सीधे मुख्य सामग्री पर जाएं

राष्ट्रीय लोक अदालतीत 2172 प्रकरणांचा आपसी तडजोडीने निपटारा

 राष्ट्रीय लोक अदालतीत 2172 प्रकरणांचा आपसी तडजोडीने निपटारा 

7 कोटी 73 लक्ष 51 हजार रुपये तडजोड मूल्य


 🖊️प्रविण जगताप 🖊️वर्धा जिल्हा प्रतिनिधी

वर्धा, दि 13 :वर्धा जिल्ह्यात आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये 2 हजार 172 प्रकरणे आपसी तडजोडीने सोडविण्यात आली असून त्याचे तडजोड मूल्य 7 कोटी 73 लक्ष 51 हजार 268 इतके आहे. न्यायालयामध्ये प्रलंबित असलेली प्रकरणे तसेच वाद दाखलपूर्व प्रकरणांचा आपसी तडजोडीने जास्तीत जास्त प्रमाणामध्ये निपटारा करणे हा राष्ट्रीय लोक अदालतीचा मुख्य उद्देश आहे. 

राष्ट्रीय लोक अदालतमध्ये दोन्ही पक्षकारांना आपली बाजू मांडण्याची संधी मिळते तसेच दोन्ही पक्षकारांच्या आपसी सहमतीने प्रकरणांमध्ये तडजोड होत असल्याने निकालाचे समाधान दोन्ही पक्षकारांना असते. यामुळे पक्षकारांचा वेळ व पैशाची बचत होऊन मनासारखा समझोता झाल्याने मानसिक समाधान लोकअदालतमुळे पक्षकारांना मिळते, असे विचार प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा शजिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष ए.एन.करमरकर यांनी राष्ट्रीय लोक अदालत प्रसंगी व्यक्त केले. 

राष्ट्रीय लोक अदालतमध्ये मोठ्या प्रमाणात प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली काढण्याचे आवाहन त्यांनी या प्रसंगी उपस्थित पक्षकार तसेच अधिवक्ता यांना केले. राष्ट्रीय लोक अदालतमध्ये न्यायाधीश, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव विवेक देशमुख, अधिवक्ता मंडळी तसेच पक्षकार मोठया संख्येने उपस्थित होते. 

राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये निकाली निघणा-या प्रकरणांमुळे पक्षकारांना समाधान लाभते. कारण दोन्ही पक्षकारांच्या आपसी सहमतीने प्रकरणामध्ये समझोता होत असतो. त्यामुळे वादापेक्षा समझोता बरा या विचारानुसार पक्षकारांनी आपसातील वाद समोपचाराने लोक अदालतीमध्ये मिटवावे असे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव विवेक देशमुख यांनी राष्ट्रीय लोक अदालतीच्या आयोजनामागील भूमिका विषद करतांना सांगितले.

जिल्ह्यातील न्यायालयामध्ये संपन्न झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतमध्ये न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांपैकी 1 हजार 238 प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली काढण्यात आली. तडजोड झालेल्या प्रकरणामधील तडजोडीची रक्कम 3 कोटी 81 लाख 35 हजार 434 रुपये इतके होते. तसेच वाद दाखल पुर्व प्रकरणापैकी 934 इतकी प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली काढण्यात आली. या प्रककरणामधील तडजोडीचे मुल्य 3 कोटी 92 लाख 15 हजार 834 इतके होते. न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे व वाद दाखल प्रकरणे मिळून एकुण 2 हजार 172 इतकी प्रकरणे राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये निकाली निघाली असून प्रकरणातील एकुण तडजोडीचे मुल्य 7 कोटी 73 लाख 51 हजार 268 इतके आहे.

