*बुद्ध विहार येथे बौद्ध भिक्खूंसाठी पोषण जागृती मालिकेचे चौथे सत्र संपन्न*
*निकिता पाटील, प्रख्यात आहारतज्ञ *
बौद्ध भिक्खूंसाठी आहार शिक्षण सत्रांची मालिका सुरू ठेवत, मिठास केअरच्या सहकार्याने न्यूट्रा पॉवरने 8 ऑक्टोबर रोजी बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर बौद्ध सेमिनरी, उंटखाना बुद्ध विहार, नागपूर येथे आपले चौथे सत्र आयोजित केले होते. मिठास केअरचे संस्थापक विवेक नगरारे यांनी भिक्षु संघ आहार शिक्षण सत्र अभियानाच्या दूरदृष्टीची माहिती देऊन सत्राची सुरुवात केली. या अभियाना चे पहले सत्र 22 एप्रिल रोजी मैत्री बुद्ध विहार, नारी रोड, नागपूर येथून झाली आणि ह्याचे उद्दिष्ट 1000 हून अधिक बौद्ध भिक्खूंना आरोग्य व पोषण जागृती चे सशक्ति प्रदान करणे आहे ज्यासाठी कदाचित शहरभरातील 100 बुद्ध विहारांमध्ये प्रवास करण्याची आवश्यकता असू शकते.
डॉ.आंबेडकर सेमिनरीचे मुख्य धम्म प्रशिक्षक भदंत धम्मसारथी यांनी संपूर्ण समुह ला त्यांच्या मिशनचा सक्रिय भाग बनवण्याची आणि समाजात पोषण शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी नागपूरच्या विविध बुद्ध विहारांमध्ये जास्तीत जास्त भिक्षूंपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांची बांधिलकी दर्शविली.
प्रख्यात वक्ता आणि व्यावसायिकदृष्ट्या पात्र आहारतज्ञ निकिता पाटील यांनी आमच्या थाळीतील संतुलित पौष्टिक घटकांचे महत्त्व सांगितले, विशेषतः प्रत्येक जेवणात घरगुती दही समाविष्ट करण्याच्या महत्त्वावर भर दिला. साधारणपणे, त्यांना असे आढळले की पिढ्यानपिढ्या पसरलेल्या गैर समजुतीनंमुळे रात्रीच्या जेवणात दही खाणे नेहमीच टाळले जाते. दह्याबद्दलचे गैरसमज दूर करून, निकिता ने पौष्टिकतेने समृद्ध पदार्थांच्या वैज्ञानिक तथ्यांवर प्रकाश टाकते आणि विशेषतः आपल्या प्रत्येक जेवणात दही/टाकचे महत्त्व स्पष्ट केले.
10 भिक्षूंच्या लहान गटाने त्यांच्या काळजीवाहकांसह संतुलित आहारावर सक्रियपणे सत्रात भाग घेतला, अनेक सामान्य प्रश्न विचारले. निकिताने सर्वांच्या शंकांचे वैद्यानिक आधाराने निरासन केले. धार्मिक समारंभासाठी जेव्हा भिक्षूंना आमंत्रित केले जाते तेव्हा सामान्य माणसांना दिल्या जाणाऱ्या आदर्श अन्नदानाची यादीही त्यांनी तयार केली आहे. हे यादी चे पुस्तक उंटखाना बुद्ध विहारला डॉ. कीर्ती पाटील, डॉ. कविता निखाडे आणि ज्योती पाटील ह्यांच्या हातुन दान केले, जे या जनजागृती अभियानाचा सक्रिय भाग आहेत. डॉ. प्रेमानंद निखाडे आणि पत्रकार दयानंद पाईकराव यांनी त्यांच्या बहुमोल उपस्थितीने संपूर्ण सत्राचे निरीक्षण केले. जितेंद्र तिरपुडे आणि पंकज वालदे यांना बीएमआय, अँनिमिया, मधुमेह आणि उच्च रक्तदाब तपासणीसाठी पुरस्कृत करण्यात आले. संघाने अविनाश रामटेके, रोशन राऊत, भूषण पाटील यांचे समर्पित वेळ आणि अथक परिश्रम केल्याबद्दल आभार व्यक्त केले.