विद्यार्थ्यांना पूरवठा करणाऱ्या तांदळाचा काळाबाजार करणाऱ्या व्यक्तीवर सेवाग्राम पोलिसांनी कारवाई
✒️प्रविण जगताप ✒️वर्धा जिल्हा प्रतिनिधी मो . 9284981757
मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार, सेवाग्राम पोलिसांनी गुरुवारी एम एच २९ एटी ११०२ क्रमांकाचा वाहनचालक विनोद भांगे यास वाहनासह ताब्यात घेतले. यावेळी त्याच्या वाहनात अवैधरीत्या २५ क्विंटल तांदूळ आढळून आला. त्याला पोलिसांनी विचार पुस् आपला इंगा दाखवताच त्याने सदर तांदूळ एमआयडीसी परिसरातील किशोर तापडीया यांच्या एक गोडाऊनमधून खरेदी केल्याचे सांगितले. तसेच सदर तांदूळ सांवगी(मेघे) येथील धान्य शेख रहीम शेख करीम याला विकणार असल्याची माहिती पोलिसांना दिली.तसेच किशोर तापडीया हा जिल्हा परिषदेच्या इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पूरवठा करणाऱ्या तांदळाचा काळाबाजार करीत असल्याची माहिती आधीच शिक्षण विभागाला होती. त्यानुसार पोलिसांनी कारवाई केलेल्या घटनास्थळी शिक्षणाधिकारी जगताप दोन पंचाना घेऊन तापडीया ह्याच्या सेवाग्राम येथील गोडाऊनवर पोहचले. याठिकाणी आधीच पोलीस निरीक्षक चंद्रशेखर चकाटे व पोलीस उपनिरीक्षक राहुल इटेकर आपल्या ताफ्यासह हजर होते. येथील गोडाऊनच्या आत जप्त केलेल्या तांदळासह एफसीआयचे सील लागलेल्या व पोत्यांवर "राज्य सरकारी विपणन संघ मर्यादित" अशा आशयाचे ५० किलो वजनाचे तांदूळ भरलेले पोते मोठ्या प्रमाणात आढळून आले.यासोबतच एफसीआयच्या प्रिंट असलेली रिकामी पोती, मटकी, खाद्य तेल, मिरची पावडर, हळद तसेच मालाची उचल केल्या संबंधित सगळे दस्तऐवज आढळून आले.
या दरम्यान पोलिसांनी किशोर तापडीया याची झाडाझडती
घेतली असता त्याने जिल्ह्यातील जिल्हा परिषद व खाजगी अनुदानित शालेय पोषण आहारातील धान्याचा पूरवठा करण्याचे कंत्राट मुर्तिजापूर येथील अंकीत सतिश अग्रवाल यांच्याकडे असून मी पेटी कंत्राट घेतल्याचे सांगितले. यासंबंधी परवान्यांच्या कागदपत्रांची पडताळणी केली असता सब गोलमाल आढळून आला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करीत वाहनासह ८ लाख ६९ हजार ८१० रुपयांचा धान्यसाठा जप्त केला.
व बनावट दस्तऐवजांच्या आधारावर शाळकरी विद्यार्थ्यांच्या तोंडचा घास हिसकावणाऱ्या सदर टोळीचा पर्दाफाश सेवाग्राम पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकचंद्रशेखर चकाटे व शिक्षणाधिकारी जगताप यांनी मिळून केला असून याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक चंद्रशेखर चकाटे करीत आहे.
शालेय विद्यार्थ्यांना मिळणारा पोषण आहारा धान्याचा काळाबाजार करणाऱ्या जिल्ह्यातील धान्यचोरांच्या पोलिसांनी केला भांडाफोड याप्रकरणी सेवाग्राम पोलिसांत धान्यचोरांवर जिवनावश्यक वस्तू अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किशोर नारायण तापडीया(वय४६) रा. एसटी डेपोजवळ, रामनगर, विनोद बबन भांगे(वय४०) रा. बोरगांव (मेघे), शेख रहीम शेख करीम(वय४६) रा. स्वस्तिक नगर, सावंगी (मेघे), अंकीत सतिश अग्रवाल रा. मुर्तिजापूर, अकोला यांच्यासह इतरांवर कारवाई करण्यात आल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्या तक्रारीहून सदरची कारवाई करण्यात आली.