सीधे मुख्य सामग्री पर जाएं

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते महारेशीम अभियानाचा चित्ररथाद्वारे जनजागृती शुभारंभ

 


जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते महारेशीम अभियानाचा चित्ररथाद्वारे जनजागृती शुभारंभ

  🖊️प्रविण जगताप 🖊️वर्धा जिल्हा प्रतिनिधी मोबाईल :- 9284981757

वर्धा, दि.24 : रेशीम उद्योगास प्रोत्साहन मिळण्यासाठी तसेच राज्य शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती चित्ररथाद्वारे गावपातळीवर पोहोचविण्यासाठी महा-रेशीम अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा शुभारंभ जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्याहस्ते चित्ररथाला हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला. 

 जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आयोजित शुभारंभ कार्यक्रमाला जिल्हा नियोजन अधिकारी अनिरुध्द राजुरवार, जिल्हा रेशीम कार्यालयाच्या वरिष्ठ तांत्रिक सहायक रजनी बन्सोड, क्षेत्र सहायक ज्ञानेश्वर भैरम, शुभम ताकोते, पॅनल तांत्रिक अधिकारी योगेश रोडे, मंगेश हांडे, रविंद्र नागपूरकर जिल्ह्यातील प्रगतशील शेतकरी अविनाश वाट, सचिन वाघमारे, प्रांजल वाघमारे, अविनाश शंभरकर इत्यादी उपस्थित होते.

 रेशीम उद्योग हा खरोखरच आर्थिक लाभ मिळवून देणारा उद्योग असून पारंपारीक पिकाला एक उत्कृष्ठ जोडधंदा ठरत आहे. शास्त्रोक्त पध्दतीने रेशीम शेती केली तर मोठ्या प्रमाणावर फायद्याची ठरणार आहे. जिल्ह्यामधील बऱ्याच शेतकऱ्यांनी ही फायद्याची शेती यशस्वीपणे केली आहे. त्यामुळे या अभियानांतर्गत जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या रेशीम शेतीकडे वळण्यासाठी नाव नोंदणी करावी व शासनाच्या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी शुभारंभाप्रसंगी केले.

 अभियानादरम्यान रेशीम उद्योग करु इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी दि.20 नोव्हेंबर ते दि.20 डिसेंबरपर्यंत नाव नोंदणी करावयाची आहे. पात्र शेतकऱ्यांना एक एकर तुती लागवडी करीता 500 रुपये नोंदणी शुल्क भरुन आवश्यक कागदपत्रासह नोंदणी करणे आवश्यक आहे. रेशीम उद्योग हा शेती आधारीत असल्याने शेतकऱ्यांच्या मागणीनुसार स्वत:च्या शेतीवर कामकाज करुन त्या शेतात केलेल्या कामकाजाची मजुरी शासनाकडुन मनरेगाच्या नियमानुसार तीन वर्षाकरीता दिली जाते. या मध्ये रेशीम शेतीच्या माध्यमातून उत्पादीत कोषापासुन होणारे उत्पन्न त्या लाभार्थ्यास दुहेरी लाभ मिळवून देईल.  

लाभार्थ्यांस तीन वर्षा करीता 682 मनुष्य दिवस तुती लागवड, जोपासना व किटक संगोपन करणे तसेच 213 मनुष्य दिवस किटक संगोपनगृह बांधकामाच्या कालावधी मध्ये मजुरी अदा केली जाते. रेशीम पिकासाठी लागणाऱ्या संगोपनगृहासाठी कुशल खर्चाकरीता 1 लाख 21 हजार रुपये व साहित्यासाठी 32 हजार रुपये दिले जाणार आहे. अधिकचा खर्च लाभार्थी हिस्सा म्हणून लाभार्थ्याने स्वत: करावयाचा आहे. जे लाभार्थी मनरेगा योजनेमध्ये बसत नाही, अशा लाभार्थ्यांसाठी केंद्र पुरस्कृत सिल्क समग्र 2 योजना राबविण्यात येत आहे. या योजनेतून तुती लागवड, किटक संगोपनगृह बांधकाम, साहित्य, तुती रोप वाटिका, बाल किटक संगोपन केंद्र, रेशीम कोषापासुन धागा तयार करण्यासाठी मल्टिएंड रिलींग मशीन करीता सर्वसाधारण वर्गासाठी अनुदान देण्यात येते, असे जिल्हा रेशीम विकास अधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वर्धा जिल्हा पदाधिकारी बैठक

