सीधे मुख्य सामग्री पर जाएं

दिव्यांगांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध योजनांची अंमलबजावणी - रामदास आठवले

 दिव्यांगांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध योजनांची अंमलबजावणी - रामदास आठवले

Ø दिव्यांगांना साहित्य वाटपाचा जिल्हास्तरीय शुभारंभ

Ø वर्धा तालुक्यातील 826 दिव्यांगांना साहित्याचे वाटप

Ø प्रत्येक तालुक्यात होणार साहित्य वाटपाचा कार्यक्रम

वर्धा, दि. 23 (जिमाका) : दिव्यांग व्यक्ती शरीराने अपंग असला तरी बुद्धीने मात्र तो हुशार असतो. या व्यक्तींना त्यांच्या दिव्यांगत्वावर मात करत मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाच्यावतीने विविध योजना राबविण्यात येत आहे. या योजनांची चांगली अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारीता राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले. 

चरखा सभागृह येथे जिल्हा प्रशासन व समाज कल्याण विभागाच्यावतीने अलिम्को कंपनी मार्फत दिव्यांगांना साहित्य वितरणाच्या जिल्हास्तरीय शुभारंभाप्रसंगी श्री.आठवले बोलत होते. कार्यक्रमाला खा.रामदास तडस, आ.डॉ.पंकज भोयर, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, सेवाग्रामच्या सरपंच सुनिता ताकसांडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज गोहाड, जिल्हा नियोजन समिती सदस्य सुनील गफाट, जिल्हा परिषदेचे माजी सभापती विजय आगलावे, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त प्रसाद कुळकर्णी, जिल्हा समाज कल्याण अधिकारी प्राजक्ता इंगळे, मुख्याधिकारी राजेश भगत आदी मंचावर उपस्थित होते.

दिव्यांगांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकारी नोकरीमध्ये आरक्षणासोबतच शिष्यवृत्ती योजना, रेल्वेसह बसमध्ये प्रवास सवलत आदी योजना राबविण्यात येत आहे. केंद्र शासनाच्यावतीने दिव्यांगांसाठी सुगम्य भारत अभियान राबविण्यात येत असून या अभियानांतर्गत विमानतळ, रेल्वे स्टेशन, बस स्थानक येथे त्यांच्यासाठी सोई सुविधा निर्माण करण्यात आल्या आहे. सरकारी शाळांमध्ये शौचालय, रॅम्पची सुविधा निर्माण करण्यात आली आहे. दिव्यांगांना राहण्यासाठी अपंग पुनर्वास केंद्र निर्माण करण्यात आले असल्याचे पुढे बोलतांना रामदास आठवले यांनी सांगितले. 

राज्यातील ऑनलाईन नोंदणी करण्यात आलेल्या 17 लाख दिव्यांगांना दिव्यांग ओळखपत्राचे वाटप करण्यात आले असून शासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांचा लाभ या दिव्यांगाना देण्यात येत आहे. या योजनांचा लाभ दिव्यांगांनी घ्यावा, असे आवाहनही यावेळी रामदास आठवले यांनी केले.

जिल्ह्यात सर्वाधिक दिव्यांगांची नोंदणी - खा.रामदास तडस

दिव्यांगांना अलिम्को कंपनीमार्फत कृत्रिम अंग साहित्याचे वाटप करण्यात येत आहे. त्यासाठी कंपनीच्यावतीने मोजमाप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये विदर्भात सर्वाधिक नोंदणी वर्धा जिल्ह्यातून झाली. जिल्ह्यातील 4 हजार दिव्यांगांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी वर्धा तालुक्यातील आज 826 पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना साहित्याचे वितरण करण्यात येत आहे. तालुकास्तरावर असेच कार्यक्रम घेऊन वाटप करण्यात येणार असल्याचे खा.तडस यांनी सांगितले. 

समाजातील प्रत्येक घटकातील लाभार्थ्यांना लाभ देण्याचे कार्य राज्य शासन करीत आहे. दिव्यांगांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन विविध योजना राबवित असून या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन यावेळी आ.डॉ. पंकज भोयर यांनी केले.

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिव्यांगांना मोफत अंग साहित्य वितरण करण्यासाठी जिल्ह्यात तालुकास्तरावर मोजमाप शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात मोठ्या प्रमाणावर दिव्यांगांनी साहित्यासाठी नोंदणी करुन सहभाग नोंदविला असल्याचे सांगितले. जिल्हा परिषदेच्यावतीने दिव्यांगांसाठी सेस फंडातून विविध योजना राबविण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.

यावेळी मान्यवरांच्याहस्ते दिव्यांग लाभार्थ्यांना तिनचाकी सायकल, व्हील चेअर, दिव्यांग स्टीक,कर्णयंत्र, वॉकर आदी विविध प्रकारच्या साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे संचलन संध्या सावरकर यांनी केले तर आभार प्राजक्ता इंगळे यांनी मानले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव, नागरिक उपस्थित होते. दिव्यांगांना साहित्य वाटपाचे असेच कार्यक्रम सर्वच तालुक्यात घेतले जाणार आहे.

