नागपूर, दि. 28 : मानसिक अस्वास्थ व व्यसनाधीनतेची वाढती समस्या लक्षात घेता जिल्ह्यात नवीन व्यसनमुक्ती केंद्र कार्यान्वित करण्यात येणार आहेत. या केंद्रांसाठी स्वयंसेवी संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.
प्रस्ताव सादर करण्यासाठी अर्जाचा नमुना समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद नागपूर या कार्यालयात उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा समाज कल्याण अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.