राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते प्रशांत पवार व जिल्हाध्यक्ष बाबा गुजर यांनी केले गणेश टेकडी येथे हवन
भारताची महत्वाकांक्षी चांद्रयान 3 मोहीम यशस्वी झाल्याने सम्पूर्ण भारतात जल्लोश करण्यात येत आहे. इस्रोने इतिहासिक कामगिरी केल्या बद्दल वैज्ञानिकांना देश अभिनंदन करीत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा तर्फे गणेश टेकडी मंदिर येथे सकाळी 10 वाजता चांद्रयान-३ चंद्रावर सुरक्षितपणे उतरावे म्हणून हवन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते प्रशांत पवार व जिल्हाध्यक्ष शिवराज बाबा गुजर यांच्या नेतृत्वाखाली हे हवन करण्यात आले. श्री गणेशला हवन करून साकडं करण्यात आले ही मोहीम यशस्वी होऊ दे, भारताने जे स्वप्नं पाहिलं आहे ते पूर्ण होऊ दे. भारताचे भौतिक सामर्थ जगाला कळू दे ही गणराया कडे मागणी करण्यात आली होती.
चांद्रयान 3 मोहीम यशस्वी झाल्यावर प्रशांत पवार यांनी शास्त्रज्ञाचे कौतुक केले 140 करोड भारतीयांचे अभिनंदन त्यांनी केले. चंद्राच्या दक्षिण ध्रुर्व वर चांद्रयान 3 चे सॉफ्ट लँडिंग करणारा पहिला देश म्हणून भारताचे नाव कोरले गेले. जगात 4 क्रमांक चा देश झाल्याने सम्पूर्ण भारतीयांचे अभिनंदन पवार यांनी केले.
गणेश टेकडी येथे हवन व पूजा कार्यक्रम मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक राजेश माटे, प्रदेश महासचिव राजाभाऊ आकरे, महिला अध्यक्ष लक्ष्मीताई सावरकर, युवक नेता रवी पराते, मिलिंद महादेवकर, विशाल खरे, राकेश बोरीकर, दीपक अण्णा, जय जवान जय किसान संघटनेचे सचिव राजेंद्र गुलवाडे, मंगेश पात्रीकर, विजय कुमार शिंदे, गौरव गणगणे व मोठ्या संख्येत पदाधिकारी उपस्थित होते.