 🖊️प्रविण जगताप 🖊️वर्धा जिल्हा प्रतिनिधी मो . 9284981757 वर्धा *आज दिनांक ०२ /१० /२०२३ रोजी वर्धा येथे महात्मा लॉन येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे जिल्हाध्यक्ष मा श्री सुनीलभाऊ राऊत साहेब यांच्या निर्देशाखाली ही' सभा घेण्यात आली वर्धा जिल्हा पदाधिकारी बैठक घेण्यासाठी संसदरत्न, कार्यकारी अध्यक्ष, खासदार सौ सुप्रियाताई सुळे , माजी गृहमंत्री मा श्री अनिलभाऊ देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश महिला प्रदेशाध्यक्ष सौ रोहिनिताई खडसे , राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मा श्री महेबूबभाई शेख या सर्व दिग्गज नेत्यां च्या नेतृत्वात खाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वर्धा जिल्हा पदाधिकारी बैठक घेण्यात आली वर्धा जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते बैठकीनंतर काही युवक व तरुण मुलांचे पक्ष प्रवेश घेण्यात आले हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती मा श्री सुधीर बाबूजी कोठारी, माजी आमदार मा श्री राजूभाऊ तिमांडे , प्रदेश सरचिटणीस मा श्री अतुल भाऊ वांदिले , वर्धा जिल्हा अध्यक्ष मा श्री सुनीलभाऊ राऊत, मा श्री समीर भाऊ देशमुख, वर्धा जिल्हा राष्ट्रवादी यु...

दारुच्या नशेत एसटी चालविणाऱ्या चालकास पोलिसांनी घेतले ताब्यात.वेळ सावधतेने प्रवाशांचे वाचले जीव.

 दारुच्या नशेत एसटी चालविणाऱ्या चालकास पोलिसांनी घेतले ताब्यात.वेळ सावधतेने प्रवाशांचे वाचले जीव. यवतमाळ – मदयधुंद अवस्थेत एस.टी. बस चालविने पडले महाग. २२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या चालकाची जेलम ध्ये रवानगी करण्यात आली.सविस्तर वृत्त असे की दि.२२/०८/२०२३ रोजी सकाळी यवतमाळ ते छत्रपती संभाजी नगर ला जाणारी यवतमाळ आगाराची एस.टी.बस MH ४०CM ५१२१ हि दारव्हा बस स्थानकावरून २२ प्रवाशांसह रवाना झाली या बस मध्ये बालक म्हणुन नारायन मारोती एकुंडवार तर वाहक म्हणुन प्रशांत पांडुरंग भगत असे नेमणुकीस होते. बस दारव्हा येथुन निघुन कारंजा रोडवर ५ किमी अंतरावरील चिखली फाटा येथे पोहचली असता बस वेडी वाकडी धाऊ लागली प्रवाशांनी आरडा ओरड करताच चालकाने बस थांबविली व स्टेअरींग वर त्याने मान टाकली प्रवाशांनी चालकास विचारपुस केली असता तो पुर्णपणे दारूच्या नसेत असल्याचे व त्यास बोलता बघता देखील येत नसल्याचे दिसुन आले. या बाबत वाहक भगत यांनी दारव्हा आगाराला माहीती देताच आगाराच्या अधिका-यानी घटनास्थळी जावुन चालकास ताब्यात घेवुन पोलीस स्टेशन ला हजर केले. पोलीस स्टेशन ला देखील चालक नारायन ऐकुंडवार यास निट उभे राहता ये...

PETROCHEMICAL COMPLEX VIABLE IN NAGPUR SAYS EIL REPORT

  PETROCHEMICAL COMPLEX VIABLE IN NAGPUR SAYS EIL REPORT The much-awaited techno-economic feasibility study Report prepared by Engineers India Ltd. (EIL), was handed over to Dr. Vipin Sharma, IAS, CEO - MIDC in Mumbai recently. The handing over was done by Vinayak Marathe, refinery and petrochimal expert in the presence of Varun Phuljhale (EIL), Anil Kumar (EIL), Dr. Vijay Rathod, IAS,Jt. CEO (V), and Upendra Tamore Dep. CEO – MIDC. A presentation was also made by EIL on the subject. Although this is an Interim Report, according to the Report, the petrochemical complex is viable in Nagpur with 8 options of various feedstock comprising naptha and ethane gases. The next step would be handing over the Report to Devendra Fadnavis, DCM and Minister Industries, Uday Samant, (GoM) who would seek investors for the project from among Public Sector Undertakings. Meanwhile, it is understood that Gas Authority of India Ltd. (GAIL) is keen on investing in Maharashtra in a petrochemical complex....