वामनराव बर्डे स्मृती लोकसेवा प्रतिष्ठान पश्चिम नागपूर तर्फे,भव्य महाप्रसाद वितरण
नागपूर,आज गुरुवार दिनांक 24 ऑगस्ट 2023 रोजी वामनराव बरडे स्मृती लोकसेवा प्रतिष्ठान नागपूर व भारतीय जनता पार्टी ओबीसी आघाडी पश्चिम नागपूर चे अध्यक्ष श्री. नरेशभाऊ बरडे व भारतीय जनता पार्टी, पश्चिम नागपूर यांच्यातर्फे भव्य महाप्रसाद वितरणाचे आयोजन करण्यात आले होते, फ्रेण्ड्स कॉलनी वॉर्ड च्या अध्यक्षा सौ. साधना नरेश बरडे यांच्या द्वारा आयोजीत शिव महापुराण कथा समारोप दुपारी 12.00 वाजता महाहवन व महापुजन करून करण्यात आले व त्यानंतर दुपारी 2.00 ते सायंकाळी 7.00 वाजता पर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. महाप्रसादाचे वितरण माजी आमदार श्री. सुधाकरराव देशमुख साहेब यांच्या प्रमुख उस्थितीत करण्यात आला.