नागपुर : फिर्यादी अनुज रामनरेश पांडे वय ४१ वर्ष रा. बी / ०४, फिटनेस वर्ल्ड जिम समोर, गणेशपेठ कॉलनी, नागपुर, यांचे बसस्थानक गणेशपेठ समोर अंबीका भोजनालय आहे. आरोपी ललीत रामसंजीवन अग्नीहोत्री वय ३३ वर्ष रा. रामनगर, वर्धा हा नेहमी जेवन करायला येत होता त्यामुळे ओळख झाली होती. आरोपी आपले ओळखीचे लोकांना सुध्दा जेवनाकरीता घेवुन येत होता. आरोपीला जेवनाचे पैसे मागीतले असता तो स्वतःला मोठया राजकीय नेत्याचा पि... ए. असल्याचे सांगुन त्याने हॉटेल मालकाला जेवनाचे पैसे दिले नव्हते. आरोपीवर जेवनाच्या उधारीचे ५० हजार रूपये झाले होते. फिर्यादी यांना आरोपी हा कोणाचाही पि.ए. नसुन खोटे बोलत असल्याचे माहीत झाले होते. दिनांक २२.०८. २०२३ चे २३.३० वा. चे सुमारास फिर्यादीचे नविन हॉटेल ब्रिज ईन, जाधव चौक, गणेशपेठ, नागपुर येथे फिर्यादीचे भाउ, दुर्गाप्रसाद रामनरेश पांडे, वय ४५ वर्ष, रा. बी / ०४, फिटनेस वर्ल्ड जिम समोर, गणेशपेठ कॉलनी, नागपुर हे हजर असतांना तेथे आरोपी हा जेवन करण्याकरीता आला. दुर्गाप्रसाद यांनी आरोपीला उधारीचे पैसे मागीतले असता आरोपी याने जुने अंबीका हॉटेल येथे दुपारीच पैसे दिल्याचे सांगीतले. यावरून दुर्गाप्रसाद यांनी विचारपुस करून खात्री केली असता आरोपीने पैसे दिले नसल्याचे समजले. दुर्गाप्रसाद यांचा हॉटेल ब्रिज ईन येथे आरोपी सोबत बिलाबाबत वाद झाला. त्या भांडणात आरोपीने स्वतः जवळील धारदार चाकुने दुर्गाप्रसाद यांचे पोटावर, छातीवर, व दोन्ही पायावर वार करून, जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. गंभीर जख्मी दुर्गाप्रसाद यांचा उपचार मेडीकल हॉस्पीटल ट्रामा सेंटर येथे सुरू आहे.
याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या रिपोर्टवरून पोलीस ठाणे गणेशपेठ येथे सपोनि राठोड यांनी आरोपींविरूध्द कलम ३०७, भा. दं.वी अन्वये गुन्हा नोंदवून आरोपीस अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.