सीधे मुख्य सामग्री पर जाएं

मौदा हद्दीत मिळून आलेल्या युवतीच्या मृत्यूचे गुढ उकलले (स्थानिक गुन्हे शाखा, नागपूर ग्रामीणची कारवाई)


 मौदा हद्दीत नावकार इन्डस्ट्रीयल अॅन्ड लॉजीस्टीक पार्क कंपणीच्या प्रवेशव्दारा जवळ दि. १९/०८/२०२३ रोजी जख्मी अवस्थेत एक युवती पडून असल्याची माहिती मौदा पोलीसांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून सदर युवतीला मेओ हॉस्पीटल नागपूर येथे उपचाराकरीता दाखल केले. सदर युवतीची चौकशी केली असता पोलीस स्टेशन यशोधरा नगर, नागपूर शहर येथे ती हरविल्याची तक्रार नोंदविण्यात आली असल्याचे समजले. तसेच ती मतीमंद असल्याची माहिती समोर आली.. त्यावरुन मौदा पोलीसांनी पो.स्टे. यशोधरा नगर येथे संपर्क साधून हरविलेली सदर जख्मी मुलीस यशोधरा पोलीसांचे स्वाधीन केले. दि. २०/०८/२०२३ रोजी मेओ हॉस्पीटल येथे उपचारा दरम्यान तिचा मृत्यु झाला. तिच्या मरणाबाबत निश्चीत कारण नसल्याने तिचे वडीलाचे रिपोर्टवरुन अकस्मात मृत्युची नोंद घेण्यात आली. सदर युवतीचे पोस्टमार्टम रिपोर्ट मध्ये तिचे डोक्याला आतून झालेल्या जखमेमुळे तिचा मृत्यू झाल्याचा वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्याने अज्ञात आरोपीविरुध्द पो.स्टे.. मौदा गुन्हे रजि.नं. ७६३/२०२३ कलम ३०२ भादवि अन्वये खूनाचा गुन्हा नोंद करण्यात आला. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री विशाल आनंद यांनी पोलीस स्टेशन मौदा येथील २ पथके व स्थानिक गुन्हे शाखा, नागपूर ग्रामीण ०४ विशेष पथके तयार करुन अज्ञात आरोपीचा शोध घेण्यास सुरवात केली. सदर प्रकरणी तांत्रीक तपासादरम्यान इसम नामे १) महेंन्द्र प्रभाकर मिसार वय ३५ वर्ष रा. हनुमान मंदीर जवळ, खेड तह. ब्रम्हपुरी जि. चंद्रपूर आणि २) प्रशांत आनंदराव नाकतोडे वय २९ वर्ष, रा. नागपरसोडी, तह. लाखांदुर जि. भंडारा यांना संशयावरुन ताब्यात घेवून गुन्हयासंबंधी विचारपुस त्यांचा सदर गुन्हा केल्याचे आढळून आल्याने त्यांना अटक करण्यात आली. दोन्ही आरोपी हे दि. ३०/०८/२०२३ रोजी पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मध्ये आहेत.


सदर गुन्हयाचे तपासादरम्यान एका आरोपीने मृतक हिचे सोबत अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचे निष्पन्न झाल्याने आज रोजी नमुद गुन्हयात कलम ३७६ (२) (एल) भा.दं.वि. अन्वये कलम वाढ करण्यात आलेली आहे. नमुद दोन्ही आरोपींतांकडे पोलीस कस्टडी रिमांड दरम्यान सखोल तपास उपविभागीय पोलीस अधिकारी कन्हान विभाग श्री पुंडलीक भटकर हे करीत आहे.

सदर कार्यवाही ही नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री विशाल आनंद व अपर पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री पुंडलीक भटकर यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा, नागपूर ग्रामीणचे पोलीस निरीक्षक श्री ओमप्रकाश कोकाटे, सहा. पोलीस निरीक्षक, राजीव कर्मलवार, अनिल राऊत, पोलीस उपनिरीक्षक आशिष मोरखडे पोलीस हवालदार दिनेश आधापूरे, ज्ञानेश्वर राऊत, विनोद काळे, प्रमोद तभाने, मिलींद नांदुरकर, इक्बाल शेख, आशिष भुरे, रजेन्द्र रेवतकर, गजेन्द्र चौधरी, रोशन काळे, अरविंद भगत, पोलीस नायक रोहण डाखोरे, अमृत किनगे, प्रमोद भोयर, नितेश पिपरोदे, रंजित जाधव, विपीन गायधने, आशिष मुंगळे, किशोर वानखेडे, उमेश फुलबेल, विरेन्द्र नरड, संजय भरोडीया, शंकर मडावी, अभिषेक देशमुख, राहुल साबळे, चालक पोलीस हवालदार अमोल कुथे, पोलीस नायक मुकेश शुक्ला, सुमीत बांगडे, आशुतोष लांजेवार तसेच सायबर सेलचे पोलीस नायक सतिष राठोड यांनी पार पाडली.




इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

बुद्ध विहार येथे बौद्ध भिक्खूंसाठी पोषण जागृती मालिकेचे चौथे सत्र संपन्न

  *बुद्ध विहार येथे बौद्ध भिक्खूंसाठी पोषण जागृती मालिकेचे चौथे सत्र संपन्न*  *निकिता पाटील, प्रख्यात आहारतज्ञ * बौद्ध भिक्खूंसाठी आहार शिक्षण सत्रांची मालिका सुरू ठेवत, मिठास केअरच्या सहकार्याने न्यूट्रा पॉवरने 8 ऑक्टोबर रोजी बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर बौद्ध सेमिनरी, उंटखाना बुद्ध विहार, नागपूर येथे आपले चौथे सत्र आयोजित केले होते. मिठास केअरचे संस्थापक विवेक नगरारे यांनी भिक्षु संघ आहार शिक्षण सत्र अभियानाच्या दूरदृष्टीची माहिती देऊन सत्राची सुरुवात केली. या अभियाना चे पहले सत्र 22 एप्रिल रोजी मैत्री बुद्ध विहार, नारी रोड, नागपूर येथून झाली आणि ह्याचे उद्दिष्ट 1000 हून अधिक बौद्ध भिक्खूंना आरोग्य व पोषण जागृती चे सशक्ति प्रदान करणे आहे ज्यासाठी कदाचित शहरभरातील 100 बुद्ध विहारांमध्ये प्रवास करण्याची आवश्यकता असू शकते. डॉ.आंबेडकर सेमिनरीचे मुख्य धम्म प्रशिक्षक भदंत धम्मसारथी यांनी संपूर्ण समुह ला त्यांच्या मिशनचा सक्रिय भाग बनवण्याची आणि समाजात पोषण शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी नागपूरच्या विविध बुद्ध विहारांमध्ये जास्तीत जास्त भिक्षूंपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांची बांधिलकी द...

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वर्धा जिल्हा पदाधिकारी बैठक

 🖊️प्रविण जगताप 🖊️वर्धा जिल्हा प्रतिनिधी मो . 9284981757 वर्धा *आज दिनांक ०२ /१० /२०२३ रोजी वर्धा येथे महात्मा लॉन येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे जिल्हाध्यक्ष मा श्री सुनीलभाऊ राऊत साहेब यांच्या निर्देशाखाली ही' सभा घेण्यात आली वर्धा जिल्हा पदाधिकारी बैठक घेण्यासाठी संसदरत्न, कार्यकारी अध्यक्ष, खासदार सौ सुप्रियाताई सुळे , माजी गृहमंत्री मा श्री अनिलभाऊ देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश महिला प्रदेशाध्यक्ष सौ रोहिनिताई खडसे , राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मा श्री महेबूबभाई शेख या सर्व दिग्गज नेत्यां च्या नेतृत्वात खाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वर्धा जिल्हा पदाधिकारी बैठक घेण्यात आली वर्धा जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते बैठकीनंतर काही युवक व तरुण मुलांचे पक्ष प्रवेश घेण्यात आले हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती मा श्री सुधीर बाबूजी कोठारी, माजी आमदार मा श्री राजूभाऊ तिमांडे , प्रदेश सरचिटणीस मा श्री अतुल भाऊ वांदिले , वर्धा जिल्हा अध्यक्ष मा श्री सुनीलभाऊ राऊत, मा श्री समीर भाऊ देशमुख, वर्धा जिल्हा राष्ट्रवादी यु...

10 हजार से ज्यादा भक्तों ने लिया महाप्रसाद का लाभ -विदर्भ के 11 जिलों से आये भक्तों द्वारा रोग निदान,नेत्र जांच ,रक्तदान शिबिर में लिया लाभ

 10 हजार से ज्यादा भक्तों ने लिया महाप्रसाद का लाभ -विदर्भ के 11 जिलों से आये भक्तों द्वारा रोग निदान,नेत्र जांच ,रक्तदान शिबिर में लिया लाभ नागपुर. ((आनन्दमनोहर जोशी) श्राद्ध पक्ष के दौरान सोमवार की चतुर्थी को संकष्टी चतुर्थी से चतुर्दशी तक उत्सव मनाया जा रहा है.वहीँ महल स्थित सीनियर भोसला पैलेस महल में महाराजा ऑफ नागपुर ट्रस्ट के तत्वावधान मे 236 वें वार्षिकोत्सव पर मस्करया श्रीगणेश की विधिवत पूजा रोजाना शाम को राजपुरोहित राजेंद्र पुराणिक के हस्ते मंत्रोच्चारण किया जा रहा है.सरकारी मेडिकल कॉलेज डॉक्टर की टीम ने सफलतापूर्वक प्रयास किया. यहाँ इस दौरान विदर्भ के 11 जिलों से आये भक्तगणों ने स्वास्थ्य शिबिर का लाभ लिया. महाप्रसाद के दौरान अन्न का थालियाँ में उचित मात्रा में प्रसाद के रूप में लेकर जूठा नहीं छोड़ने के लिए सारंग,गणेश गरुड़ और कार्यकर्ताओं द्वारा उद्धोषणा करके निवेदन किये गए.इस विशेष अवसर पर श्रीमंत डॉ. राजे मुधोजी महाराज भोंसले, श्रीमंत रानी यशोधराराजे, श्रीमंत राजे रघुजी भोंसले, श्रीमंत राजे युवराज जयसिंहराव भोंसले,क़ानूनी सलाहकार अधिवक्ता प्रदीप देशमुख, हप्पेनिंग टुडे क...