नागपुरकर सैनिकांना पाठविणार सिमेवर राख्या
देशाच्या सिमेवर २४ तास पहारा देवून देशातील तमाम नागरिकांचे रक्षण करणार्यय सैनिकाना राखी पाठवून त्यांच्या कार्याचे सलाम करने प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे. नागपुरकर चला सैनिकांसाठी पाठवा राखी सैनिकाप्रती कृतज्ञता व्यक्त करूया त्यांच्या रक्षणासाठी राखी पाठवूया. या अभियानात दर वर्षी प्रमाणे या वर्षी सहभागी होवूया. असे आव्हाहन नागपुरकरां तर्फ करण्यात आले आहे. 25 ऑगस्ट रोजी शुक्रवार ला दुपारी 11.30 वाजता पाठविण्यात येणार आहे असे, आयोजकानी कळविले आहे़, अधिक माहितीसाठी मुख्य संयोजक निखिल भुते ९४०३५८६७२४ "भुते निवास", सिरसपेठ, उमरेड रोड, नागपूर , तसेच मार्गदर्शक नागपूरकर महाराज श्रीमंत राजे मुधोजी भोसले, सचिव विक्रांची चिलाटे, सदस्य पंकज बान्ते आणि संपूर्ण नागपूरकर पदाधिकारीगण यांच्यातर्फे संपूर्ण नागपूरवासियांना आवाहन करण्यात आलेले आहे.