लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची 103 वी जयंती 1 आगस्ट 2023 रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
भारतीय जनता पार्टी नागपूर महानगर तर्फे लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त भव्य अभिवादन रैली रहाटे कॉलनी चौक ते अण्णाभाऊ साठे स्मारक (दीक्षाभूमी) पर्यत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
ही अभिवादन रैली डॉ.उपेन्द्र कोठेकर विदर्भ संघटनमंत्री यांच्या मार्गदर्शनात व शहर अध्यक्ष बंटी कुकडे यांच्या नेतृत्वात व मध्य नागपूर अनुसूचित मोर्चाचे महामंत्री राजु साळवे यांच्या आयोजनात लोकशाहीरास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी माजी आमदार मिलिंद माने, मोर्चाचे राष्ट्रिय उपाध्यक्ष अशोक मेंढे, संदीप जाधव, संजय बंगाले, राम आंबूलकर, अनुसूचित मोर्चाचे शहर अध्यक्ष राजेश हाथीबेट, सतीश सिरसवान, प्ररिणिताताई फुके, शंकरराव वानखेडे, सतीश डागोर, रवी डोंगरे, योगी पाचपोर, सागर जाधव, योगी पाचपोर, राजू साळवे, चंद्रशेखर केळझरे, हिमांशू पारधी, महेंद्र प्रधान यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.