मागील 17 वर्षापासुन नागपूरकरांनी देशाच्या सिमेवर रक्षण करणा-या सैनिक बांधवासाठी स्वतः राख्या बनवुन सैनिकांना राख्या पाठवून दिर्घाआयुष्याच्या शुभेच्छा दिल्या. या उपक्रमासाठी नागपूरकांचे संयोजक निखिल भुते यांच्या पुढाकाराने नागपूरातील सामाजिक आध्यामिक महाविद्यालयीन सांस्कृतिक क्रिडा व सैनिकी संघटनाच्या संकल्पनेतून भारत-पाकिस्तान कारगीर (बार्डर) वरील सैनिकांनसाठी नागपूरकराच्या वतीने श्रीमंत युवराज जयसिंहराजे भोंसले, यांच्या हस्ते व प्राचार्य विक्रांत चिलाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत व विविध मान्यवरांच्या हस्ते निवासी उपजिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी सुभाष चौधरी यांच्या माध्यमातून बॉर्डर वर राख्या पाठविण्यात आल्या. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्रीमंत युवराज जयसिंहराजे भोंसले, मुख्य संयोजक निखील भुते, विशेष अतिथी तायवाडे फार्मसी कॉलेजचे प्राचार्य विक्रांत चिलाटे, मिसेस युनिवर्स सौ. प्रविणा दाढे, कमलेश माचेवार, पंकज बांते, राहुल चन्द्रशेखर गुप्त, प्रशांत कुंभारे व अन्य मान्यवर प्रामुख्याने उपस्थित राहून कार्यक्रमाला संबोधित केले. यावेळी नागपूरकारांच्या वतीने मिसेस युनिवर्स सौ. प्रविणा दाढे व विविध विद्यार्थ्यांनी यांनी उपजिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी सुभाष चौधरी यांना राखी बांधून दिर्घाआयुष्याच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे संचालन निखिल भुते, प्रास्ताविक श्रीमंत युवराज जयसिंहराजे भोंसले, आभार प्रदर्शन विक्रांत चिलाटे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी कारण्यासाठी अर्शन शेख, मोहित वाणी, प्रथम ठाकरे, आसिया शेख, भूमिका सेवक, अमिषा ढोके, सुबोध कोचे, आयुष तुपकर, निखिल ठाकूर, वैष्णवी गुप्ता, श्रेया झोड, करीना मेहर, सात्विक अंजनकर, खुशी हेडाऊ, घनश्याम राऊत, अंजली डहारे, प्रधान सोनोने, मोहित नवानी, आशिष गिल्लोर, भावेश दिवाणी, पलाश उके, जान्हवी सोनोने, साक्षी लिचडे, जान्हवी सुपारे, अनुराधा राऊत व इतरांनी अर्थक परिश्रम केले.