सीधे मुख्य सामग्री पर जाएं

गुणवत्तापूर्ण व दर्जेदार विकास कामामुळेच जिल्ह्याचा नावलौकिक- पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

 गुणवत्तापूर्ण व दर्जेदार विकास कामामुळेच जिल्ह्याचा नावलौकिक- पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

*लखमापूर येथे हनुमान मंदिर परिसर सौंदरीकरणाचे लोकार्पण व पाण्याच्या टाकीचे भूमिपूजन*

*चंद्रपूर, दि. 22* : नागपूर - चंद्रपूर मार्गावरील लखमापूर हनुमान मंदिर परिसर हा अध्यात्मिक ऊर्जा देणारा परिसर आहे. या परिसराच्या सौंदर्यीकरणासाठी 60 लक्ष रुपये मंजूर करण्यात आले होते, या परिसरातील अतिशय चांगले कामे झालेली आहे. शेवटी गुणवत्तापूर्ण व दर्जेदार कामांमुळेच जिल्ह्याचा नावलौकिक वाढतो, असे प्रतिपादन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

लखमापूर येथे हनुमान मंदिर परिसर सौंदर्यीकरणाचे लोकार्पण व नवीन पाण्याच्या टाकीचे भूमिपूजन करताना ते बोलत होते. यावेळी मंचावर देवराव भोंगळे, रामपाल सिंग, हनुमान काकडे, सरपंच शारदा राजूरकर, उपसरपंच प्रभाकर ताजने, अनिल डोंगरे, विलास टेंभुने, नामदेव आसुटकर, हेमा रायपूरे, फारुख शेख, हनुमान मंदिर देवस्थानचे अध्यक्ष सुरेश शर्मा, शांताराम चौखे, मनोज मानकर आदी मान्यवर उपस्थित होते.

मंदिर परिसराच्या सौंदर्यीकरणाची मागणी हनुमान मंदिर देवस्थानचे अध्यक्ष श्री. शर्मा आणि त्यांच्या टीमने केली होती, असे सांगून पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, नागरिकांची ही मागणी तत्कालीन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना सांगितली व त्यांनी मंदिर परिसराच्या सौंदर्यीकरणासाठी 60 लाख रुपये तात्काळ मंजूर केले. लखमापूर येथील हनुमानजीचे मंदिर हे अधिक सुंदर व आकर्षक होण्यासाठी आणखी काही कामे शिल्लक असल्यास निधी मागणीचा प्रस्ताव सादर करावा. मंदिरासाठी तात्काळ निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली. 

पुढे ते म्हणाले, आज येथे नवीन पाण्याच्या टाकीचे भूमिपूजन करण्यात आले असून यासाठी 1 कोटी 62 लक्ष रुपये मंजूर करण्यात आले आहे. गावात आपण पिढ्यानपिढ्या राहत आलो आहोत. त्यामुळे पाण्याच्या टाकीचे काम उत्तम व  दर्जेदार व्हावे, याकडे गावकऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. कामे दर्जेदार असली तरच आपला परिसर, गाव, शहर व जिल्ह्याचा विकास होतो. चंद्रपूर जिल्हा हा चिंतामुक्त व आनंदयुक्त व्हावा, यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करावे, असे आवाहनही त्यांनी गावकऱ्यांना केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला हनुमान मंदिर परिसर सौंदर्यीकरणाचे लोकार्पण व नवीन पाण्याच्या टाकीचे भूमिपूजन झाले, असे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घोषित केले. 

*असे आहे हनुमान मंदिर परिसराचे सौंदर्यीकरण

: लखमापूर येथील हनुमान मंदिर परिसरातील संरक्षण भिंतीचे बांधकाम व परिसर सौंदर्यीकरणाच्या कामासाठी ग्रामीण विकास निधी अंतर्गत 60 लक्ष रुपये मंजूर करण्यात आले. यात व्यासपीठाचे बांधकाम, भित्तीचित्रे व मूर्ती कामासह सौंदर्यीकरण आणि वृक्ष लागवड यांचा समावेश आहे. साधारणत: 170 मीटर लांबीची व सरासरी 2.2 मीटर उंचीची आर.सी.सी. फ्रेम स्ट्रक्चर एम-25 दर्जाची संरक्षण भिंत पूर्ण करण्यात आली आहे. भिंतीकरिता फ्लॅश एश प्रकारच्या विटांचा वापर करण्यात आला असून भिंत 9 इंच जाडीची आहे. तसेच भिंतीला दोन्ही बाजूस ऍक्रेलिक इमुलशन पेंटने रंगरंगोटी करण्यात आली आहे. नैऋत्य दिशेला 27 स्क्वेअर मीटर क्षेत्रफळाचे व्यासपीठाचे बांधकाम करण्यात आले आहे. या मंदिर परिसरात आध्यात्मिक दर्शन करणारे एफ. आर. पी. प्रकारचे भित्तीचित्रे बनवण्यात आली असून संरक्षण भिंतीला लागून वृक्षलागवड सुद्धा करण्यात आली आहे.


इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

बुद्ध विहार येथे बौद्ध भिक्खूंसाठी पोषण जागृती मालिकेचे चौथे सत्र संपन्न

  *बुद्ध विहार येथे बौद्ध भिक्खूंसाठी पोषण जागृती मालिकेचे चौथे सत्र संपन्न*  *निकिता पाटील, प्रख्यात आहारतज्ञ * बौद्ध भिक्खूंसाठी आहार शिक्षण सत्रांची मालिका सुरू ठेवत, मिठास केअरच्या सहकार्याने न्यूट्रा पॉवरने 8 ऑक्टोबर रोजी बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर बौद्ध सेमिनरी, उंटखाना बुद्ध विहार, नागपूर येथे आपले चौथे सत्र आयोजित केले होते. मिठास केअरचे संस्थापक विवेक नगरारे यांनी भिक्षु संघ आहार शिक्षण सत्र अभियानाच्या दूरदृष्टीची माहिती देऊन सत्राची सुरुवात केली. या अभियाना चे पहले सत्र 22 एप्रिल रोजी मैत्री बुद्ध विहार, नारी रोड, नागपूर येथून झाली आणि ह्याचे उद्दिष्ट 1000 हून अधिक बौद्ध भिक्खूंना आरोग्य व पोषण जागृती चे सशक्ति प्रदान करणे आहे ज्यासाठी कदाचित शहरभरातील 100 बुद्ध विहारांमध्ये प्रवास करण्याची आवश्यकता असू शकते. डॉ.आंबेडकर सेमिनरीचे मुख्य धम्म प्रशिक्षक भदंत धम्मसारथी यांनी संपूर्ण समुह ला त्यांच्या मिशनचा सक्रिय भाग बनवण्याची आणि समाजात पोषण शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी नागपूरच्या विविध बुद्ध विहारांमध्ये जास्तीत जास्त भिक्षूंपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांची बांधिलकी द...

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वर्धा जिल्हा पदाधिकारी बैठक

 🖊️प्रविण जगताप 🖊️वर्धा जिल्हा प्रतिनिधी मो . 9284981757 वर्धा *आज दिनांक ०२ /१० /२०२३ रोजी वर्धा येथे महात्मा लॉन येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे जिल्हाध्यक्ष मा श्री सुनीलभाऊ राऊत साहेब यांच्या निर्देशाखाली ही' सभा घेण्यात आली वर्धा जिल्हा पदाधिकारी बैठक घेण्यासाठी संसदरत्न, कार्यकारी अध्यक्ष, खासदार सौ सुप्रियाताई सुळे , माजी गृहमंत्री मा श्री अनिलभाऊ देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश महिला प्रदेशाध्यक्ष सौ रोहिनिताई खडसे , राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मा श्री महेबूबभाई शेख या सर्व दिग्गज नेत्यां च्या नेतृत्वात खाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वर्धा जिल्हा पदाधिकारी बैठक घेण्यात आली वर्धा जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते बैठकीनंतर काही युवक व तरुण मुलांचे पक्ष प्रवेश घेण्यात आले हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती मा श्री सुधीर बाबूजी कोठारी, माजी आमदार मा श्री राजूभाऊ तिमांडे , प्रदेश सरचिटणीस मा श्री अतुल भाऊ वांदिले , वर्धा जिल्हा अध्यक्ष मा श्री सुनीलभाऊ राऊत, मा श्री समीर भाऊ देशमुख, वर्धा जिल्हा राष्ट्रवादी यु...

10 हजार से ज्यादा भक्तों ने लिया महाप्रसाद का लाभ -विदर्भ के 11 जिलों से आये भक्तों द्वारा रोग निदान,नेत्र जांच ,रक्तदान शिबिर में लिया लाभ

 10 हजार से ज्यादा भक्तों ने लिया महाप्रसाद का लाभ -विदर्भ के 11 जिलों से आये भक्तों द्वारा रोग निदान,नेत्र जांच ,रक्तदान शिबिर में लिया लाभ नागपुर. ((आनन्दमनोहर जोशी) श्राद्ध पक्ष के दौरान सोमवार की चतुर्थी को संकष्टी चतुर्थी से चतुर्दशी तक उत्सव मनाया जा रहा है.वहीँ महल स्थित सीनियर भोसला पैलेस महल में महाराजा ऑफ नागपुर ट्रस्ट के तत्वावधान मे 236 वें वार्षिकोत्सव पर मस्करया श्रीगणेश की विधिवत पूजा रोजाना शाम को राजपुरोहित राजेंद्र पुराणिक के हस्ते मंत्रोच्चारण किया जा रहा है.सरकारी मेडिकल कॉलेज डॉक्टर की टीम ने सफलतापूर्वक प्रयास किया. यहाँ इस दौरान विदर्भ के 11 जिलों से आये भक्तगणों ने स्वास्थ्य शिबिर का लाभ लिया. महाप्रसाद के दौरान अन्न का थालियाँ में उचित मात्रा में प्रसाद के रूप में लेकर जूठा नहीं छोड़ने के लिए सारंग,गणेश गरुड़ और कार्यकर्ताओं द्वारा उद्धोषणा करके निवेदन किये गए.इस विशेष अवसर पर श्रीमंत डॉ. राजे मुधोजी महाराज भोंसले, श्रीमंत रानी यशोधराराजे, श्रीमंत राजे रघुजी भोंसले, श्रीमंत राजे युवराज जयसिंहराव भोंसले,क़ानूनी सलाहकार अधिवक्ता प्रदीप देशमुख, हप्पेनिंग टुडे क...