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वर्धा जिल्हा पदाधिकारी बैठक

 🖊️प्रविण जगताप 🖊️वर्धा जिल्हा प्रतिनिधी मो . 9284981757 वर्धा *आज दिनांक ०२ /१० /२०२३ रोजी वर्धा येथे महात्मा लॉन येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे जिल्हाध्यक्ष मा श्री सुनीलभाऊ राऊत साहेब यांच्या निर्देशाखाली ही' सभा घेण्यात आली वर्धा जिल्हा पदाधिकारी बैठक घेण्यासाठी संसदरत्न, कार्यकारी अध्यक्ष, खासदार सौ सुप्रियाताई सुळे , माजी गृहमंत्री मा श्री अनिलभाऊ देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश महिला प्रदेशाध्यक्ष सौ रोहिनिताई खडसे , राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मा श्री महेबूबभाई शेख या सर्व दिग्गज नेत्यां च्या नेतृत्वात खाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वर्धा जिल्हा पदाधिकारी बैठक घेण्यात आली वर्धा जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते बैठकीनंतर काही युवक व तरुण मुलांचे पक्ष प्रवेश घेण्यात आले हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती मा श्री सुधीर बाबूजी कोठारी, माजी आमदार मा श्री राजूभाऊ तिमांडे , प्रदेश सरचिटणीस मा श्री अतुल भाऊ वांदिले , वर्धा जिल्हा अध्यक्ष मा श्री सुनीलभाऊ राऊत, मा श्री समीर भाऊ देशमुख, वर्धा जिल्हा राष्ट्रवादी यु...

PETROCHEMICAL COMPLEX VIABLE IN NAGPUR SAYS EIL REPORT

  PETROCHEMICAL COMPLEX VIABLE IN NAGPUR SAYS EIL REPORT The much-awaited techno-economic feasibility study Report prepared by Engineers India Ltd. (EIL), was handed over to Dr. Vipin Sharma, IAS, CEO - MIDC in Mumbai recently. The handing over was done by Vinayak Marathe, refinery and petrochimal expert in the presence of Varun Phuljhale (EIL), Anil Kumar (EIL), Dr. Vijay Rathod, IAS,Jt. CEO (V), and Upendra Tamore Dep. CEO – MIDC. A presentation was also made by EIL on the subject. Although this is an Interim Report, according to the Report, the petrochemical complex is viable in Nagpur with 8 options of various feedstock comprising naptha and ethane gases. The next step would be handing over the Report to Devendra Fadnavis, DCM and Minister Industries, Uday Samant, (GoM) who would seek investors for the project from among Public Sector Undertakings. Meanwhile, it is understood that Gas Authority of India Ltd. (GAIL) is keen on investing in Maharashtra in a petrochemical complex....

बुद्ध विहार येथे बौद्ध भिक्खूंसाठी पोषण जागृती मालिकेचे चौथे सत्र संपन्न

  *बुद्ध विहार येथे बौद्ध भिक्खूंसाठी पोषण जागृती मालिकेचे चौथे सत्र संपन्न*  *निकिता पाटील, प्रख्यात आहारतज्ञ * बौद्ध भिक्खूंसाठी आहार शिक्षण सत्रांची मालिका सुरू ठेवत, मिठास केअरच्या सहकार्याने न्यूट्रा पॉवरने 8 ऑक्टोबर रोजी बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर बौद्ध सेमिनरी, उंटखाना बुद्ध विहार, नागपूर येथे आपले चौथे सत्र आयोजित केले होते. मिठास केअरचे संस्थापक विवेक नगरारे यांनी भिक्षु संघ आहार शिक्षण सत्र अभियानाच्या दूरदृष्टीची माहिती देऊन सत्राची सुरुवात केली. या अभियाना चे पहले सत्र 22 एप्रिल रोजी मैत्री बुद्ध विहार, नारी रोड, नागपूर येथून झाली आणि ह्याचे उद्दिष्ट 1000 हून अधिक बौद्ध भिक्खूंना आरोग्य व पोषण जागृती चे सशक्ति प्रदान करणे आहे ज्यासाठी कदाचित शहरभरातील 100 बुद्ध विहारांमध्ये प्रवास करण्याची आवश्यकता असू शकते. डॉ.आंबेडकर सेमिनरीचे मुख्य धम्म प्रशिक्षक भदंत धम्मसारथी यांनी संपूर्ण समुह ला त्यांच्या मिशनचा सक्रिय भाग बनवण्याची आणि समाजात पोषण शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी नागपूरच्या विविध बुद्ध विहारांमध्ये जास्तीत जास्त भिक्षूंपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांची बांधिलकी द...