्षण सत्र अभियानाच्या दूरदृष्टीची माहिती देऊन सत्राची सुरुवात केली. या अभियाना चे पहले सत्र 22 एप्रिल रोजी मैत्री बुद्ध विहार, नारी रोड, नागपूर येथून झाली आणि ह्याचे उद्दिष्ट 1000 हून अधिक बौद्ध भिक्खूंना आरोग्य व पोषण जागृती चे सशक्ति प्रदान करणे आहे ज्यासाठी कदाचित शहरभरातील 100 बुद्ध विहारांमध्ये प्रवास करण्याची आवश्यकता असू शकते. डॉ.आंबेडकर सेमिनरीचे मुख्य धम्म प्रशिक्षक भदंत धम्मसारथी यांनी संपूर्ण समुह ला त्यांच्या मिशनचा सक्रिय भाग बनवण्याची आणि समाजात पोषण शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी नागपूरच्या विविध बुद्ध विहारांमध्ये जास्तीत जास्त भिक्षूंपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांची बांधिलकी द...

10 हजार से ज्यादा भक्तों ने लिया महाप्रसाद का लाभ -विदर्भ के 11 जिलों से आये भक्तों द्वारा रोग निदान,नेत्र जांच ,रक्तदान शिबिर में लिया लाभ

 10 हजार से ज्यादा भक्तों ने लिया महाप्रसाद का लाभ -विदर्भ के 11 जिलों से आये भक्तों द्वारा रोग निदान,नेत्र जांच ,रक्तदान शिबिर में लिया लाभ नागपुर. ((आनन्दमनोहर जोशी) श्राद्ध पक्ष के दौरान सोमवार की चतुर्थी को संकष्टी चतुर्थी से चतुर्दशी तक उत्सव मनाया जा रहा है.वहीँ महल स्थित सीनियर भोसला पैलेस महल में महाराजा ऑफ नागपुर ट्रस्ट के तत्वावधान मे 236 वें वार्षिकोत्सव पर मस्करया श्रीगणेश की विधिवत पूजा रोजाना शाम को राजपुरोहित राजेंद्र पुराणिक के हस्ते मंत्रोच्चारण किया जा रहा है.सरकारी मेडिकल कॉलेज डॉक्टर की टीम ने सफलतापूर्वक प्रयास किया. यहाँ इस दौरान विदर्भ के 11 जिलों से आये भक्तगणों ने स्वास्थ्य शिबिर का लाभ लिया. महाप्रसाद के दौरान अन्न का थालियाँ में उचित मात्रा में प्रसाद के रूप में लेकर जूठा नहीं छोड़ने के लिए सारंग,गणेश गरुड़ और कार्यकर्ताओं द्वारा उद्धोषणा करके निवेदन किये गए.इस विशेष अवसर पर श्रीमंत डॉ. राजे मुधोजी महाराज भोंसले, श्रीमंत रानी यशोधराराजे, श्रीमंत राजे रघुजी भोंसले, श्रीमंत राजे युवराज जयसिंहराव भोंसले,क़ानूनी सलाहकार अधिवक्ता प्रदीप देशमुख, हप्पेनिंग टुडे क...