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वर्धा जिल्हा पदाधिकारी बैठक

 🖊️प्रविण जगताप 🖊️वर्धा जिल्हा प्रतिनिधी मो . 9284981757 वर्धा *आज दिनांक ०२ /१० /२०२३ रोजी वर्धा येथे महात्मा लॉन येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे जिल्हाध्यक्ष मा श्री सुनीलभाऊ राऊत साहेब यांच्या निर्देशाखाली ही' सभा घेण्यात आली वर्धा जिल्हा पदाधिकारी बैठक घेण्यासाठी संसदरत्न, कार्यकारी अध्यक्ष, खासदार सौ सुप्रियाताई सुळे , माजी गृहमंत्री मा श्री अनिलभाऊ देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश महिला प्रदेशाध्यक्ष सौ रोहिनिताई खडसे , राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मा श्री महेबूबभाई शेख या सर्व दिग्गज नेत्यां च्या नेतृत्वात खाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वर्धा जिल्हा पदाधिकारी बैठक घेण्यात आली वर्धा जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते बैठकीनंतर काही युवक व तरुण मुलांचे पक्ष प्रवेश घेण्यात आले हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती मा श्री सुधीर बाबूजी कोठारी, माजी आमदार मा श्री राजूभाऊ तिमांडे , प्रदेश सरचिटणीस मा श्री अतुल भाऊ वांदिले , वर्धा जिल्हा अध्यक्ष मा श्री सुनीलभाऊ राऊत, मा श्री समीर भाऊ देशमुख, वर्धा जिल्हा राष्ट्रवादी यु...

दारुच्या नशेत एसटी चालविणाऱ्या चालकास पोलिसांनी घेतले ताब्यात.वेळ सावधतेने प्रवाशांचे वाचले जीव.

 दारुच्या नशेत एसटी चालविणाऱ्या चालकास पोलिसांनी घेतले ताब्यात.वेळ सावधतेने प्रवाशांचे वाचले जीव. यवतमाळ – मदयधुंद अवस्थेत एस.टी. बस चालविने पडले महाग. २२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या चालकाची जेलम ध्ये रवानगी करण्यात आली.सविस्तर वृत्त असे की दि.२२/०८/२०२३ रोजी सकाळी यवतमाळ ते छत्रपती संभाजी नगर ला जाणारी यवतमाळ आगाराची एस.टी.बस MH ४०CM ५१२१ हि दारव्हा बस स्थानकावरून २२ प्रवाशांसह रवाना झाली या बस मध्ये बालक म्हणुन नारायन मारोती एकुंडवार तर वाहक म्हणुन प्रशांत पांडुरंग भगत असे नेमणुकीस होते. बस दारव्हा येथुन निघुन कारंजा रोडवर ५ किमी अंतरावरील चिखली फाटा येथे पोहचली असता बस वेडी वाकडी धाऊ लागली प्रवाशांनी आरडा ओरड करताच चालकाने बस थांबविली व स्टेअरींग वर त्याने मान टाकली प्रवाशांनी चालकास विचारपुस केली असता तो पुर्णपणे दारूच्या नसेत असल्याचे व त्यास बोलता बघता देखील येत नसल्याचे दिसुन आले. या बाबत वाहक भगत यांनी दारव्हा आगाराला माहीती देताच आगाराच्या अधिका-यानी घटनास्थळी जावुन चालकास ताब्यात घेवुन पोलीस स्टेशन ला हजर केले. पोलीस स्टेशन ला देखील चालक नारायन ऐकुंडवार यास निट उभे राहता ये...

PETROCHEMICAL COMPLEX VIABLE IN NAGPUR SAYS EIL REPORT

  PETROCHEMICAL COMPLEX VIABLE IN NAGPUR SAYS EIL REPORT The much-awaited techno-economic feasibility study Report prepared by Engineers India Ltd. (EIL), was handed over to Dr. Vipin Sharma, IAS, CEO - MIDC in Mumbai recently. The handing over was done by Vinayak Marathe, refinery and petrochimal expert in the presence of Varun Phuljhale (EIL), Anil Kumar (EIL), Dr. Vijay Rathod, IAS,Jt. CEO (V), and Upendra Tamore Dep. CEO – MIDC. A presentation was also made by EIL on the subject. Although this is an Interim Report, according to the Report, the petrochemical complex is viable in Nagpur with 8 options of various feedstock comprising naptha and ethane gases. The next step would be handing over the Report to Devendra Fadnavis, DCM and Minister Industries, Uday Samant, (GoM) who would seek investors for the project from among Public Sector Undertakings. Meanwhile, it is understood that Gas Authority of India Ltd. (GAIL) is keen on investing in Maharashtra in a petrochemical complex....