पूरग्रस्तांना न्याय देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा
नाल्यावर अतिक्रमण करण्यासाठी मदत करणाऱ्या मनपा अधिकाऱ्यांना निलंबित करा - प्रशांत पवार
नागपूर शहरात झालेल्या अतिवृष्टी सदृश्य पावसाने अनेक घरे, वाहने, उपकरणे, दुकाने, घरातील गाद्या पासून सर्वच साहित्य ओले चिंब झाले. प्रशासनाने फक्त श्रीमंत भागात पाहणी दौरा केला असल्याने झोपडपट्टी भागात प्रशासनाच्या एकही अधिकाऱ्यांनी दौरा केला नाही.
*विशेष म्हणजे चमडिया हायस्कूलच्या मागील काचीपूरा भागात सुमारे 350 घरे आणि 1400 नागरिकांचे संसार उघड्यावर आले. नवीन वसाहत गड्डी गोदाम, गोवा कॉलोनी, मंगळवारी बाजार, धोबीघाट, स्वीपर मोहल्ला, परदेशी मोहल्ला, गौतम नगर या परिसरात 300 घरांचे नुकसान झाले. या वस्तीत 3 दिवसा पासून खायला अन्न नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मंगळवार दिनांक 26.9.2023 रोजी दुपारी 12.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय वर हजारोच्या संख्येने धडक मोर्चा काढण्यात आला.*
*जिल्हाधिकारी श्री.विपीन इटनकर यांना निवेदन देऊन या वस्ती मध्ये आतापर्यंत एकही अधिकारी का आला नाही याचे जाब विचारण्यात आले. नाल्याच्या बाजूने हॉस्पिटल, कॉलेज, मॉल, बिल्डर्स, फ्लॅट स्कीम, हॉस्पिटलच्या तळमजल्यावर पार्किंग च्या जागी अतिक्रमण करण्यात आले आहेत. काही वर्षांपूर्वी नाग नदीचा नाला रुंद होता आज त्यावर 80% स्लॅब आहे तसेच अनधिकृत लाँन वाले अधिकाऱ्यांना चिरीमिरी देऊन नाल्या मध्ये कचरा टाकत असल्याने पूरपरिस्थिती निर्माण होत आहे. नाल्यावर असलेल्या अतिक्रमणचे ऑडिट करून तात्काळ कारवाई करावी आणि अतिक्रमण करण्यासाठी मदत करणाऱ्या मनपाच्या अधिकाऱ्यांचे निलंबन करावे असे प्रशांत पवार यांनी जिल्हाधिकारी यांना यावेळी म्हटले. जिल्हाधिकारी यांनी पवार यांची मागणी मान्य करीत 3 दिवसात पूरग्रस्तांची पाहणी व पंचनामे करून त्यांना मदत करण्याचे आश्वासन दिले. 3 दिवसात पूरग्रस्तांना न्याय न दिल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या पेक्षा मोठे आंदोलन करण्यात येईल असे सांगण्यात आले.*
*निवेदन देतांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष प्रशांत पवार, कार्यकारी अध्यक्ष श्रीकांत शिवणकर, आभाताई पांडे सदस्य राज्य महिला आयोग, अनिल अहिरकर प्रदेश उपाध्यक्ष, ईश्वर बाळबुधे राज्य ओबीसी विभागचे समन्वयक , विशाल खांडेकर युवक शहर अध्यक्ष, लक्ष्मी ताई सावरकर महिला अध्यक्ष, राजेश माटे माजी नगरसेवक, अरविंद भाजीपाले अध्यक्ष दक्षिण नागपूर, रवी पराते युवक कार्यकारी अध्यक्ष, प्रशांत अग्रवाल अध्यक्ष पूर्व विभाग, विश्वजित तिवारी विद्यार्थी अध्यक्ष, निलिकेश कोल्हे उपाध्यक्ष, जयंत किणकर उपाध्यक्ष, राकेश बोरीकर उपाध्यक्ष, महासचिव मिलिंद महादेवकर, नागेश देडमुठे शहर उपाध्यक्ष युवक काँग्रेस, अमरिश ढोरे, राहुल कामळे, तुषार डबाले, विक्रांत मेश्राम, प्रमोद गारोडी, विक्रांत मेश्राम, शेखर भेंडेकर, संकेत नागपूरे, आदित्य केदारपवार, गोलू रामटेके, सौरभ कोल्हे, राजू भोयर, अरुण गायकवाड, सौरव गायकवाड, अजहर शब्बीर अली, सुभाष टेंभुरकर व इतर पदाधिकारी आणि पूरग्रस्त भागातील हिरालाल हिरणवार, सुनील उमाठे हजारोंच्या नागरिक संख्येने उपस्थित होते.*