दोषी अधिकाऱ्यांवर ताबडतोब कारवाई करा अन्यथा आंदोलनाचा इशारा -मनसे
उपविभागीय अधिकारी हरीश भामरे (SDO) कार्यालया अंतर्गत चुकीच्या पद्धतीने होणारे फेरफार - मनसे चे निवेदन सादर
दोषी अधिकाऱ्यांवर ताबडतोब कारवाई करा अन्यथा आंदोलनाचा इशारा - मनसे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विचारांना प्रेरित होऊन नागपूर शहर अध्यक्ष चंदू लाडे, विशाल बडगे व उपशहर अध्यक्ष तुषार गिऱ्हे यांच्या मार्गदर्शनाखाली विभाग अध्यक्ष चेतन बोरकुटे यांच्या नेतृत्वात दिनांक 23/8/23 बुधवारी उपविभागीय दंडाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी हरीश भामरे (SDO) यांना त्यांच्या कार्यालया अंतर्गत चुकीच्या पद्धतीने होणाऱ्या फेरफार बाबत निवेदन देण्यात आले. चुकीच्या फेरफार होत असल्यामुळे गरीब व मध्यमवर्गीय लोकांना फार त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे दोषी अधिकाऱ्यांवर ताबडतोब कारवाई करण्यात यावी याबाबत त्यांच्यासोबत चर्चा करण्यात आली. कार्यवाही न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे आंदोलनाचा इशारा देण्यात आला. निवेदनाकरिता प्रामुख्याने उपस्थित विभाग संघटक चेतन शिराळकर, विभाग उपाध्यक्ष हर्षद दसरे, रोशन इंगळे, विनीत तांबेकर, विभाग सचिव साहिल बेहरे, महिला विभाग उपाध्यक्षा सौ. प्रिया बोरकुटे व इतर मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.