सीधे मुख्य सामग्री पर जाएं

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पाठबळामुळे झाला इंजिनियर : खामगावच्या महादेव चरपेचा अनोखा संघर्ष

 


तरुणाच्या जिद्दीपुढे स्वप्ने झुकतात तेव्हा...

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पाठबळामुळे झाला इंजिनियर : खामगावच्या महादेव चरपेचा अनोखा संघर्ष

नागपूर : बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव परिसरातील जळका तेली नावाचे एक छोटेसे गाव. लोकसंख्या जेमतेम बारा-पंधराशे. या गावात वर्षानुवर्षे भाड्याच्या घरात राहणाऱ्या चरपे कुटुंबातील मुलगा इंजिनियर होण्याचे स्वप्न बघतो. आपलं स्वप्न फक्त नितीन गडकरीच पूर्ण करू शकतात, या विश्वासाने नागपूर गाठतो...सहा वर्षांत आपल्या जिद्दीपुढे स्वप्नांना झुकवतो आणि इंजिनियर होऊन एका मोठ्या कंपनीत नोकरीलाही लागतो.

ही संघर्षगाथा आहे महादेव बाळकृष्ण चरपे नावाच्या एका ध्येयवेड्या तरुणाची. वडील एका बंद पडलेल्या कारखान्याचे केअरटेकर आणि आई पुष्पा गृहिणी. महादेवला दहाव्या वर्गात अवघे ४३ टक्के गुण मिळाले, तरीही त्याच्यात इंजिनीयर होण्याची जिद्द निर्माण झाली. त्यासाठी एक निमित्त ठरले. दरवर्षी खामगावमधून शेगाव येथे संत गजानन महाराजांची वारी निघते. एका वर्षी या वारीत महादेवची एका व्यक्तीशी ओळख झाली. ‘आपण काय करता?’ असे त्याने कुतुहलाने त्याला विचारले. ती व्यक्ती वैमानिक असल्याचे त्याला कळले. मग महादेवच्या मनातही वैमानिक होण्याची इच्छा निर्माण झाली. त्यानंतर वैमानिक होण्यासाठी एरोनॉटिकल इंजिनियरिंग आवश्यक असल्याची माहिती तर त्याने काढली; पण, आर्थिक परिस्थिती जेमतेम होती. असे असताना एवढे मोठे ध्येय गाठायचे कसे, हा प्रश्न होता. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आपलं स्वप्न पूर्ण करू शकतात, असा विश्वास त्याला होता. पण त्यांच्यापर्यंत पोहोचायचे कसे, हे त्याला कळत नव्हते. काही वर्षांपूर्वी नागपुरात ना. श्री. गडकरी यांच्या महाल येथील निवासस्थानी तो पाचवेळा आला. पण प्रत्येकवेळी साहेब नागपुरात नसल्याचे कळल्यामुळे तो परत गेला. त्यानंतर त्याला कार्यालयातूनच शनिवार किंवा रविवारी येण्याचा सल्ला देण्यात आला. त्याप्रमाणे तो एक दिवस आला. सगळी गर्दी ओसरायची वाट बघितली. तो वाट पाहत असल्याचे नितीनजींच्या लक्षात आले. त्यांनी त्याला बोलावले, आस्थेने विचारपूस केली.

 ना. श्री. नितीन गडकरी यांना महादेव अखेर भेटला आणि त्याने मंत्री महोदयांना आपले ध्येय सांगितले. महादेव ज्या विश्वासाने त्यांच्याकडे आला होता, अगदी त्याप्रमाणे ना. श्री. गडकरी यांनी त्याला इंजिनियरींग कॉलेजला प्रवेश मिळण्यासाठी मदतीचा हात दिला. त्यानंतर वसतीगृहातील प्रवेशापासून त्याच्या दैनंदिन जीवनात आवश्यक असलेल्या सर्व सोयींपर्यंत सगळी जबाबदारी ना. श्री. गडकरी यांचे सुपुत्र श्री. निखिल गडकरी यांनी सांभाळली. महादेव एरोनॉटिक्समध्ये इंजिनियर झाला. पण पुढचा प्रवास खडतर होता. दरम्यानच्या काळात त्याने हैदराबादमध्ये राहून सॉफ्टवेअरचे कोर्सेस केले. आपला खर्च भागविण्यासाठी एका कॉल सेंटरमध्येही काम केले. कोरोनामुळे काही महिने त्याला वाट बघावी लागली. त्याचे प्रयत्न सुरू होते आणि आता त्याला नागपुरात एका मोठ्या कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी लागली. आज 3 सप्टेंबरला नियुक्तीपत्र घेऊन तो आज थेट मंत्री महोदयांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचला. ‘आपण मदत केली नसती तर आज येथपर्यंत पोहोचू शकलो नसतो’, या शब्दांत कृतज्ञता व्यक्त करताना महादेवचे डोळे पाणावले होते.

ना. श्री. नितीन गडकरी यांना आनंद

महादेव आज पुन्हा गर्दीत उभा होता. मंत्री महोदयांनी त्याला लगेच ओळखले, आवाज दिला आणि विचारपूस केली. त्यावर महादेवने नियुक्तीपत्र दाखवले. ना. श्री. नितीन गडकरी यांना नियुक्ती पत्र बघून कमालीचा आनंद झाला. त्यांनी महादेवचे भेटवस्तू देऊन अभिनंदन केले. त्याच्यासोबत गप्पा मारल्या. मंत्री महोदयांच्या आदरातिथ्याने महादेव अक्षरशः भारावून गेला.

