गुन्हेशाखा युनिट क्र. ०१ यांची कामगिरी : चोरी करणाऱ्या आरोपींना अटक.
नागपुर : दि२५.०८.२०२३ चे रात्री ८.३० वा ते दि. २६.०८.२०२३ चे ०५.०० वा. चे दरम्यान सुमारास पोलीस ठाणे एम.आय.डी.सी. हद्दीत झोन चौक येथील तकीयावाले बाबा दरगाह येथुन अज्ञात आरोपींनी लोखंडी दानपेटी फोडुन, त्यातील अंदाजे १ लाख रूपये रक्कम चोरून नेल्याने, फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून पो. ठाणे एम.आय.डी. सी. येथे कलम ४६१, ३८० भा.दं.वि. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.
गुन्हयाचे समांतर तपासात गुन्हे शाखा युनिट १ चे अधिकारी व कर्मचारी यांना मिळालेल्या गुप्त बातमीदाराचे खात्रीशिर माहिती वरून त्यांनी तांत्रीक तपास करून व सापळा रचुन आरोपी क. १) अंकीत तुलसीराम भिसेन, वय २० वर्ष, रा. हुडकेश्वर खुर्द, गुरूदेव ले-आउट, नागपूर, २) राजेंद्र श्रीनीवास पटेल, वय २१ वर्ष, रा. ओंकार नगर, अजनी यांना ताब्यात घेवून, त्यांना सखोल विचारपुस केली असता, त्यांनी त्यांचा साथीदार पाहीजे आरोपी नामे जितेंद्र तुलसीराम भिसेन याचेसह गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपीचे ताब्यातुन गुन्हयातील चोरी गेलेले रक्कमेपैकी ४८,६६०/- रू. रोख, तसेच गुन्हा करतेवेळी गुन्हयात वापरलेली मोपेड गाडी व एक मोबाईल व बॅग, असा एकुण ७६,६६०/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. अटक आरोपींना मुद्देमालासह पुढील कार्यवाहीस्तव एम. आय.डी.सी. पोलीसांचे ताब्यात दिलेले आहे.
वरील कामगिरी गुन्हे शाखा युनिट १ चे अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.