सीधे मुख्य सामग्री पर जाएं

वर्धा येथे सौरऊर्जेवरील फ्लड लाईट टॉवरचे ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते उद्घाटन

 वर्धा येथे सौरऊर्जेवरील फ्लड लाईट टॉवरचे ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते उद्घाटन

वर्धा जिल्ह्याच्या क्रीडा विकासासाठी २७ कोटी

आता रात्रीदेखील खेळाडू करू शकतील सराव


✒️प्रविण जगताप ✒️वर्धा जिल्हा प्रतिनिधी मो . 9284981757

वर्धा, दि. १२ : खेळाडूंना रात्री देखील सराव करता यावा, यासाठी जिल्हा क्रीडा संकूल वर्धा येथे १ कोटी २४ लक्ष रुपये खर्च करून सौरऊर्जेवर चालणारे फ्लड लाईट टॅावर बसविण्यात आले आहे. या टॅावरचे उद्घाटन वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले.

उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी क्रीडा मंत्री संजय बनसोडे होते. तर खासदार रामदास तडस, आमदार डॉ. पंकज भोयर, मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, पोलिस अधीक्षक नूरूल हसन, क्रीडा उपसंचालक शेखर पाटील, जिल्हा नियोजन समिती सदस्य सुनील गफाट, उपविभागीय अधिकारी दीपक कारंडे, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांची प्रमुख उपस्थिती होती. 

खेळाडूंना सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचे शासनाचे धोरण असल्याचे श्री.मुनगंटीवार म्हणाले. ‘वर्धा जिल्ह्यासाठी आपण ‘मिशन ऑलिम्पिक २०३६’ डोळ्यापुढे ठेवले आहे. जिल्ह्याला ऑलिम्पिक पदक प्राप्त करून देण्याचा आपला संकल्प आहे. या संकल्पाला फ्लड लाईटच्या रुपाने प्रकाशाचा आशीर्वाद लाभला आहे. आता रात्री देखील खेळाडूंना चांगला सराव करता येईल,’ असे ते म्हणाले. 

जिल्ह्याच्या क्रीडा विकासासाठी निधी मंजूर झाल्याची माहिती क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी दिली. ‘वर्धा जिल्ह्याच्या क्रीडा विकासासाठी निधी मिळावा अशी मागणी आमदार डॅा.पंकज भोयर यांनी केली होती. वर्धा येथे येताना निधी मंजुरीचा आदेश घेऊन येतो, असे मी म्हणालो होतो. त्याप्रमाणे जिल्ह्यासाठी 27 कोटी रुपयांच्या विविध क्रीडा विषयक कामांना प्रशासकीय मंजुरीचा आदेश घेऊन आलो आहे. जिल्ह्याला आणखी निधी पाहिजे असल्यास उपलब्ध करून देऊ,’ अशी ग्वाही क्रीडामंत्री संजय बनसोडे यांनी दिली. त्याचवेळी मंजुरीचा आदेशही त्यांनी आमदार डॉ.भोयर यांना सुपूर्द केला.

आमदार डॉ.भोयर कृतज्ञता व्यक्त करताना म्हणाले, ‘फ्लड लाईटमुळे जिल्ह्यातील खेळाडूंना सरावासाठी चांगली सुविधा निर्माण झाली आहे. जिल्ह्याच्या क्रीडा सुविधांसाठी क्रीडामंत्र्यांकडे २५ कोटी रुपयांची मागणी केली होती. त्यापेक्षा जास्त २७ कोटी रुपये त्यांनी मंजूर केले. प्रशासकीय मान्यता देखील उपलब्ध करून दिली. त्यामुळे पालकमंत्री आणि क्रीडा मंत्र्यांचे आभार मानले.’ 

तत्पूर्वी, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार तसेच क्रीडा मंत्री श्री.बनसोडे यांनी फित कापून टॉवरचे उद्घाटन केले. त्यानंतर पालकमंत्री यांच्या हस्ते टॅावरची कळ दाबून फ्लडलाईट प्रकाशित करण्यात आले. क्रीडा संकुलाच्या चारही बाजूंना चार टॉवर उभारण्यात आल्याने रात्री देखील खेळाडूंना सराव करता येणार आहे.

