36 (मराठा) तोफखाना रेजिमेंट च्या माजी सैनिकानी साजरा केला स्थापना दिन.
प्रतिनिधी, अनिल के. बालपांडे, नागपूर.
छत्रपती शिवाजी महाराज स्मृती सभागृह, सक्करदरा चौक, नागपूर येथे दिनांक ३ डिसेंबर 2023 ला 36 मराठा ,(मध्यम) तोफखाना रेजिमेंटचा 84 वा स्थापना दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
36 मराठा (मध्यम) तोफखाना हा भारतीय थलसेना मधील आर्टिलरी रेजिमेंट चा भाग असून हे रेजिमेंट '' या टोपण नावाने सुद्धा ओळखले जाते. यांचे बोधवाक्य "सर्वत्र सन्मान आणि गौरव" हे असून ब्रिटिश राजवटीत 10 ऑक्टोबर 1940 रोजी याची स्थापना फैजाबाद येथे झाली होती. या रेजिमेंटचे पहिले कमांडिंग ऑफिसर म्हणून लेफ्टनंट कर्नल, ए. एल. कॉलिंगवूड हे होते. कालांतराने याचा विस्तार होत गेला.
भारतीय सेनेद्वारे लढलेले 1947 मधील जापान विरुद्ध दुसरे महायुद्ध, 1962, 1965 आणि 1971 चे इंडो पाकिस्तान युध्यासह ऑपरेशन रक्षक, ऑपरेशन विजय, ऑपरेशन पराक्रम, सियाचीन संघर्ष आणि ऑपरेशन राईनो (आसाम) यामध्ये या रेजिमेंटचा सहभाग होता.
या कार्यक्रमाचे उद्घाटन ऑनररी कॅप्टन, पी. टी. बाहाळे द्वारा झाले. प्रमुख वक्ता म्हणून वैभव कुमार निमकर, राष्ट्रीय सत्यशोधक हे होते. यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष रामजी कोरके, उपाध्यक्ष, भारतीय जनता पार्टी माजी सैनिक आघाडी कृष्णाजी खंड, श्रीमती शीला टाले सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आयोजकाकडून माजी सैनिकांचा सत्कार सुद्धा करण्यात आला. विदर्भातून मोठ्या संख्येने माजी सैनिक व त्यांचे कुटुंबीय उपस्थित झाले होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनास रेजिमेंटचे माजी सैनिक विनोद कुटेमाटे, हरिदास वैद्य, मनोज ठेंगणे, जगत ब्राह्मणकार, मंगल पटले, प्रशांत साळुंखे, विलास सत्यकार या सर्वांच्या अथक परिश्रमातून या सोहळ्याचे नियोजन केल्या गेले. सस्नेह भोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.