सीताबर्डी प्रभाग 15 येथील पूरग्रस्त सदृश्य परिस्थितीत आपादग्रस्तांना नागरिकांना व व्यापाऱ्यांना नुकसान भरपाई मिळणे बाबत
सीताबर्डी प्रभाग 15 येथील पूरग्रस्त सदृश्य परिस्थितीत आपादग्रस्तांना नागरिकांना व व्यापाऱ्यांना नुकसान भरपाई मिळणे बाबत
नागपुरात शुक्रवार दिनांक 22/ 9/2023 रोजी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे सीताबर्डी प्रभाग 15 येथील भागात पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असता बेसमेंट व उतार भागात ज्या व्यापाऱ्यांचे दुकान होती पावसाचे पाणी घुसून त्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तरी मा . उपमुख्यमंत्री यांच्या आदेशान्वये नुकसान भरपाईचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले असून या सर्व नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांना व नागरिकांनामदत करून यांच्या दुकानाचे पंचनामे लवकर करून भरपाई शासनाद्वारे देण्यात यावी अशी मागणी भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडी सीताबर्डी अध्यक्ष दिनेश गावंडे उपाध्यक्ष वरून महाडिया यांनी सहाय्यक आयुक्त धरमपेठ झोन 2 श्री प्रकाश वराडे महानगरपालिका उपायुक्त श्रीमती आंचल गोयल व उपमुख्यमंत्री पालकमंत्री नागपूर शहर यांच्या कार्यालयात निवेदन देण्यात आले.