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

बुद्ध विहार येथे बौद्ध भिक्खूंसाठी पोषण जागृती मालिकेचे चौथे सत्र संपन्न

  *बुद्ध विहार येथे बौद्ध भिक्खूंसाठी पोषण जागृती मालिकेचे चौथे सत्र संपन्न*  *निकिता पाटील, प्रख्यात आहारतज्ञ * बौद्ध भिक्खूंसाठी आहार शिक्षण सत्रांची मालिका सुरू ठेवत, मिठास केअरच्या सहकार्याने न्यूट्रा पॉवरने 8 ऑक्टोबर रोजी बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर बौद्ध सेमिनरी, उंटखाना बुद्ध विहार, नागपूर येथे आपले चौथे सत्र आयोजित केले होते. मिठास केअरचे संस्थापक विवेक नगरारे यांनी भिक्षु संघ आहार शिक्षण सत्र अभियानाच्या दूरदृष्टीची माहिती देऊन सत्राची सुरुवात केली. या अभियाना चे पहले सत्र 22 एप्रिल रोजी मैत्री बुद्ध विहार, नारी रोड, नागपूर येथून झाली आणि ह्याचे उद्दिष्ट 1000 हून अधिक बौद्ध भिक्खूंना आरोग्य व पोषण जागृती चे सशक्ति प्रदान करणे आहे ज्यासाठी कदाचित शहरभरातील 100 बुद्ध विहारांमध्ये प्रवास करण्याची आवश्यकता असू शकते. डॉ.आंबेडकर सेमिनरीचे मुख्य धम्म प्रशिक्षक भदंत धम्मसारथी यांनी संपूर्ण समुह ला त्यांच्या मिशनचा सक्रिय भाग बनवण्याची आणि समाजात पोषण शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी नागपूरच्या विविध बुद्ध विहारांमध्ये जास्तीत जास्त भिक्षूंपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांची बांधिलकी द...

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वर्धा जिल्हा पदाधिकारी बैठक

 🖊️प्रविण जगताप 🖊️वर्धा जिल्हा प्रतिनिधी मो . 9284981757 वर्धा *आज दिनांक ०२ /१० /२०२३ रोजी वर्धा येथे महात्मा लॉन येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे जिल्हाध्यक्ष मा श्री सुनीलभाऊ राऊत साहेब यांच्या निर्देशाखाली ही' सभा घेण्यात आली वर्धा जिल्हा पदाधिकारी बैठक घेण्यासाठी संसदरत्न, कार्यकारी अध्यक्ष, खासदार सौ सुप्रियाताई सुळे , माजी गृहमंत्री मा श्री अनिलभाऊ देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश महिला प्रदेशाध्यक्ष सौ रोहिनिताई खडसे , राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मा श्री महेबूबभाई शेख या सर्व दिग्गज नेत्यां च्या नेतृत्वात खाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वर्धा जिल्हा पदाधिकारी बैठक घेण्यात आली वर्धा जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते बैठकीनंतर काही युवक व तरुण मुलांचे पक्ष प्रवेश घेण्यात आले हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती मा श्री सुधीर बाबूजी कोठारी, माजी आमदार मा श्री राजूभाऊ तिमांडे , प्रदेश सरचिटणीस मा श्री अतुल भाऊ वांदिले , वर्धा जिल्हा अध्यक्ष मा श्री सुनीलभाऊ राऊत, मा श्री समीर भाऊ देशमुख, वर्धा जिल्हा राष्ट्रवादी यु...

10 हजार से ज्यादा भक्तों ने लिया महाप्रसाद का लाभ -विदर्भ के 11 जिलों से आये भक्तों द्वारा रोग निदान,नेत्र जांच ,रक्तदान शिबिर में लिया लाभ

 10 हजार से ज्यादा भक्तों ने लिया महाप्रसाद का लाभ -विदर्भ के 11 जिलों से आये भक्तों द्वारा रोग निदान,नेत्र जांच ,रक्तदान शिबिर में लिया लाभ नागपुर. ((आनन्दमनोहर जोशी) श्राद्ध पक्ष के दौरान सोमवार की चतुर्थी को संकष्टी चतुर्थी से चतुर्दशी तक उत्सव मनाया जा रहा है.वहीँ महल स्थित सीनियर भोसला पैलेस महल में महाराजा ऑफ नागपुर ट्रस्ट के तत्वावधान मे 236 वें वार्षिकोत्सव पर मस्करया श्रीगणेश की विधिवत पूजा रोजाना शाम को राजपुरोहित राजेंद्र पुराणिक के हस्ते मंत्रोच्चारण किया जा रहा है.सरकारी मेडिकल कॉलेज डॉक्टर की टीम ने सफलतापूर्वक प्रयास किया. यहाँ इस दौरान विदर्भ के 11 जिलों से आये भक्तगणों ने स्वास्थ्य शिबिर का लाभ लिया. महाप्रसाद के दौरान अन्न का थालियाँ में उचित मात्रा में प्रसाद के रूप में लेकर जूठा नहीं छोड़ने के लिए सारंग,गणेश गरुड़ और कार्यकर्ताओं द्वारा उद्धोषणा करके निवेदन किये गए.इस विशेष अवसर पर श्रीमंत डॉ. राजे मुधोजी महाराज भोंसले, श्रीमंत रानी यशोधराराजे, श्रीमंत राजे रघुजी भोंसले, श्रीमंत राजे युवराज जयसिंहराव भोंसले,क़ानूनी सलाहकार अधिवक्ता प्रदीप देशमुख, हप्पेनिंग टुडे क...