सीधे मुख्य सामग्री पर जाएं

राज्यात दलित सुरक्षित नाहीत; हेच काय 'अच्छे दिन वाली सरकार...?' - डॉ. नितीन राऊत


*श्रीरामपूर तालुक्यात चोरीच्या संशयावरून चार दलित शालेय विद्यार्थ्यांना मारहाण, डॉ. राऊतांची राज्य शासना विरुद्ध घणघणीत टिका*

नागपूर, दिनांक - २८/०८/२०२३ :- अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यात चोरीच्या संशयावरून चार दलित शालेय विद्यार्थ्यांना त्यांच्या घरातून नेण्यात आलं आणि कपडे काढून त्यांना झाडाला उलटे लटकवून अमानुष मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला. केवळ चोरी केल्याच्या संशयावरून अशा प्रकारे कायदा हातात घेण्याचा अधिकार यांना दिला कोणी? राज्य सरकारला राज्यात वर्णव्यवस्था आणायची आहे? पण काँग्रेस पक्ष ते होऊ देणार नाही. या देशातील दलित, वंचित यांच्या हक्कासाठी काँग्रेस पक्ष, धर्मांध राज्य शासनाच्या विरोधात लढत राहील.

मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांच्या राजवटीत राज्यात दलित सुरक्षित नाहीत. हेच काय 'अच्छे दिन वाली सरकार...?' या घटनेवरून राज्यात जातिभेद ठळकपणे दिसून येतो. हा जातीभेद संपणार कधी? असा प्रश्न करीत राज्याचे माजी मंत्री व नागपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी राज्य शासना विरुद्ध घणघणीत टिका केली.

मोलमजुरी करुन आपले शिक्षण पूर्ण करणाऱ्या शालेय दलित विद्यार्थ्यांना चोरीच्या संशायावरून श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथे चार दलित तरुणांना झाडाला बांधून मारहाण केल्याची संतापजनक घटना घडली. हे तरूण आणि त्यांचे कुटुंबीय मोलमजुरी करून आपली उपजीविका करतात.

सध्या नुकताच सोशल मीडियावर एका मुस्लिम विद्यार्थ्याला त्याच्या शाळेतील वर्गमित्रांकडून कानाखाली वाजवण्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये शाळेतील शिक्षिकाच मुस्लिम विद्यार्थ्याला आक्षेपार्ह बोलताना दिसत आहे. या घटनेमुळे संपूर्ण देशातून संतापाची लाट उसळली असताना आता चार दलित तरुणांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. भारतीय जनता पार्टी द्वारे सातत्याने करण्यांत येणारे घृणित राजकारणाचा परिणाम आहे. घडलेल्या या दोन्ही घटनांमुळे देशात जातीय अत्याचाराचे प्रमाण वाढत असल्याचे दिसत आहे, असे ही यावेळी डॉ. राऊत म्हणालेत.

संबंधित घटनेतील पीडित तरुण शुभम माघाडे, कुणाल मगर, ओम गायकवाड व प्रणय खंडागळे यांना जबर मारहाण करण्यात आली. यातील काही अल्पवयीन व दलित समाजातील आहेत. याप्रकरणी दलित तरुणांना मारहाण करणाऱ्या सर्व आरोपींच्या मुसक्या आवळ्याव्या व तात्काळ अटक करून या प्रकरणाची उच्च स्तरीय चौकशी करुन कठोर कारवाई करावी तसेच पिढीतांना संरक्षण द्यावे, त्यांच्या शिक्षणाच्या खर्च शासनाने वहन करावा व पिढीतांना शासकीय नोकरी मिळून देण्याची हमी द्यावी. मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांच्या राजवटीत राज्यात दलित सुरक्षित नाहीत. हेच काय 'अच्छे दिन वाली सरकार...?' या घटनेवरून राज्यात जातिभेद ठळकपणे दिसून येतो. हे कृत्य मानवतेवरील कलंक आहे. याप्रकरणी दलित तरुणांना मारहाण करणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाई करावी. या घटनेबद्दल महाराष्ट्रासह तमाम देशवासीयांच्या भावना अत्यंत तीव्र असून डॉ. नितीन राऊत यांनी या घटनेच्या तीव्र शब्दात निषेध नोंदविला. सरकारने याकडे गांभीर्याने पाहावं. अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशी मागणी पत्रा द्वारे डॉ. राऊत यांनी राज्याचे मुख्यमंत्री यांना केली आहे.




इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वर्धा जिल्हा पदाधिकारी बैठक

 🖊️प्रविण जगताप 🖊️वर्धा जिल्हा प्रतिनिधी मो . 9284981757 वर्धा *आज दिनांक ०२ /१० /२०२३ रोजी वर्धा येथे महात्मा लॉन येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे जिल्हाध्यक्ष मा श्री सुनीलभाऊ राऊत साहेब यांच्या निर्देशाखाली ही' सभा घेण्यात आली वर्धा जिल्हा पदाधिकारी बैठक घेण्यासाठी संसदरत्न, कार्यकारी अध्यक्ष, खासदार सौ सुप्रियाताई सुळे , माजी गृहमंत्री मा श्री अनिलभाऊ देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश महिला प्रदेशाध्यक्ष सौ रोहिनिताई खडसे , राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मा श्री महेबूबभाई शेख या सर्व दिग्गज नेत्यां च्या नेतृत्वात खाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वर्धा जिल्हा पदाधिकारी बैठक घेण्यात आली वर्धा जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते बैठकीनंतर काही युवक व तरुण मुलांचे पक्ष प्रवेश घेण्यात आले हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती मा श्री सुधीर बाबूजी कोठारी, माजी आमदार मा श्री राजूभाऊ तिमांडे , प्रदेश सरचिटणीस मा श्री अतुल भाऊ वांदिले , वर्धा जिल्हा अध्यक्ष मा श्री सुनीलभाऊ राऊत, मा श्री समीर भाऊ देशमुख, वर्धा जिल्हा राष्ट्रवादी यु...

दारुच्या नशेत एसटी चालविणाऱ्या चालकास पोलिसांनी घेतले ताब्यात.वेळ सावधतेने प्रवाशांचे वाचले जीव.

 दारुच्या नशेत एसटी चालविणाऱ्या चालकास पोलिसांनी घेतले ताब्यात.वेळ सावधतेने प्रवाशांचे वाचले जीव. यवतमाळ – मदयधुंद अवस्थेत एस.टी. बस चालविने पडले महाग. २२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या चालकाची जेलम ध्ये रवानगी करण्यात आली.सविस्तर वृत्त असे की दि.२२/०८/२०२३ रोजी सकाळी यवतमाळ ते छत्रपती संभाजी नगर ला जाणारी यवतमाळ आगाराची एस.टी.बस MH ४०CM ५१२१ हि दारव्हा बस स्थानकावरून २२ प्रवाशांसह रवाना झाली या बस मध्ये बालक म्हणुन नारायन मारोती एकुंडवार तर वाहक म्हणुन प्रशांत पांडुरंग भगत असे नेमणुकीस होते. बस दारव्हा येथुन निघुन कारंजा रोडवर ५ किमी अंतरावरील चिखली फाटा येथे पोहचली असता बस वेडी वाकडी धाऊ लागली प्रवाशांनी आरडा ओरड करताच चालकाने बस थांबविली व स्टेअरींग वर त्याने मान टाकली प्रवाशांनी चालकास विचारपुस केली असता तो पुर्णपणे दारूच्या नसेत असल्याचे व त्यास बोलता बघता देखील येत नसल्याचे दिसुन आले. या बाबत वाहक भगत यांनी दारव्हा आगाराला माहीती देताच आगाराच्या अधिका-यानी घटनास्थळी जावुन चालकास ताब्यात घेवुन पोलीस स्टेशन ला हजर केले. पोलीस स्टेशन ला देखील चालक नारायन ऐकुंडवार यास निट उभे राहता ये...

PETROCHEMICAL COMPLEX VIABLE IN NAGPUR SAYS EIL REPORT

  PETROCHEMICAL COMPLEX VIABLE IN NAGPUR SAYS EIL REPORT The much-awaited techno-economic feasibility study Report prepared by Engineers India Ltd. (EIL), was handed over to Dr. Vipin Sharma, IAS, CEO - MIDC in Mumbai recently. The handing over was done by Vinayak Marathe, refinery and petrochimal expert in the presence of Varun Phuljhale (EIL), Anil Kumar (EIL), Dr. Vijay Rathod, IAS,Jt. CEO (V), and Upendra Tamore Dep. CEO – MIDC. A presentation was also made by EIL on the subject. Although this is an Interim Report, according to the Report, the petrochemical complex is viable in Nagpur with 8 options of various feedstock comprising naptha and ethane gases. The next step would be handing over the Report to Devendra Fadnavis, DCM and Minister Industries, Uday Samant, (GoM) who would seek investors for the project from among Public Sector Undertakings. Meanwhile, it is understood that Gas Authority of India Ltd. (GAIL) is keen on investing in Maharashtra in a petrochemical complex....