*महादुल्यात होणार डॉ. आंबेडकर कौशल्य विकास केंद्र* • प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे प्रतिपादन
*महादुल्यात होणार डॉ. आंबेडकर कौशल्य विकास केंद्र*
• प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे प्रतिपादन
• ४४५ कॉंग्रेस कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश
• महादुला-कोराडीत कोट्यवधींची विकास कामे
कोराडी (नागपूर), दि. 26.08.2024
महादुला व परिसरातील युवकांना रोजगारांच्या संधी मिळविण्यासाठी कौशल्य आवश्यक आहे. हे कौशल्य मिळावे यासाठी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर विकास केंद्र स्थापन करून त्या माध्यमातून प्रशिक्षण दिले जाईल. यामुळे युवकांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या नव्या वाटा उघडल्या जातील असे प्रतिपादन भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
महादुला येथील कोराडी महालक्ष्मी जगदंबा मंदिर मार्गावर आयोजित पक्षप्रवेश कार्यक्रमात कॉंग्रेसच्या ४४५ कार्यकर्त्यांनी श्री बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. त्यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. ते म्हणाले, महादुला-कोराडीच्या नागरिकांनी मला प्रचंड प्रेम दिले असून त्या बळावरच मी जिल्हा परिषद सदस्य, आमदार, मंत्री व आता भाजपाचा प्रदेशाध्यक्ष होऊ शकलो. येथील नागरिकांशी माझे जिव्हाळ्याचे संबंध आहे. या भागातील तरुणांना रोजगाराच्या संधी मिळाव्यात यासाठी माझे सतत प्रयत्न सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौशल्य विकास व त्यातून रोजगार व स्वयंरोजगाराला चालना मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासाठीच या ठिकाणी ८० कोटीच्या निधीतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. या कौशल्य विकास केंद्रातून शेकडो सुशिक्षित युवकांना कौशल्य प्राप्त होईल. प्रस्ताविक महादुलाचे भाजपा अध्यक्ष प्रीतम लोहासारवा यांनी केली. संचालन चंद्रप्रकाश आगासे तर आभार पन्नालाल रंगारी यांनी मानले.
यावेळी भाजपा नागपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे, कामठी विधानसभा प्रमुख अनिल निधान, भाजयुमोचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य संकेत बावनकुळे, महादुलाचे नगराध्यक्ष राजेश रंगारी, उपाध्यक्ष धनंजय भालेराव, कोराडीचे सरपंच नरेंद्र धनोले, बोखाराचे सरपंच भाऊराव गोमासे, लोणखैरीचे सरपंच लीलाधर भोयर, नंदा तुरक, अभिजित ढेंगरे, पंकज ढोणे, स्वप्नील थोटे, विजय राऊत, गुणवंता पटले, कांचन कुथे, अजय नांदुरकर, जितेश भगत, अतुल मानवटकर, छाया लांडे, ममता वरठे, पवन पखीड्डे, किशोर चौधरी, मनोज चवरे, गौरव आळणे, राष्ट्रगण चंद्रशेखर यांच्यासह मोठ्या संख्येने महादुला व कोराडीचे भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
*भाजपात यांचा झाला प्रवेश*
यावेळी कॉंग्रेसचे नगरसेवक मोसीम शेख, अनिल उमरे, देवेंद्र नवधिंगे, शुभम गावंडे, रौनक कमाले, श्रेयस बागडे, विजय जैन, विश्वजीत आवळे, वंसता राऊत, राहुल बागडे, युनूस खान, इर्शाद खान, सचिन पवार, मनीष पवार, सूरज उपाध्याय, सचिन वानखेडे यांच्यासह त्यांच्या समर्थकांचा समावेश होता.
*महादुल्याला मिळाली नवी ओळख*
महादुला हे आता गाव राहिले नसून आता त्यास शहराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. उत्तम रस्ते व उड्डाणपुलामुळे महादुला कोराडीला नवी ओळख मिळाली आहे. कवेळ नवीन वीज केंद्र नव्हे तर कोराडी येथील महालक्ष्मी जगदंबा मंदिर तीर्थस्थळाचा विकास झाल्याने या भागाला नवी ओळख मिळाली असून देश-विदेशातील भाविक येथे दर्शनासाठी येत असल्याने येथे भविष्यात मोठ्या संधी निर्माण होणार आहे, असेही श्री बावनकुळे म्हणाले.
*महादुल्यातील नियोजित प्रकल्प*
• वीज केंद्रात दोन नवीन संच
• छत्रपती शिवाजी महाराज स्मारक
• महादुला वस्तीमध्ये भूमिगत नाली बांधकाम
• पाणी पुरवठा योजनेचा विस्तारित प्रक्लप
• अंतर्गत रस्ते, समाज मंदिराची निर्मिती
• खाऊ गल्ली
• वातानुकुलित मटन व मच्छी मार्केट
• महिला बचत गटातून रोजगार निर्मिती
• विश्वकर्मा योजना घरोघरी राबविणार
• झोपडपट्टीवासींना पट्टेवाटप