आर्वी पंचायत समितीत वाजत गाजत निघाली अमृत कलश यात्रा 73 ग्रामपंचायतींचा सहभाग आ.दादाराव केचेंचा सहभाग
आर्वी पंचायत समितीत वाजत गाजत निघाली अमृत कलश यात्रा 73 ग्रामपंचायतींचा सहभाग आ.दादाराव केचेंचा सहभाग
🖊️प्रविण जगताप 🖊️ वर्धा जिल्हा प्रतिनिधी मो . 9284981757
वर्धा, दि. 29 : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राबविण्यात येत असलेल्या मेरी माटी मेरा देश अभियानांतर्गत पंचायत समिती, आर्वी अंतर्गत सर्व 73 ग्रामपंचायतींचा अमृत कलश यात्रेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी पंचायत समितीच्या प्रांगणात वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली.
सकाळी 9 वाजता ग्रामपंचायत मिर्झापूर (नेरी) येथून कलश यात्रा काढण्यात आली. या कलश यात्रेत 73 ग्राम पंचायतीचे सरपंच व ग्रामसेवक सहभागी झाले होते. यात्रा स्मार्ट ग्राम मिर्झापूर ते पंचायत समिती आर्वी येथे आल्यानंतर आमदार दादाराव केचे व गटविकास अधिकारी डॉ. गणेश माने यांनी कलश यात्रेचे स्वागत केले.
ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी माती कलश आमदार दादाराव केचे व गटविकास अधिकारी डॉ. गणेश माने यांच्याकडे सुपूर्द केले. आमदार श्री. केचे यांनी आपल्या सोबत आणलेले तांदुळ पंचायत समिती आर्वीच्या कलशामध्ये जमा करून सहभाग नोंदवला व त्यानंतर आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर गट विकास अधिकारी डॉ. गणेश माने यांनी मनोगत व्यक्त करून आभार प्रदर्शन केले.