केंद्रीयमंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते गायक अनुराधा पौडवाल व विशाल जोगदेव यांनी गायलेल्या श्री चक्रधर चालीसा" या गीताचे विमोचन
केंद्रीयमंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते गायक अनुराधा पौडवाल व विशाल जोगदेव यांनी गायलेल्या श्री चक्रधर चालीसा" या गीताचे विमोचन
- अनुराधा पौडवाल व विशाल जोगदेव यांनी गायलेल्या "श्री चक्रधर चालीसा" या गीताचे केंद्रीयमंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते विमोचन.
सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या अवतार दिना निमित्य स्वामींचे विचार व कार्य सर्वं तळागळातील लोकांना कळावे, या शुद्ध हेतुने विशाल जोगदेव प्रोडक्शन निर्मित "श्री चक्रधर चालीसा" या गीता चे विमोचन केंद्रीयमंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते काल नागपुर येथे करण्यात आले.
सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीं ची ही चालीसा पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल व महानुभव पंथाचे भजनसम्राट विशाल जोगदेव यांनी त्यांच्या सुमधुर आवाजात गायलेली आहे. शिवाय यात प्रज्वल भोयर व देवयानी जोशी यांनीं आपल्या अभिनयाचा रंग चढवलेला आहे.
या गीताचे दिग्दर्शन व संकलन सम्राट गोटेकर यांनी केलेले असुन विशाल जोगदेव यांनी है गीत लिहिलेले तथा संगीतबद्ध केलेले असुन चारुदत्त जिचकार यांच्या स्टूडिओला हे गीत रिकॉर्ड करण्यात आलेले आहे.
या गीता साठी प.पू.प.म.वैरागी बाबा पंजाबी यांचा विशेष आशीर्वाद लाभलेला असून आशीष कठाळे, तुषार जोगदेव, सईद अख्तर, आकाश दुधनकर, आकाश तायडे, शिवांश प्रजापति, उत्कर्ष श्रीखंडे व यश चौडे यांचे विशेष योगदान लाभलेले आहे.
हे गीत विशाल जोगदेव या यूट्यूब चैनल वरून प्रदर्शित झालेले असुन केंद्रीयमंत्री नितिन गडकरी यांनी या गीताचे विमोचन करून विशाल जोगदेव यांचे विशेष कौतुक सुद्धा केलेले आहे, संपूर्ण महाराष्टात व महानुभाव पंथात प्रज्वल भोयर व देवयानी जोशी यांच्या अभिनयाची विशेष चर्चा होत आहे.
विशाल जोगदेव यांनी या आधी सुद्धा महानुभाव पंथासाठी असंख्य गीते गायलेली असून यांची अनेक भजने जगभरात अजरामर झालेली आहेत, ज्यात "जरी की पगड़ी बांधे", "आई माझी मायेचा सागर", "कैवल्याचा दानी", "चक्रधरा तू माय मी लेकरु" अश्या अनेक गीतांचा समावेश होतो, त्यांचा या विशेष कार्यासाठी विशाल जोगदेव यांना आजपर्यंत अनेक पुरस्काराने सम्मानित सुद्धा केल्या गेलेले आहे.