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वर्धा जिल्हा पदाधिकारी बैठक

 🖊️प्रविण जगताप 🖊️वर्धा जिल्हा प्रतिनिधी मो . 9284981757 वर्धा *आज दिनांक ०२ /१० /२०२३ रोजी वर्धा येथे महात्मा लॉन येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे जिल्हाध्यक्ष मा श्री सुनीलभाऊ राऊत साहेब यांच्या निर्देशाखाली ही' सभा घेण्यात आली वर्धा जिल्हा पदाधिकारी बैठक घेण्यासाठी संसदरत्न, कार्यकारी अध्यक्ष, खासदार सौ सुप्रियाताई सुळे , माजी गृहमंत्री मा श्री अनिलभाऊ देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश महिला प्रदेशाध्यक्ष सौ रोहिनिताई खडसे , राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मा श्री महेबूबभाई शेख या सर्व दिग्गज नेत्यां च्या नेतृत्वात खाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वर्धा जिल्हा पदाधिकारी बैठक घेण्यात आली वर्धा जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते बैठकीनंतर काही युवक व तरुण मुलांचे पक्ष प्रवेश घेण्यात आले हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती मा श्री सुधीर बाबूजी कोठारी, माजी आमदार मा श्री राजूभाऊ तिमांडे , प्रदेश सरचिटणीस मा श्री अतुल भाऊ वांदिले , वर्धा जिल्हा अध्यक्ष मा श्री सुनीलभाऊ राऊत, मा श्री समीर भाऊ देशमुख, वर्धा जिल्हा राष्ट्रवादी यु...

बुद्ध विहार येथे बौद्ध भिक्खूंसाठी पोषण जागृती मालिकेचे चौथे सत्र संपन्न

  *बुद्ध विहार येथे बौद्ध भिक्खूंसाठी पोषण जागृती मालिकेचे चौथे सत्र संपन्न*  *निकिता पाटील, प्रख्यात आहारतज्ञ * बौद्ध भिक्खूंसाठी आहार शिक्षण सत्रांची मालिका सुरू ठेवत, मिठास केअरच्या सहकार्याने न्यूट्रा पॉवरने 8 ऑक्टोबर रोजी बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर बौद्ध सेमिनरी, उंटखाना बुद्ध विहार, नागपूर येथे आपले चौथे सत्र आयोजित केले होते. मिठास केअरचे संस्थापक विवेक नगरारे यांनी भिक्षु संघ आहार शिक्षण सत्र अभियानाच्या दूरदृष्टीची माहिती देऊन सत्राची सुरुवात केली. या अभियाना चे पहले सत्र 22 एप्रिल रोजी मैत्री बुद्ध विहार, नारी रोड, नागपूर येथून झाली आणि ह्याचे उद्दिष्ट 1000 हून अधिक बौद्ध भिक्खूंना आरोग्य व पोषण जागृती चे सशक्ति प्रदान करणे आहे ज्यासाठी कदाचित शहरभरातील 100 बुद्ध विहारांमध्ये प्रवास करण्याची आवश्यकता असू शकते. डॉ.आंबेडकर सेमिनरीचे मुख्य धम्म प्रशिक्षक भदंत धम्मसारथी यांनी संपूर्ण समुह ला त्यांच्या मिशनचा सक्रिय भाग बनवण्याची आणि समाजात पोषण शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी नागपूरच्या विविध बुद्ध विहारांमध्ये जास्तीत जास्त भिक्षूंपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांची बांधिलकी द...

10 हजार से ज्यादा भक्तों ने लिया महाप्रसाद का लाभ -विदर्भ के 11 जिलों से आये भक्तों द्वारा रोग निदान,नेत्र जांच ,रक्तदान शिबिर में लिया लाभ

 10 हजार से ज्यादा भक्तों ने लिया महाप्रसाद का लाभ -विदर्भ के 11 जिलों से आये भक्तों द्वारा रोग निदान,नेत्र जांच ,रक्तदान शिबिर में लिया लाभ नागपुर. ((आनन्दमनोहर जोशी) श्राद्ध पक्ष के दौरान सोमवार की चतुर्थी को संकष्टी चतुर्थी से चतुर्दशी तक उत्सव मनाया जा रहा है.वहीँ महल स्थित सीनियर भोसला पैलेस महल में महाराजा ऑफ नागपुर ट्रस्ट के तत्वावधान मे 236 वें वार्षिकोत्सव पर मस्करया श्रीगणेश की विधिवत पूजा रोजाना शाम को राजपुरोहित राजेंद्र पुराणिक के हस्ते मंत्रोच्चारण किया जा रहा है.सरकारी मेडिकल कॉलेज डॉक्टर की टीम ने सफलतापूर्वक प्रयास किया. यहाँ इस दौरान विदर्भ के 11 जिलों से आये भक्तगणों ने स्वास्थ्य शिबिर का लाभ लिया. महाप्रसाद के दौरान अन्न का थालियाँ में उचित मात्रा में प्रसाद के रूप में लेकर जूठा नहीं छोड़ने के लिए सारंग,गणेश गरुड़ और कार्यकर्ताओं द्वारा उद्धोषणा करके निवेदन किये गए.इस विशेष अवसर पर श्रीमंत डॉ. राजे मुधोजी महाराज भोंसले, श्रीमंत रानी यशोधराराजे, श्रीमंत राजे रघुजी भोंसले, श्रीमंत राजे युवराज जयसिंहराव भोंसले,क़ानूनी सलाहकार अधिवक्ता प्रदीप देशमुख, हप्पेनिंग टुडे क...