*सोयाबीन पिकाचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून पीकविमा व 50 हजार रुपयाची मदत देण्यात यावी याकरिता राष्ट्रवादी पार्टी समुद्रपूर पार्टी समुद्रपूर यांच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.एकनाथजी शिंदे साहेब यांना तहसीलदार, साहेब समुद्रपूर यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले*
04 आक्टोम्बर 2023 ला उपविभागीय अधिकारी कार्यालय, हिंगणघाट समोर धरणे आंदोलन.
🖊️प्रविण जगताप 🖊️ वर्धा जिल्हा प्रतिनिधी मो . 9284981757
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संघटक सचिव तथा माजी आमदार प्रा.राजूभाऊ तिमांडे व हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुधीर कोठारी यांच्या नेतृत्वात हजारो शेतकऱ्यांनी दिले निवेदन
परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावल्याने सोयाबीनच्या पिकाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे सोयाबीनचे पीक पाण्याखाली गेले आहे. यापूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाची वाढ झाली नव्हती. त्यातच काही जणांचे कसेबसे आलेले सोयाबीनची काढणी सुरू ह्यायचा अगोदरच पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र सततच्या पावसानं त्यांच्या शेतातली सोयाबीन खराब झालीय. सोयाबीनची अशी परिस्थिती आहे की, त्यांना आता तिची काढणीही परवडणारी नाहीये.
सततचा पाऊस व वातावरणातील बदल यामुळे सोयाबीन पिकावर बुरशीजन्य रोगामुळे सोयाबीन पीक धोक्यात आले आहे. बहुतांश शेतात परिपक्व झालेले पीक पिवळे करपलेले आणि वाळत चाललेले दिसून येत आहे. एकाच आठवड्यात पीक सोयाबीन वळून पूर्णपणे जाणार आहे तरी सदर पिकाचे नुकसानीचे पंचनामे करून शासनाला लवकरात लवकर सादर करावे तसेच सोयाबीन पीक करिता शासनाने त्वरित सर्वे करून सरसकट 50 हजर रुपये हेक्टरी नुकसान भरपाई आणि पीक बिमा देण्यात यावे या करिता हजारो शेतकरी महिला पुरुष हजर होते.
कृषी उत्पन्न बाजार समिती येथे माजी आमदार प्रा.राजूभाऊ तिमांडे, सहकार महर्षी एड. सुधीरबाबू कोठारी, समुद्रपूर बाजार समिती सभापती हिम्मतभाऊ चतुर इत्यादीनी मार्गदर्शन केले. त्या नंतर सर्वच शेतकरी बाजार समिती, बस स्थानक, झेंडा चौक, ते तहसील कार्यालय हजारो शेतकरी धडकले. तिथे सर्वांच्या मागणी वरून नायब तहसीलदार राजेंद्र सयाम यांनी निवेदन स्वीकारून पुढे पाठवितो असा विश्वास दिला. या मोच्यात हिम्मत चतुर,हरीश वडतकर, नगराध्यक्ष योगिता तुळणकर,नरेंद्र थोरात,विठ्ठल गुडघाने,सुरेंद्र कुकेकर, महादेव बादले, शांतीलाल गांधी, सुधीर खडसे, विनोद वानखेडे, संजय तपासे,सौरभ तिमांडे,अरुण झाडे,गौरव तिमांडे,सौरभ साळवे ,उद्धव कुबडे, हरीश काळे हेमंत पाहुणे, जगन सुमटकर, अमोल त्रिपाठी संघेश ससाने, युवराज माउसकर, नयन निखाडे ईश्वर डांभारे, विनोद पिसे, कवडू मुडे, पांडुरंग किटे, राजू चंदनखेडे, प्रदीप डगवार, मधुकर कामडी, मायाताई जिवतोडे, सविता मेंढे, जाया कोराम,मोहन उमाटे, अमर झाडे, प्रभाकर येंडे, विलास बागेश्वर, मोहन महाकाळकर, सचिन तुळणकर हरिभाऊ बोबले, पंकज कोचर,तेजस तडस, रामभाऊ भोरे, संजय कात्रे, धनंजय बकाने, नितेश नारखेडे, राजेश थोरात, अशरक पठाण,अमोल सायंकार,उमाकांत डभारे,मनीष गांधी,, अतुल चौधरी, राजू कटारे, अमित लाजूरकर, राहुल लोहकरे,रामभाऊ चौधरी,अशोक वांदिले, गणेश वैरागडे, गजानन शेंडे,मोतीराम जिवतोडे, रामदास उमरेडकर, गणेशनारायण अग्रवाल, नरेश पावडे, रमेश परमोरे, त्रबक लांडे, जनार्धन हुलके, प्रमोद महाजन, राहुल कोळसे, दिगांबर चौधरी, गणेश दीपक पंढरे, मनोज ठक,बंडू भिषेकर, गुरुदयालसिंग जुनी,नौकरकार, प्रा. सुरेश पांगूड, अशोक वांदिले, शकील अहमद, दिवाकर डफ,गणेश वैरागडे, गजानन शेंडे, ब. दा. नासर, दिगांबर चांभारे, नाजीर अली, भागवत गुळघाने, पप्पू आष्टीकर, प्रशांत पाटील, संजय गांधी,निषाद बोरकुटे, नितीन नवरखेडे, हरी महाजन,सचिन गोवरकर, रामदास मलकापुरे,राम गाठे, संदीप झाडे, रणजित चावरे, प्रशांत कहाते,नितीन सुटे, सुरेंद्र टेम्भूरणे, महादेव वांदिले, बालाजी गहलोत, विनोद झाडे, गोपाल पुरोहित, सह हजारो शेतकरी उपस्थित होते.