सर्पदंशाच्या उपचारा संदर्भात तज्ञ डॉक्टरांची कार्यशाळा येत्या पंधरवाड्यात घेणार
🖊️प्रविण जगताप 🖊️ वर्धा जिल्हा प्रतिनिधी
वर्धा :- वर्धा जिल्ह्यातील विविध सरकारी रुग्णालयात सर्पदंशाच्या उपचारा संदर्भात योग्य व अचूक उपचार करण्या बाबत तज्ञा डॉक्टरांच्या कार्यशाळेचे येत्या पंधरवाड्यात आयोजित करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी जिल्हा शल्य चिकित्सक यांना दिले आहे.
यासंदर्भात दि 12 सप्टेंबरला जीवरक्षक फाऊंडेशन व रुग्णमित्र फाऊंडेशन यांनी संयुक्तपणे जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन सर्परुग्णावर योग्य उपचार होत नसल्याची खंत निवेदनातून व्यक्त केली.या निवेदनाची तातडीने दखल घेत जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी त्वरित कॉल करून जिल्हा शल्य चिकित्सकांना बोलाविले.व या गंभीर प्रश्नावर तज्ञ डॉक्तरांची कार्यशाळा घेण्याचे आदेश दिले.त्यानुसार येत्या पंधरवाड्यात ही कार्यशाळा आयोजित करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी या गंभीर विषयाला वाचा फोडणारे वन्य जीवरक्षक राकेश झाडे व रुग्णमित्र गजू कुबडे यांना यावेळी दिले.
याशिवाय शहरातील मोकाट जनावरांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी स्थायी स्वरूपाचे कांजी हाऊस तयार करण्याचे आदेश मुख्याधिकारी नप हिंगणघाट यांना दिले.
जिल्हाधिकारी कर्डीले यांनी तातडीने या निवेदनाची दखल घेतल्या बाबत गजू कुबडे व राकेश झाडे यांनी त्यांचे आभार व्यक्त केले.
यापूर्वी वन्यजीवरक्षक सर्पमित्र राकेश झाडे यांना दि १० आगस्टला बेघर निवारा केंद्र येथील पशुपक्ष्यांच्या निवारा केंद्रात गवत कापत असतांना एका धामण जातीच्या सर्पाने दंश केला.हा साप बिनविषारी असल्याचे राकेशच्या अनुभवी नजरेने लगेच ओळखले. त्यांनी रुग्णमित्र गजू कुबडे यांना कॉल करून या घटनेची माहिती दिली.गजू कुबडे यांनी त्वरित राकेशला घेऊन उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
सदर साप हा बिनविषारी असल्याने हे दोघेही निर्धास्त होते.परंतु या उपजिल्हा रुग्णालयात सामान्य व्यक्तीला या सर्पदंशावर कशी ट्रीटमेंट दिली जाते हे पाहण्यासाठी या दोघांनी एक ऑपरेशन राबविले होते व सामान्य जनतेच्या जीवाचा कसा खेळ खंडोबा होतो हे यातून उघड झाले होते.
या उपजिल्हा रुग्णालयात ड्युटीवर असलेल्या डॉकटरला सर्पदंश कोणत्या जागेवर झाला हे सांगितले.त्यांनी पेशंटला बेड वर घेऊन दोन्ही हातातून रक्त काढून त्याच्या चाचण्या करवून घेतल्या. व सलाईन लावून औधोपचार केले.थोडया वेळात चाचणीचे अहवाल आले.ह्या चाचणीत सर्पाचे विष आढळून आले नाही.तरीही ड्युटी वरील डॉकटरने या रुग्णालयात काहीच सुविधा विशेषतः व्हेंटिलेटरवर नाही,तज्ञ डॉकटर नाही हे कारण देत पेशटला नेहमी प्रमाणे रेफर करण्याचा सल्ला दिला.व तसे कार्ड तयार करून दिले.थोड्या वेळाने डॉक्टरांनी "अँटी स्नेक व्हेनम" हे विषारी सापावर लागणारे औषध बिनविषारी साप चावलेल्या राकेशच्या सलाईन मध्ये टाकले.ते या दोघाही अनुभवी रुग्णमित्राच्या लक्षात आले.व त्यांनी आम्ही सेवाग्रामला जातो असे सांगून सलाईन न लावताच सुट्टी घेतली.सदर औषध जर राकेशच्या शरीरात गेले असते तर त्या औषधीचा कुठल्याही प्रकारचा दुष्परिणाम आढळून आला असता हे अनुभवी सर्पमित्र असलेल्या राकेशच्या लक्षात येताच त्यांनी सिस्टरच्या हाताने सलाईन काढून सदर औषध घेण्याचे टाळले.
ह्या प्रकरणावरून एक गोष्ट लक्ष्यात आली व ती म्हणजे ग्रामीण भागातील शासकीय दवाखान्यातील डॉक्टर या पेशटच्या जीवाशी कशा प्रकारे खेळ करतात व हाच मुद्दा आज राकेश झाडे व गजू कुबडे यांनी निवेदनातून जिल्हाधिकारी यांच्या लक्ष्यात आणून दिला.
म्हणून शासनाने या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देऊन ग्रामीण भागातील रुग्णालयात सर्पदंशाच्या उपचारासाठी स्वतंत्र तज्ञ डॉक्टर ची नेमणूक करावयास पाहिजे.अन्यथा सर्प दंशाचे असंख्य रुग्ण चुकीच्या उपचारा मुळे हकनाक प्राणास मुकतील यासाठी शासनाच्या आरोग्य विभागाने त्वरित दखल घेण्याचे आवाहन रुग्णमित्र गजू कुबडे व वन्यजीवरक्षक राकेश झाडे यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनातून केले आहे.